ब्रेक - अप (शतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 5 July, 2018 - 09:45

आज तिने हे जीवाभावाचं नातं तोडून टाकण्याचा निश्चय केला होता. मनावर दगड ठेवून आयुष्यात पुन्हा कधी त्याचं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं. खूप प्रेम केलं तिने त्याच्यावर. इतकं की त्याच्या सहवासाशिवाय तिला करमायचंच नाही. सतत त्याचाच विचार, त्याची भेट कशी होईल हा ध्यास, त्याची सुखद भेट होऊन गेल्यांनतरही आठवणींच्या सुगंधी विचारांमध्ये हरवून जाणे, हेच तिचे विश्व बनले होते. त्याच्या केवळ सोबत असण्याने सगळी tensions दूर पळत असत. विशेषतः पावसाळ्यात त्या दोघांच्या भेटीगाठींना विशेष कैफ चढत असे. पण त्याने त्या बदल्यात काय दिलं? मन आणि शरीरही जाळणारी असह्य वेदना?

“खूप झालं, आता बास!”

असं म्हणून तिने "वाफाळता चहा" दूर सारला!!!
--------------------------------------------------------------------------------------------------------

ह्या कथेची दुसरी आवृत्ती : तुझे प्रेम माझे झाले
--------------------------------------------------------------------------------------------------------
प्रेरणा :
पुण्यात नारायण पेठेत एका पाटीवर वाचलेलं हे वाक्य आणि विनिता ह्यांचा प्रतिसाद ..
धन्यवाद विनिता Happy
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज तिने हे जीवाभावाचं नातं तोडून टाकण्याचा निश्चय केला होता. मनावर दगड ठेवून आयुष्यात पुन्हा कधी त्याचं तोंड बघणार नाही असं ठरवलं होतं. खूप प्रेम केलं तिने त्याच्यावर. इतकं की त्याच्या सहवासाशिवाय तिला करमायचंच नाही. सतत त्याचाच विचार, त्याची भेट कशी होईल हा ध्यास, त्याची सुखद भेट होऊन गेल्यांनतरही आठवणींच्या सुगंधी विचारांमध्ये हरवून जाणे, हेच तिचे विश्व बनले होते. त्याच्या केवळ सोबत असण्याने सगळी tensions दूर पळत असत. विशेषतः पावसाळ्यात त्या दोघांच्या भेटीगाठींना विशेष कैफ चढत असे. पण त्याने त्या बदल्यात काय दिलं? मन आणि शरीरही जाळणारी असह्य वेदना?
“खूप झालं, आता बास!”
असं म्हणून तिने "वाफाळता चहा" दूर सारला!!!
दे इकडेऽ ,असे म्हणून मी पुढ्यात ओढला आणि म्हणाले "चला आजच्या चहाची सोय झाली होती. केव्हाची तल्लफ आली होती. बरं झालं तू सोडलास चहा!
दुकानावर पाटी झळकत होती. "चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा हा हवाच !!"
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

:-))

चहा Lol

असं म्हणून तिने "वाफाळता चहा" दूर सारला!!! >>> दे इकडेऽ असे म्हणून मी पुढ्यात ओढला, चला आजच्या चहाची सोय झाली होती. केव्हाची तल्लफ आलेली Happy

धन्यवाद कोमल १२३४५६, Nidhii Happy

दे इकडेऽ असे म्हणून मी पुढ्यात ओढला, चला आजच्या चहाची सोय झाली होती. केव्हाची तल्लफ आलेली>>>> होऊन जाऊ द्या .. Happy
चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा हा हवाच !!

सुरुवातीला मला मोबाईल वाटलेला>>>>>विशेषतः पावसाळ्यात त्या दोघांच्या भेटीगाठींना विशेष कैफ चढत असे.>> हे वाक्य differentiation दाखवते Happy Happy

:D, Lol

मस्त ग किल्ली,
मी माझ्यापुरती चहा ला कॉफी ने replace केलं Wink