एक नवीन प्रयत्न : तुझे नाव घेऊन ...

Submitted by माउ on 8 July, 2018 - 07:58

तुझे नाव घेऊन पहावे कितीदा..
जगावे मरावे उरावे कितीदा..

तुझ्या सोनवर्खास चाहूल नाही
उगा कवडश्याने मोहरावे कितीदा..

तुझे चंद्र तारे तुझे धुंद वारे
भासात सारे हरून जावे कितीदा..

सुगंधित गझला तुला पांघरूनी
जुन्या वेदनेने बहरावे कितीदा..

तुझा स्पर्श ओला सरून जात नाही
तुझे श्वास मी पांघरावे कितीदा..

नसानसात माझ्या तुझे शब्द सारे
फुका शाईने ते लिहावे कितीदा..

ह्रुदयात स्पर्श काही चुकून राहिलेले
तुझी साद येता धडधडावे कितीदा..

तुझा ध्रुव मी धरून जावे कितीदा..
तुझे भास मी कवेत घ्यावे कितीदा..

आता पायवाटा तिथे नेत नाहीत
शहरी तुझ्या येऊन जावे कितीदा..

जगाच्या अंतास मी तुझे नाव घेते
तुला सांग मी आळवावे कितीदा..

तुझ्यावरून गेले धुंद आयुष्य माझे
तुला सांग दिसले बारकावे कितीदा..

रसिका

Group content visibility: 
Use group defaults