देवीचा भक्त !

Submitted by रेशीम गाठी on 12 July, 2018 - 09:50

मी कॉलेजला असतानाची गोष्ट.
आमच्या इमारतीत एक माणूस यायचा गळ्यात देवीचे फोटो टांगून आणि हातात थाळी घेऊन. बरोबर तो दुपारी यायचा १२ च्या सुमारास. जेंव्हा कोणाच्याही घरात पुरुष माणसे नसायची, कोणाकडे एकट्या बायका तर कुठे शाळकरी लहान मुलेच फक्त घरात. आमचे घर तळमजल्यावर, पहिलेच. १-२ वेळा बघितल्यावर हटकले त्याला. बाबा ऐकेनाच.

पुढच्या वेळेला आला , तर लोखंडी जाळीच्या दारातून आमचेच दर्शन घडले. मला म्हणाला देवी कृपा करेल , सुख शांती घरा-दारात आणि अमुक तमुक. त्याला मी म्हटले बर झाले आलास,श्रावण आहे कालच देवी स्वप्नात आली आणि म्हणाली उद्या माझा भक्त येईल दारात. त्याला पैसे फुकटात देऊ नकोस, काही काम करवून घे, तरच मी त्याला पावेन. मग गवत कापून झाडलोट करा इमारती भोवती. तर हा बाबा मलाच शिव्या शाप द्यायला लागला. देवी चा कोप होईल, सर्व नष्ट होईल अमुक तमुक.

मग हळूच काढली लोखंडी दाराची कडी. आणि त्याला म्हटले कि बाबा देवीचा आमच्यावर कोप होईल तेंव्हा होईल पण सध्या आमच्या घरात २ देव्या आहेत ( आमच्या कडे २ कुत्री होती) त्यांच्या तुझ्या वरच्या कोपाचे बघ काय ते. त्यानंतर महाराज जे धूम ठोकून पळाले ते कधी हि परतून आले नाहीत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे हे. असाच किस्सा माझ्या वहिनीने पण सांगितलेला. तिच्या लग्नाआधीचा प्रसंग.
काही हिजडे असेच घरोघरी दुपारचे फिरायचे. एकदा सरळ वहिनीच्या बंगल्याचे फाटक उघडून आत शिरले. घरात वहिनी, तिची वहिनी आणि 4 महिन्यांचा भाचा असे तिघेजण होते. हिजड्यानी बाळाला बघून पैश्याची मागणी केली. २००० रुपये द्या म्हणून हटून बसले. जाता जाईना. हळूहळू आवाजपण चढायला सुरुवात झाली. बहुतेक नशापाणी करून आले असावे.
शेवटी वहिनीने मागच्या दारात बांधलेला कुत्रा सोडला. मग मात्र जर्मन शेफर्ड जातीचे ते आडदांड कुत्रे आपल्या दिशेने धावत येताना बघून सगळ्या हिजड्यांनी एका क्षणात धूम ठोकली. ते पार गल्ली ओलांडून समोरच्या नाल्यात उतरून थांबले. अर्थात वहिनीचा रॉकी त्यांना लांबवर पोहचवूनच परत आला.

रॉकी त्यांना लांबवर पोहचवूनच परत आला. >> खरंय पाळीव प्राण्यासारखी सोबत नाही. कुत्रा हा तर घरातला संरक्षकच.

काम असते तेव्हा जरूर काम करायला सान्गावे आणि त्याचा योग्य मोबदला द्यावा म्हणजे घरी दारी असे लोक येत नाहीत !!

काही हिजडे असेच घरोघरी दुपारचे फिरायचे. >>>>.. कणेकरी मध्ये शिरीष कणेकर व १ हिजडा यातील संवादाची एक गोष्ट आहे, ती वाचा. हसून वेड्या व्हाल. Proud