ती

Submitted by अक्षय. on 26 June, 2018 - 00:48

आज फायनली ती भेटली. आमची शेवटची भेट साधारण ७-८ महिन्यांपूर्वी झालेली. मागच्या आठवड्यात ती दोन तीनदा येऊन गेली पण नेमका तेव्हा मी माझ्या कामात बिझी होतो. आज थोडी तशी चिडलेलीच होती मला वाटलं नेहमीसारखा लटका राग असेल पण नाही तिच्या लटक्या रागाचं रूपांतर थोड्याच वेळात रौद्र रुपात झालं. मीही खिशातील सर्व सामान गाडीच्या डिकीत टाकून तिच्या स्वाधीन झालो. ती चिडली की फार गोड दिसते म्हणून मीही तिला चिडवतच असतो. साधारण अर्धा एक तासाने आमचे भांडण संपले. ती नेहमी मला अशीच छळते पावसाच्या सरीच्या रुपात येते आणि चिंब प्रेमाने भिजवून निघून जाते.

येताच पाऊस वाटतं
सोबत त्याच्या तूही यावस
चिंब भिजलेली तू
अलगद माझ्या मिठीत शिरावस
_अक्षय

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy
अक्षयचं लक्षण काही खरं दिसत नाहीये ब्बा--- Lol

अक्षय पार गंडलाय.
काय काय धागे काढून राहीला.
सांगून टाक तिचे नाव आता. Biggrin

अक्षयचं लक्षण काही खरं दिसत नाहीये ब्बा-->>> Biggrin

पाफा काका>>> Rofl

मुंबई विद्यापीठाने अक्षयदादाला क्लीन बोल्ड केलेल दिसतय... Proud

मोठ्ठा धागा काढ रे.. Proud>>>>> किती ती घाई दादा.. तो सध्या "मन धागा धागा जोडते नवा" मोड मधे आहे Wink Proud

धन्यवाद मंडळी __/\__
सुरवातीला विनोदी असंच काहीतरी लिहायचं होतं पण ते पावसाची सर वगैरे आल्यावर उगाचच रोमँटिक मोड वर चाललीय असं वाटलं मग म्हणलं चला कथा मध्ये टाकू पण १०० शब्द होत न्हवते म्हणून ललित मध्ये टाकलं तिकडे विनोदी ऑप्शन नाही भेटला पण आता विनोदी मध्येच टाकली असती तर चाललं असतं असं वाटतंय Lol

पण आता विनोदी मध्येच टाकली असती तर चाललं असतं असं वाटतंय >> विनोदी नाही वाटली रे!

तुझ्या मनातले काही तरी बाहेर येतेय असे वाटले, भले ते सुप्त मनात असेल, पण आहे नक्की Happy

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुझ्या मनातले काही तरी बाहेर येतेय असे वाटले, भले ते सुप्त मनात असेल, पण आहे नक्की >> असेल असं पण

विनोदी नाही वाटली दादा... शब्द सुरेख वापरलेस... लिहायचा फ्लो पण मस्तय..असं लिखाण मनापासून येतं..हे वरवरचं नसतं.... Happy