चंद्रकोर

Submitted by धनुर्धर on 25 June, 2018 - 10:34

चंद्रकोर ती नभी चमकते चांदनमाखलेली
चंद्रकला जणू शुभ्र सांडते अंबरात आलेली

रूप न्याहाळी तळ्यात आपुले चंद्रचकोरी ती
लाटांवरती स्वार होऊनी चंदेरी वाहती

राज्य तिचे त्या रात्रीवरती तीच चांदरानी
शुभ्रधवल तिच्या रूपाची पडे जणू मोहीनी

सख्या तिच्या त्या चंद्रबाला विखुरल्या भोवताली
जश्या शिंपल्या चंद्र पाकळ्या वरती आणि खाली

चंद्रकांता चम चम करते आज तारांगणी
तीट लावण्या मेघ सावळा आला तिच्या अंगणी

.......धर्नुधर.......

Group content visibility: 
Use group defaults