प्रमोशन (शतशब्दकथा)

Submitted by योगेश_जोशी on 25 June, 2018 - 23:14

आजचा दिवस त्यांच्यासाठी खुप महत्वाचा होता. महिन्यातील महत्वाची मीटिंग आज सुरु होणार होती. आपले ईप्सित गाठायला सर्वांचीच खुप लगबग सुरु होती. सगळ्यांनी महिनाभर आपला प्रोफाइल अपग्रेड करायला खुप मेहनत घेतलेली तरीही कोण नक्की ध्येयपूर्ती करणार ह्यासाठीची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होतीच. मीटिंगची वेळ खुप उशीरा असल्याने प्रत्येकाने आपापल्या कर्तुत्व कौशल्याचा पुनः एकदा आढावा घेतला. काहीही झालं तरी आज मीच बाजी मारणार हा विश्वास तेथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात भरून राहिला.
ह्यावर्षी प्रमोशन नक्की असल्याने अवंतिकाने कसलीच रिस्क घ्यायची नाही हे ठरवत आपल्या लाडक्या नवऱ्याला तृप्त मनाने झोपलेला पाहुन रात्री उशीरा हळूच आयपील घेतली अन् आजही संधी हुकल्याने सर्वांचा पुनः एकदा हिरमोड झाला.

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

☺️

_/\_

समजली नाही.
खुलासा करून सांगाल का प्लिज?

नवऱ्याला तृप्त मनाने झोपलेला पाहुन रात्री उशीरा हळूच आयपील घेतली अन् >>>> इथे

दक्षे, आय -पिल अस वाच म्हणजे मे बी कळेल.

Happy __/\__
सकाळी ऊजेनेसिस नोट्स वाचत असताना सुचली

बरोबर अंदाज आसा >>>> नाही, मी दुअसरा गेस केलेला Happy

तुमच्या स्पष्टीकरणानंतर आता कळाला खरा अर्थ !

Ohhh
काय अंदाज केलेला तुम्ही ?

छान आहे शतशब्दकथा !!! आवडली. शेवटी, नवीन आलेल्या आय -पील HR ने घोषित केले कि या वेळेला कोणालाही प्रमोशन मिळणार नाही.

धन्यवाद समाधी, सुमुक्ता आणि गोल्डफिश Happy
HR ने घोषित केले कि या वेळेला कोणालाही प्रमोशन मिळणार नाही.
Lol हो खरंय

भारी आहे.

"ह्यावर्षी प्रमोशन नक्की" हे नवीन पॅरामम्धे सुरू करा.

धन्यवाद उमानु, असामी आणि अॅमी Happy
_______

असामी
पैराग्राफ केलाय आता. मोबाइलवरुन अपलोड केल्याने त्याबाबत कन्फ्यूजन झालेले कारण तो ईथे अजूनही सलग दिसतोय. पैराग्राफ फक्त पीसी व्ह्यू मध्ये दिसून येतोय. लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे Happy

Lol याच अर्थाचा एक जोक होता.. सगळे आतुर झाले आहेत.. त्यातील एक आड्दांड सगळ्यांना मागे सारुन पुढे निघतो.. अन थोड्याच वेळात उलटा पळत येतो.. (आणि शिव्या देत इतरांना कारण सांगतो)

Pages