भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

As a foreigner, what things do you dislike about America, or American people? What things in your country are drastically different from how things are in America? What myths about America did you not believe until you came here? >> भिडे साहेब हा या धाग्याचा विषय नाहीये हो.. विषय तरी समजाऊन घ्या.

'जैसा देस वैसा भेस' ....When in Rome, do as the Romans do. When visiting a foreign land, follow the customs of those who live in it.
आणि असे न केल्यास त्यां foreign land मधल्या लोकांना (केवळ अमेरिकनच नव्हे) काय कल्चरल शॉक बसतो हे आपल्याच देशबांधवांकडून (हा शब्द तरी अ‍ॅक्स्पटेबल असावा) समजाऊन घेण्यासाठी हा बाफ आहे.
तुम्हाला अमेरिकन्स किंवा ईतर देशातील लोकांचे अवगुण सांगायचे आहेत... त्यासाठी वेगळा धागा काढा मी तिथेही लिहिन... ईथे फाटे फोडण्यात काय अर्थ आहे.

करी झाली आता धूप उदबत्ती च्या वासाबद्दल चर्चा करायची का? कारण वास येणाऱ्या नाकांना, 'देसी' लोकांच्या कपड्यांना ह्याचा पण नक्की वास येतो. Wink

बाय द वे, इथे सिंगापुरात कापलेला दुरीअन (भन्नाट वासाचे एक फणस वर्गीय फळ) कोणत्याही पब्लिक ट्रान्सपोर्ट (बस / ट्रेन / टॅक्सी ई.) मधून न्यायला जाहिर बंदी आहे आणि तसे लिहिलेलं पण असत. दुरिअन इथलं लोकल अन लई फेमस फळ आहे पण नशिबानी कोणी ओफेंड होत नाही.

ड्युरिअनला एशिअन/ कोरिअन लोकं चिक्कार शिव्या घालतात आणि त्यावरुन भयानक जोक करतात. मैलोन मैल वास येतो आणि उलटी येण्याइतका भयाण वास असतो. इ. इ. ऐकिव माहिती आहे.
मला एकदा खाउन बघायचं आहे. Lol

तुम्हाला अमेरिकन्स किंवा ईतर देशातील लोकांचे अवगुण सांगायचे आहेत... त्यासाठी वेगळा धागा काढा मी तिथेही लिहिन >>> हो ना. मी ही. भरपूर आहेत Happy तसेच इथे नव्याने आलेल्या भारतीयांना इथे काही वर्ष असलेल्या भारतीयांकडून जे कल्चरल शॉक्स मिळतात त्यावरही एक काढता येइल Happy "अरे परवा-परवाच तू भारतात ____ करत होतास ना?" असे वाटण्याइतके काही लोक अमेरिकन सवयी फ्लॉण्ट करतात. काही खरेच उचलतात, काही उसन्या. ज्याचा भारतात तोपर्यंत रोज घेतलेला कटिंग चहा अजून सिस्टीममधून पूर्ण बाहेर पडला नसेल तो फेक अमेरिकन अ‍ॅक्सेण्ट मधे आपल्यासमोर "You don't want to meet me before my morning coffee" म्हणतो तेव्हा जसे वाटते - तसे काहीतरी Happy

साधारण कुकिंग गॅस + मन्युअर + थोडा पिकलेल्या फणसाचा वास = दुरीअन चा वास. वासाची पण हळू हळू सवय होते. अजून मेन फळ खाल्ले नाहीये पण आईसक्रिम खाऊन झालंय विच वाज ओके.

कल्चरल शॉक्स म्हणजे काय ह्याचा एक उदाहरण मी भारतातच अनुभवलंय , चेन्नई मध्ये असताना जवळच्या बंगलो मध्ये नॉर्थ इंडियन मुले मुली एकत्र राहत होते जे जवळच्या युनिव्हर्सिटी मध्ये शिकण्या साठी आलेली , त्या मुली तोकड्या कपड्यांमध्ये फिरत असत, आणि मुले मुली स्मोकिंग करत बसत बाहेर , आमच्या शेजारी एक लोकल तामिळ फॅमिली होती , त्याचं साठी हा शॉक चा होता आणि त्याच्या मुलांना असा वाटायला लागलं कि आपण पण अस्संच करू , नवे तर आम्हालाही हेच करायाचा ... पण त्यांना काय माहित कि हीच मुलं जेव्हा आपल्या घरी जातात तेंव्हा असा दाखवत कि आम्ही नाही त्यातले..
सवयी ह्या एका रात्रीत बदलत नाहीत , ज्यांनी २५ वर्ष तारिख लिहिताना पहिला दिवस , नंतर महिना आणि वर्ष असा लिहिलंय त्यांना आता अचानक सांगितलं कि आता उद्या पासून पहिला महिना मग दिवस आणि शेवटी वर्ष असा लिहायचा ..का तर आपण आपला देश आता बदललाय ... आणि मग एकाने चुकून पूर्वीसारखाच लिहिलंय तर म्हणायचं कि त्यान्ना शॉक बसला ..बसणारच आहो.. पण म्हणजे तो चुकीचं करतोय असा नाही ना.. तो काही कायदे तोंडत असेल तर नक्कीच चुकीचं आहे..

हा प्रत्यक्ष माझा अनुभव नाही . माझ्या ओळखीचा एकजण बर्लिन मध्ये शिकत होता तर तो सांगत होता
स्टुडंट्स असल्याने कायम पैशांची तंगी. गरजेपुरतेच वाणसामान / किराणा सामान आणलेले असायचे जसे ४ कांदे २ बटाटे ३ टोमॅटो १ काकडी etc
आयत्या वेळी जेवण बनवायला स्टुडंट्स आपापसात वस्तूंची देवाण घेवाण करत; कि आज मी तुझ्या ट्रे मधला १ कांदा घेतोय उद्या / जेव्हा माझं सामान आणेन तेव्हा मग परत करायचं किंवा फ्रीझ मध्ये हि काही असेल तर घ्यायचं आणि परत आणून ठेवायचं वगैरे.
काही काही भारतीय मुलं /स्टुडंट्स वस्तू घ्यायचे पण परत आणून द्यायचं नाव नाही!! .. दुसरा पार्टनर बाहेर असेल तेव्हा त्याच्या वस्तू फ्रिजमधून काढून खायच्या पण परत आणून ठेवायच्या नाहीत?! (हॉस्टेल मध्ये फ्रीझ वर प्रत्येक लेव्हल चा खण /ट्रे कोणाचा याच लेबल डकवलेलं असायचं )
संध्याकाळी बघावं तर आपलं खाणं गायब !विचारलं कि थातुरमातुर उत्तरं देऊन वेळ मारून न्यायची .. "नंतर तूला देईन; अरे खूप भूक लागली होती; आज माझी घाई झाली /जेवण बनवायला वेळ नाही / पैसे नाहीत .. काहीही कारण ..
शेवटी शेवटी मग एकतर भारतीय स्टुडंट्स ना हॉस्टेल मिळणं थोडं कठीण झालं होतं..
किंवा अशी परिस्थिती झाली होती म्हणे कि ज्या किचन किंवा फ्रीझ वर लिहिलेलं असेल कि दुसऱ्याच्या वस्तू (चोरून) खाऊ नका तर समजून जायचं कि इथे/ या फ्लोर वर भारतीय स्टुडन्ट राहतोय!! Sad Sad
गोष्ट खूप जुनी म्हणजे २००२ ते २००५ च्या आसपास ची. यापैकी किती खरं आणि किती खोटं हे तो मित्र च जाणे ..

भोचक पणा!!! >> आमच्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअर ला व एंट्रन्सला बाके आहेत तिथे संध्याकाळचे म्हातारे म्हाता र्‍या हवा खात बसलेले अस्तात. मी कधी ही ऑफिसातून आले की एक सिम्धी बाई हटकून विचारते. आज आप जल्दी आये. .. उशीर झाला तर क आज आप लेट आये!!@@### तुला काय करायचे आहे. असे मनात येते पण गुळ मुळीत हसून जाते मी लिफ्ट परेन्त.

@@### तुला काय करायचे आहे. असे मनात येते पण गुळ मुळीत हसून जाते मी लिफ्ट परेन्त>> हो हो असतात अश्या बऱ्याच भोचक मावश्या Lol

@@### तुला काय करायचे आहे. असे मनात येते पण गुळ मुळीत हसून जाते मी लिफ्ट परेन्त>> हो हो असतात अश्या बऱ्याच भोचक मावश्या>>>
एव्ह्ढं पण ओफेंड व्हायची आवशकता नाही वाटत, बर्याच वेळेला काही बोलायचं म्हणुन म्हणतात लोक्स 'की काय आज सुटी वाटतं (its obvious most of the times as its sunday or festive day). किंवा काय आज खरेदी वाटतं (हातातला बॅग्ज पाहुन), ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना लगेच बॅग्ज उघडुन काय खरेदी केली हे दाखव अस ते expect करताहेत.
पण त्यांनी ही क्लु ओळखुन (गुळ मुळीत हसू देउन न बोलता जाणे ) पुढच्या वेळी invisibility treatment द्यायला पाहिजे. मी देतो. समरच्याने तोंड उघडल्याशिवाय मी तो तिथे नहिचे असा लूक देतो, अनुभव आल्यावर बदलावं लागलं.भलेही कोक्स आखडु म्हणो. Wink

मी पहिल्यांदा बिहारमध्ये गेले तेव्हा माणसांना किंवा त्यांच्या घरात गेल्यावर मलाही सरसों तेलाचा जो वास यायचा तो असह्य व्हायचा आणि त्यात भर म्हणजे त्यात मासे तळत असतील किंवा आॅम्लेट बनवत असतील तर विचारायलाच नको. हळूहळू सवय झाली. आपल्याला जसा सरसों तेलाचा वास येतो तसा आपल्याही तेलाचा वास त्यांनाही येतच असेल ना. पंचवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल आम्ही कोकणात गेलो होतो. सकाळी आम्ही दर्शनाकरिता देवळात चाल्लो होतो एक आजोबा अंगणात अंघोळ करत होते. नवीन आलेली पाहूणे मंडळी पाहून अंघोळ करत करत अनुनासिक स्वरात प्रश्नांची सरबत्ती केली होती.....

भोचक बायांचा अनुभव मलाही आहे. माझ्याच वयाची माझी शेजारीण.
आज लवकर आलीस?
आताच आलीस काय? हे अगदी रात्री ९ वाजता दिसली तरी विचारणार.
आज उशीरा?
नवीन ड्रेस? / ड्रेस छान आहे? कितीला? कुठुन? हे तर दर दोन दिवसानी
भाऊ म्हणजे माझा नवरा (तिचा भाऊ :-)) रोजच लेट येतात?
कधी घरी दिसला तर अरे आज भाऊ लवकर घरी?
शांप कुठला वापरते? साबण, फेवॉ कुठला?
त्यादिवशी ऑर्डर केलेलं किराणा सामन आलं तेव्हा ही दारत होती.
डीलिव्हरी वाला घरात आल्याबरोबर ही सुध्धा मागुन आत.
मग सुरुवात.
पहिलाच प्रश्न : हे व्हाईट कोलगेट आहे न? की जेल आहे? (माझ्या मुलीचे एक्सप्रेशन्स भारी होते )
चवळी बारीक घेतेस?
तु तेल बदलुन नाही वापरत?
एवढे वेगवेगळे साबण? कोण कुठला वापरतं?
असं बरंच काही.
तो माणुस गेल्ञावर ती गेली.
पुन्हा जेवण आटपुन बाहेर होती. तेव्हा माझा नवरा आला. त्याच्यासाठी दार उङ्हडलं तर ही म्हणे आले का भाऊ?
मी कसंबसं हसल्यासारखं केलं. तर ही दारात येउन अग त्या सामानाचे किती झाले? दोन-तीन हजार तर झालेच असतील ना?
मी चाटच पडले. त्यादिवशी जास्तच डोक्यात गेलीये ती माझ्या.

त्या सिंधी काकूने केला तो भोचक पना नाही

ह्या सस्मित च्या शेजारणी ने केला तो भयानक भोचकपणा ... घरामध्ये वाद हौऊ शकतात त्याने

हे व्हाईट कोलगेट आहे न? की जेल आहे? >> Lol Lol हे भारीये !!
एखाद दोन वेळा उत्सुकता /वेगळेपणा म्हणून ठीके .. पण प्रत्येक गोष्टीवर चौकश्या केल्यावर वाटू शकते कटकट

मी कसंबसं हसल्यासारखं केलं. तर ही दारात येउन अग त्या सामानाचे किती झाले? दोन-तीन हजार तर झालेच असतील ना?>>
हे मात्र अति झालं

हो ना. आणि पटकन तोडुन काही बोलु शकत नाही मी. कारण माझ्या साबांचे त्यांच्याशी अस्लेले चांगले संबंध.
चांगले नाहीत तर तिचा नवर अगदी मानलेला मुलगा आहे (त्याला आई नाही. लहान असताना गेली)
आणि त्यांच्या लग्नात वरमाय माझी सासु होती. सगळ्यातच, मानपानात वैगेरे.
अगदी हीच नवर्‍याची आई असं वाटलेलं ह्या भोचक बाईच्या माहेरच्यांना. Happy
हीएक वेगळीच कथा आहे. Happy

एखाद दोन वेळा उत्सुकता /वेगळेपणा म्हणून ठीके .. पण प्रत्येक गोष्टीवर चौकश्या केल्यावर वाटू शकते कटकट>>>>>>> अर्थात. मी पण निभाऊन नेत होते इतके दिवस. साधी आहे. मनात वाईटपणा नाही. घरी मतिमंद मुलगी आहे त्यामुळे जरा इमोशनल झाली आहे वैगेरे विचार करुन.
पण कधीकधी डोकं फिरतंच.

>> ड्युरिअनला एशिअन/ कोरिअन लोकं चिक्कार शिव्या घालतात आणि त्यावरुन भयानक जोक करतात.

ड्युरिअनला दक्षिणपूर्व एशिअन देशांत फळांचा राजा मानतात.

>>>भोचक बायांचा अनुभव मलाही आहे. माझ्याच वयाची माझी शेजारीण.
आज लवकर आलीस?
आताच आलीस काय? हे अगदी रात्री ९ वाजता दिसली तरी विचारणार.
आज उशीरा?
नवीन ड्रेस? / ड्रेस छान आहे? कितीला? कुठुन? हे तर दर दोन दिवसानी
भाऊ म्हणजे माझा नवरा (तिचा भाऊ :-)) रोजच लेट येतात?
कधी घरी दिसला तर अरे आज भाऊ लवकर घरी?
शांप कुठला वापरते? साबण, फेवॉ कुठला?>>>
सस्मित... सेम हियर... हिची बहिणीच राहते मग माझ्या समोर...
माझ्या नवऱ्याला भाऊ,दादा म्हणते... भाऊ नेहेमी लेट का येतात... आणि मी कुठे चालले किंवा आले की ही बया लगेच डोकावणार आणि कुठे चालली आता आली का??? अरे मी कुठे ही जाईन तुला काय करायचं य ??? Angry
आता मी माझ्याच घरात चोर पावलाने येते जाते... एकदा अशीच सक्सेसफुल्ली दबक्या पावलाने लिफ्ट पर्यंत आले तर ही मागून पळत पळत कुठे चाललीस???? बाप रे... स्वतःच्याच घरी यायची जायची चोरी... आणि मी पण तिला तोंडावर नाही काही बोलू शकत... पण आता खूप इग्नोर मारते तिला.. पण हिला कितीही इग्नोर केला तरी काही फरक पडत नाही. शेवटी मला थोडं वाईट वाटायला लागतं...पण तिला काही फरक पडत नाही... आणि माझाही एकदा किराणा माल तिच्या समोर आला होता.. हिने काय काय आहे विचारलं.. मी एका शब्दात म्हटलं ...किराणा... आणि धाडकन दार लावून घेतलं.. आमच्या शेजारच्या काकांनी मात्र तिला मस्त झापल होत..आता ती जात नाही तिथे भोचक पणा करायला. आणि अजून 1 शॉक म्हणजे ती अख्या सोसायटी मध्ये (8 बिल्डिंग लांब लांब).. मध्ये घरातल्या गाऊन वर ओढणी(कधी कधी घेत नाही) टाकून फिरत असते... आणि तिने मला एकदा बळजबरी जेवायला बोलावलं होतं आणि मला अतिशय थंड असा स्वयंपाक वाढला आणि ताटा भोवती 4-5 झुरळं आरामात फिरत होती...आणि म्हणे भाऊंना पण बोलवायचं आहे जेवायला...मी प्रसाद म्हणून कसं बस खाल्लं आणि नवऱ्याला सांगितलं बाहेरून खाऊन ये आणि मला ही आण पावभाजीच पार्सल... तिच्या मुळे नवीन घेतलेलं घर बदलावस वाटत होतं... पण हे घर विकून परत नवीन घर घेण सोप्प नाही म्हणून आलिया भोगासी..... नो ऑपशन....

अर्र्!! नटुकाकी, इतका त्रास नै करके लेनेका. माबोपे आके हलका होनेका. Happy
इग्नोर करणं आणि तिला पाचपोच जरा कमीच आहे असा विचार करुन मी शांत रहाते. Happy

हो सस्मित... Happy माझा नवरा पण तेच म्हणतो की तिला जरा पाचपोच कमी आहे ...कुठे कसं वागावं बोलावं नाही कळत....त्या मुळे इग्नोर करणं हाच उपाय आहे...

ड्युरियन हा वासाचा राजा आहे. भारताच्या मसाल्याचा किंवा घामाच्या उग्र वासापेक्षा ड्युरेनचा गर्याचा वास १०० पटीने अधिक असेल.
एखाध्या एसी रुम मध्ये जर काही वेळ ड्युरेन कापुन ठेवले तर त्याचा वास आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहातो.

ह्याला कल्चरल शॉक म्हणावे का माहीत नाही.... शेजाऱ्यांवरून गोष्टी निघाताहेत तर मी पण शेअर करते....

आमच्या समोर च्या फ्लॅट मध्ये एक कुटुंब राहतं. आई बाबा 2 मुले आणि सासू. सासू तशी मनमिळावू वगैरे आहे. त्यांची नात जी माझ्या मुलीपेक्षा 9 महिन्यांनी मोठी आहे, ती माझ्या मुलीशी खेळायला यायची. आणि आली की जिथे खेळत असेल तिथे सु सु करून ठेवायची. एक दोनदा मी क्लीन केलं. पण मी खरं सांगते मला फार किळस यायची ते साफ करताना. इतक्या लहान मुलीच्या सुसू चा इतका खराब वास का यायचा कोणास ठाऊक.
मग मी त्या मुलीला दे 10 मिनिटांनी ,"सु आली तुला?" असं विचारायला चालू केलं , जेणेकरून तिला टॉयलेट मध्ये तरी नेता येईल..
पण बाकी सर्व बोलणारी मुलगी ते मात्र काही सांगायची नाही.
एकदा माझं डोकं आउट झालं. त्या दोघी खेळत होत्या आणि हिने सु केली होती. कसं काय माहीत पण माझं लक्ष गेलं नाही. 10 मिनिटांनी वगैरे लक्ष गेलं तर ती ज्या ठिकाणी बसून खेळत होती तिथे थोडं पाणी दिसलं आणि त्या पाण्यात माझी मुलगी आणि ती हात मारून मारून खेळत होत्या.

मी पाहायला गेले तर मॅडम ची सुसू.. अशी तिडीक गेली डोक्यात. नवरा पण नेमका तेव्हाच आलेला. रेहा ला त्याच्या हातात दिलं क्लीन करायला. आणि त्या मुलीच्या आजी ला बोलवलं. ती घेऊन गेली. मी 5 मिन वाट पाहिली. पण ती आजी काही सु साफ करायला अली नाही. आणि त्या मुलीला साफ न करता फक्त खालची पॅन्ट बदलून पाठवलं हा तर घाणेरडे पणाचा कळस होता. कारण तो उग्र वास तिला अजून ही येत होता.
मला एक गोष्टीची चीड आली सर्वात जास्त ते म्हणजे आपण जर आपल्या मुलाला दुसऱ्या लोकांच्या घरी पाठवतो आणि तिथे आपलं बाळ सुसू करतय किंवा अजून काही करतय तर त्यांना एकदा ही असं वाटू नये की जाऊन साफ करावं??
मी ही लहान पाणी चाळीत राहिलेय पण असं वागताना कोणी कधी पाहिलं नाही की ऐकलं नाही म्हणून मला जरा शोकिंग होतं हे.
मी एकदा अतिशय नम्र शब्दात सांगितलं आई ला तिच्या , तीने पण एकदम हो हो वगैरे म्हटलं प्रेमाने पण पुन्हा 2 दा हाच प्रकार. मग नंतर सरळ ती बाहेर आल्याचा आवाज आला की मी दरवाजा लावून घेते. लहान मूल आहे पण मोठ्यांच वागणं काही कळत नाही असं का असतं

हे आता कल्चरल शॉक्स पेक्षा ज्युसी गॉसिप जास्त होत चाललंय. अवघड आहे!

त्यात मध्ये "स्टिरीओटाइपिंग" आलं म्हणजे सोने पे सुहागा झालं. असल्या आयक्युनाझीनेसचा निषेध असो. इतकं बोलून मी खाली बसतो.

300

Pages