सायकल चोरीला आळा कसा घालावा?

Submitted by कल्पतरू on 2 July, 2018 - 04:46

काल माझी सायकल चोरीला गेली,नॉर्मल लॉक लावला होता. आमच्या सोसायटीत सिक्युरिटी नाहीये. १-२ वर्षांपूर्वी एकाची सायकल चोरीला गेली होती. त्याने साखळीने बांधली होती तरीपण चोरली. मी तिसऱ्या मजल्यावर राहतो, रोज तिसऱ्या मजल्यापर्यंत सायकल जिन्याने चढवण्याचा विचार करत होतो पण रोजरोज तरी किती चढ उतार करणार. उपाय आहे का कोणाकडे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१, सायकलसाठी खाजगी सुरक्षा रक्षक नेमावा
२. पार्किंगच्या ठिकाणी सायकलसाठी लोखंडी पिंजरा करून घ्यावा.
३. इलेक्ट्रॉनिक अलार्म बसवून घ्यावा जेणेकरून चोराने हात लावला की मोठ्याने सायरन होईल.
४. चोराने हात लावताच त्याचे बोट पकडून ठेवील असा स्वयंचलित चिमटा बसवावा.
५. बाल्कनीत एक लोखंडी रहाट बसवून त्यावरून दोरी सोडून रोज सायकल वरती खेचून घ्यावी.
६. एखादा छोटा कॅमेरा सायकलला बसवावा. तो आपल्या मोबाईलला कनेक्टेड असावा. जर सायकल चोराने पासवर्ड न वापरता लॉक उघडण्याचा प्रयत्न केल्यास कॅमे-यातून मोबाईलवर चोराचे छायाचित्र किंवा व्हिडीओ यावा. तसेच छायाचित्रावरून चोराचा आधार क्रमांक शोधणरे एखादे अ‍ॅप मोबाईलमधे असावे. त्यामुळे त्याचे नाव, पत्ता हे लगेच मिळेल. ही माहिती ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला जावी. या तांत्रिक बाबी उपलब्ध नसतील तर तज्ञांकडून बनवून घ्याव्यात.
आत्ता इतकेच आठवतेय.

लांब लोखंडी साखळी आणि मोठ्ठे कुलुप सोबत ठेवावे.
सायकल पार्क करताना, खांब, रेलिंग, झाड हेरुन त्याला साखळी कुलुपाने सायकल जखडावी.

वस्तु चोरायची म्हटली तर साखळी असो की कुलुप ! चोराला काहीही फरक पड़त नाही. तेव्हा खात्रीचा उपाय म्हणजे रात्री घरी नेवून सकाळी पुनः खाली आणणे.
याउप्पर दिवसभरात कुठे पार्किंग केली तर तिकडे चोरीचा धोका आहेच. अश्यावेळी शक्यतो ओळखीच्या घरासमोर किंवा खाजगी जागेत लॉक केली तर चोरण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होईल.

पुण्यात सायकल भाड्याने देण्याचा नवा व्यवसाय सुरू झाला आहे. पतवर्धन बाग, नवमहाराष्ट्र सोसा, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड अशा विविध ठिकाणी सायकली रस्त्यावर उभ्या केलेल्या असतात. त्यांना जे लॉक असते ते फक्त मोबाईलने उघडते. सायकलवरचा कोड मोबाईलच्या कोड स्कॅनरमधून जुळला की सायकल चे लॉक उघडते. जर तसाच बसायचा प्रयत्न केला तर एक बझर वाजू लागतो.

https://www.youtube.com/watch?v=Fm6LRfE1hCs
काल कल्पनेने लिहीले होते. आज मुद्दाम थांबून माहिती घेतली तर काय .. ज्युल्स व्हर्ने असल्याचा अनुभव आला. कल्पना प्रत्यक्षात आली (आधीच आलेली होती).

त्यामुळे माझ्या प्रत्येक प्रतिसादात उगीचच हास्यास्पद काही शोधत बसणा-यांना आता धडा मिळाला असावा ही प्रार्थना !

अभिनंदन
तुम्हाला मिळाले आहेत दहा गुण

यावर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार, चाक काढून घरी नेण्याची उपाययोजना आवडली,

काल कल्पनेने लिहीले होते. आज मुद्दाम थांबून माहिती घेतली तर काय .. ज्युल्स व्हर्ने असल्याचा अनुभव आला. कल्पना प्रत्यक्षात आली (आधीच आलेली होती).>>> Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl

सायकल चोरीला आळा कसा घालावा >>>> हे सारखं , सायकल चोरीचा आळ कसा घालावा/घालवावा , असं वाटतयं>>>>हो माझा पण असाच गैरसमज झाला.

चोरीचा आळ आणि चोरेला आळा. चतुर्थी ऐवजी षष्ठीचा प्रत्यय लावला की कसा अनर्थ होतो याचं उत्तम उदाहरण आहे हे.