वारा

Submitted by marathi -mulaga on 24 March, 2009 - 09:04

सुसुसूसुसुसुसुसुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स...................

हाय, मी वारा

मला ओळखले नाही, हा कसे ओळखणार बरे! बरेच दिवस भेटच नाही आपली. अहो तुम्ही ५ वर्षाने आलेल्या राजकारण्याला ओळखू शकत नाही तसे मला तरी कसे ओळखणार... अगोदर मी अदृश्य त्यात मी काय कोणत्या पोस्टर वरून वगैरे पण दर्शन देत नाही त्यामुळे मला ओळखायचा प्रश्न येत नाही,....................... हा आता बघा आता ओळखलंत ना , हा एवढे बोचत आहे म्हटल्यावर ओळखणारच. हा तोच तो तुम्हाला बोचणारा मी वारा.. काय पण दिवस आलेत मला माझी ओळख सांगायला तुम्हाला त्रास द्यावा लागतोय.. असो वपु का कोण म्हणाले ते खरेच आहे एखादी गोष्ट कायम लक्षात राहायला दोन गोष्टी असाव्या लागतात. एकतर प्रचंड उपकार करायची ताकद नाहीतर प्रचंड उपद्रवमुल्य.. पहिली गोष्ट मला जमते आणि मी करतो ही नेहमी पण तुम्ही बदललात कृतघ्न झालात तेव्हा गप्प गुमान दुसरा मार्ग अवलंबला... असो आता मला ओळखल्यावर तुम्हाला काही प्रश्न पडतील, पहिला प्रश्न असेल मी एवढे दिवस होतो कुठे, चिमुरडी बाळे म्हणतील कोण रे हे अस अस्तीत्व दिसत नसताना मला जाणवतंय कधी चांगले तर कधी त्रासदायक भासतंय, तेव्हा एखादे आजोबा सांगतील की बाळ अस अस्तित्व दिसत नसताना जो हवाहवासा वाटतो तो वारा आणि तुलाही तसंच वागायला हवं नेहमी... आणि हळूच डोळे किलकिले करून मला दोन शिव्या हासडतील आणि म्हणतील की बाबा रे कुठे जातोस पूर्वी तरुणपणी पिच्छा सोडायचा नाहीस पण मग आता कोठे हरवतोस..... तर सर्व जनता जनार्दन मला चांगले वाईट म्हणणारे सर्व. आपल्याला मी सारखी माझी अनुभुती देऊ शकत नाही याबद्दल माफी मागतो (आणि हो माझी तुम्हाला साधी आठवण येत नाही, कधी मी आलोच तर बघ आज किती छान वारा सुटलाय असे तुमच्या तोंडून येत नाही त्याबद्दल माझी माफी मागितली नाहीत तरी हरकत नाही) तर त्याचे काय आहे दोस्तांनो मला माझ्या गुरुने काही कामे सांगितली आहेत तेवढी मी केली की मला खुप खूप वेळ असतो पण त्याने परोपकारासाठी जग असा जो संदेश दिलाय त्यामुळे माझे शेड्यूल बिघडलंय, काय आहे आजकाल जिथे जाईन त्याला माझी गरज आहे कोण म्हणते निवडणूकीचे वारे आले की मग निवडणुका निवडणुका करत फिरायचे, मग चार महिने त्यातच जातात आणि हो निवडणूक कसली त्यावर खूप डीपेंड आहे, म्हणजे गावाकडची असेल तर थोडक्यात म्हणजे स्थानिक वृत्तपत्राच्या कॉलममध्ये भागून जातात, जरा मोठी असेल तर आमची कक्षा वाढते, वृत्तपत्रे एक दोन अग्रलेख स्थानिक केबल वर २ दिवस मी असतो निवडणूकीचे वारे आले असे म्हणत आणि हो जाम त्रास होतोय तो मोठ्या निवडणुकींचा. किती ते वारे तयार करायचे, पेपरात, एक दोन स्थानिक चॅनेल एक दोन प्रांतिक चॅनेल आणि तिकडचे उत्तरेकडचे असेल तर ४ ५ राष्ट्रीय चॅनेलवर माझा वावर असतो मग काय तीन महिने याच्या तोंडातून बाहेर पड माहोउल क्रीएट कर मग काय त्याच्या तोंडात दोन तीन प्रश्न म्हणून जा झालं सारखी आमची पळता भुई थोडी अहो वारा वारा म्हणून माहिती आहे हो सगळ्यांना पण त्या फुफ्फुसाचे थोडे बघा त्यांना विश्रांती द्या. नाही, फुफ्फुसाला विश्रांती दिली तर पोटाला काय पण मीखील वागळे सारखी व्यक्ती जेव्हा दीवसभर हेच काम करते तेव्हा माझी मलाच भीती वाटते त्यात त्याची गोर्बोचेव्ह वाली दाढी अग आइ ग..

बर आत्ता आम्ही जास्त टेंशन मंधी हाय अवो आपल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडुका आहेत ना मग निवडणुकांचे वारे वाहायला नको आणि तेबी ४- ५ महिने म्हणजे स्टॅमिना टिकवयला पाहिजे आणि वारे सगळी कडून आणायचे आहे हो सगळी मीडीयम जणू माझ्यासाठी आहेत ना. अहो ७१ कोटी ६० लाखांच्या तोंडातून मी बाहेर पडणार आहे मग कसा वेळ मिळेल तुम्हाला भेटायला, तरी तुम्हाला एक आतली गोष्ट सांगतो आपल्याकडे की नाही जवळ जवळ ८ -१० कोटी जनतेला निवडनुका आहेत याचा गंध नसतो म्हणून ठीक आहे नाहीतर मी आता इथे ५ मिनिटे पण येवू शकलो नसतो, (त्यात आधी अमेरीकेतल्या निवडणूकांमुळे आणि त्याच्या जगभर वारे तयार करायच्या कामामुळे दमलोय मी)अरेरे एक काम राहील की सांगायचे त्यो क्रिकेट म्हणून गेम हाय ना त्याच पण वार असतय ,काय फीवर म्हणे.... मग त्या फीवरात पण मीच असतोय ना त्यामुळे फीरताच येत नाही सारखे त्यांच्या बॅट बरोबर फीरून बॉलला लांब ढकला कधी अचानक उलटे वळून दांडी उडवा, अगदीच काही जमत नसले तर पावसाला बोलावून मॅच थांबवायची किते काम करायची तुमच्यासाठी, आत्तापण माझ्या इग्लंडच्या मित्राला क्रीकेटच्या बीझनेसचे वारे करायला सांगून आलोय मग १० तारखेला जाईन तिकडे, जरा निवांट वेळ मिळालाय तो त्यामुळेच..... एवढी सगळी कामे केल्यावर कुठे येवू ओ तुम्हाला भेटायला आणि येतोच की कधीकधी अंगात वारे शिरलेय म्हणून तुम्ही ओरडता तेव्हा मी आलेलो असतोच की मग कोणाकोणाच्या अंगात संचारतय मग तुम्ही लगेच धुप उदबत्या करून शांत करता त्याला, अहो तो त्या धुप उदबद्यांचे काय नसतय मीच तो गंध पसरवायला कंटाळलोय मग जातो निघून मी.. पण तुम्हाला कस कळत नाही माझ्या मनातले अहो मी काय हे आनंदाने करतोय का.. अहो माझ काम तुम्हाला आनंद द्यायचे पण ते गेले आहे माझ्या हातातून ते निघून गेले आहे अल्गद पण्मी इतका कमजोर आहे की बंड पण करू शकत नाही म्हणून मग तुमच्यातल्या एखाद्या बऱ्या माणसाच आधार घेतो आणि माझ्या मनाप्रमाणे करायला बघतो पण ते काही घडू शक्त नाही म्हणून मी थकलेलो नाही निवडणुका येतील आणखी असे प्रसंग येतील जेव्हा मला बदलायची इच्चा होइल तुम्हाला बदलायची इच्छा होइल. आणि मी असेन तेव्हा कोणाच्या तरी शरीरात व्यक्त व्हायला..... काय म्हणता तुम्हाला बदल करायला आवडेल आणि तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहायचा प्रयत्न करता.. काय म्हणता प्रवाहाविरुद्ध पोहताना समोरून येणारा मीच तुम्हाला त्रास देतो....... अहो काय म्हणताय हे होय मीच असतो तो त्रास देणारा वारा पण लक्षात घ्या हा रेझोनन्स तुमच्यासाठी असतो हो समोरचे संकट स्वीकारायची ताकद देणारा रेझोनन्स , अचानक पर्वत कोसळू नये म्हणून दीलेला आधार असतो मी.... अहो मलाही बदलायचे आहे या समाजरचनेला मलाही एक नितांतसुंदर जीवन जगायचे आहे.. काय म्हणता आत्ता आलेला चान्स मारायचा का.. अहो मग मारायचाच... वाट कसली बघताय हा फीवर मी त्यासाठीच तयार केला आहे.. तुम्ही फक्त पावुल टाका तुमच्याबरोबरच मी असेन कदाचीत एक पावुल पुढे तेही मागे न हटणारे...... चला अहो जेव्हा परमेश्वराचा प्रिय माणूस आणि साक्षात पंचमहाभुतांपैकी एक एकत्र येतात तेव्हा ये सीस्टीम क्या चीज है

सो लेटस गो..........................................................

सुसुसूसुसुसुसुसुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स...................

गुलमोहर: