अर्ध पूर्ण शतक

Submitted by कल्पेशकुमार on 10 July, 2018 - 10:12

हाय लोक्स Happy
काहीतरी लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न केलाय, पण थोडं नवीन प्रकार करावा म्हणून मुद्दा मुद्दामच अर्धवट सोडलाय अन् काय ऑप्शन फाइनल करायचे ते वाचकांवर सोडायचे ठरवून सुचलेली ही अर्ध शतशब्द कथा ―
>>>>>>
आज त्याच्या डोक्यावर कोणाचाच अंकुश नव्हता. माहूताला घाबरायची गरज संपली होती. चौफेर उधळायचे किंवा सावकाश रमत गमत चालायचे असे दोन्ही ऑप्शन्स त्याच्या मनाप्रमाणे वापरायला आज पूर्ण मुभा होती. म्हणून त्याने दोन्ही ऑप्शन्स आळीपाळीने वापरून पाहिले. आपल्या अश्या वागण्याने कोण काय म्हणेल ह्याची फिकीर न करता त्याने ......(हे झाले ४६ शब्द अन् त्यात पुढील कुठलाही एक ऑप्शन निवडून बनलेल्या ५०शब्दाच्या कथानकात तुमची कल्पना लढवून अजुन काही पन्नास शब्दांची भर घालत त्या कथेला पूर्णत्व द्यावे.)
>>>>

१)
स्कॉचचे चार खंबे रिचवले
========================
२)
बायकोच्या गैरहजेरीचा फायदा घेतला
=======================
३)
मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले
========================
४)
सर्कशीतुन जंगलाकड़े धाव घेतली
========================

आपण कोडी सोडवतो थोड़ी गंमत जम्मत करत शक्कल लढवतो तसे ईथे वरील ४ व्यतिरिक्त अनेक वेगळे पर्याय वापरण्यास सुद्धा नक्कीच मुभा असणार आहे. तर मंडळी ___/\___ होवून जावू दे ह्या अर्ध शशकला तुमच्या शतकाची किनार लावून एक पूर्ण शशक !

धन्यवाद Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

च्रप्स,
बिंदास लिहा राव तुम्ही कितीही शब्द जमतील तसे. आणि जर कमी पडलेच तर तुमच्या कल्पनेत भर घालून करूया की ५० शब्द आरामात.

कल्पना खूप चांगली आहे.. अभिनंदन ! Happy
पण 50 शब्द लिहायची लेवल नाही माझी त्यामुळे पास.--- +११

पण प्रतिसाद वाचणार...पूर्ण केलेली कथा वाचायला आवडेल....

@ L
वरील ४ पेक्षा वेगळ्या पर्यायांचे स्वागत आहेच. आणि >>... काळाच्या प्रवाहात ढवळाढवळ केली.<< हां ऑप्शन तर एकदम मस्तच आहे.
तुम्ही केलेला पुढील विस्तार वाचायला आवडेल.

ह्या अर्ध शशकला तुमच्या शतकाची किनार लावून एक पूर्ण शशक >>> हे घ्या...

आज त्याच्या डोक्यावर कोणाचाच अंकुश नव्हता. माहूताला घाबरायची गरज संपली होती. चौफेर उधळायचे किंवा सावकाश रमत गमत चालायचे असे दोन्ही ऑप्शन्स त्याच्या मनाप्रमाणे वापरायला आज पूर्ण मुभा होती. म्हणून त्याने दोन्ही ऑप्शन्स आळीपाळीने वापरून पाहिले. आपल्या अश्या वागण्याने कोण काय म्हणेल ह्याची फिकीर न करता त्याने.....
विचार केला.....आता मात्र हद्द झाली माझ्या आळशीपणाची .
शंभरच पावलं चालणे हाच एक भयानक मोठा आळशीपणा आहे आणि ते कमी की काय म्हणून मी पन्नासच पावलं चालून ऊरलेले पन्नास माझ्यासाठी दुसर्‍यांनी चालण्याची स्वप्ने बघत आहे. घटलेल्या स्टॅमिनाने मला अर्धे तिरडीवर ठेवले आहे वर मी खांदा द्यायला चार माणसे ही बोलवत आहे.... निषेध आहे माझ्या आळशीपणाचा.
(झाले का १०० शब्द?)

कोणती कथा लिंक द्याल का ? >> आपल्या बाबांना शोधा म्हणजे सापडतील ते Wink