प्रेमरस

Submitted by धनुर्धर on 22 June, 2018 - 07:42

ह्रदयातून बाण आरपार होऊ दे
बोथटलेल्या प्रेमाला आज धार येऊ दे

किती दिवस काढायचे
आतल्या आत कुढायचे
बाहेरून हसताना
डोळे मिटून रडायचे

बोलून टाक मनातले भले नकार देऊ दे
बोथटलेल्या प्रेमाला आज धार येऊ दे

गोड गोड चिठ्ठ्यानी
कशी ती पटेल
सरळ जाऊन भिडायचं
फाटेल नाहीतर तुटेल

प्रसाद समज प्रेमाचा जरी मार खाऊ दे
बोथटलेल्या प्रेमाला आज धार येऊ दे

भेट काय द्यायची
हा विचार कशाला
एक फुल गुलाबाचं
जड नाही खिशाला

प्रेमाचं घोडं तुझं गंगेमध्ये न्हाऊ दे
बोथटलेल्या प्रेमाला आज धार येऊ दे

नको बघत बसू फक्त
रूप तिचे सावळे
टपून आहेत तिच्यासाठी
अजून बरेच कावळे

तुझ्यासाठी तिच्या ओठी नवे गीत गाऊ दे
बोथटलेल्या प्रेमाला आज धार येऊ दे

होईल ती परकी
अजून जर थांबलास
शून्य राहील बाकी
अजून जर लांबलास

तहानलेल्या तोंडाला प्रेमरस पिऊ दे
बोथटलेल्या प्रेमाला आज धार येऊ दे

........धर्नुधर.......

Group content visibility: 
Use group defaults