शिका मुलींनो, शिका

Submitted by बेफ़िकीर on 21 June, 2018 - 10:34

स्फुट- शिका मुलींनो, शिका

शिका,
की एक संस्था येते...
व्हेंडिंग मशीन देते...
मिरवून घेते,
जाते....

मुतायला गेलात,
तर पाणीच नसते

इतस्ततः pads विखुरलेली,
वापरून फेकलेली

साध्या मुतण्यासाठी संघर्ष!

शिका मुलींनो, शिका!

====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या सुमार बुद्धीचा दोष मान्य करून मी विचारतो,
या गद्य लेखनातून तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे?

माझ्या सुमार बुद्धीचा दोष मान्य करून मी विचारतो,
या गद्य लेखनातून तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे?<<<<

हेच की तुमच्या सुमार बुद्धीलाच नव्हे तर अनेक सिस्टिम्स ना सुधारायला हवे आहे

>> तुमच्या सुमार बुद्धीलाच
तुमच्या म्हणजे कोणाच्या सुमार बुद्धीला?
तसंही मला वाटतं बुद्धी कोणाचीच सुमार नसते. ती कुठे वापरली जाते ह्यावरून समाज ठरवतो ते सुमार आहे किंवा कसं ते)

कळकळ दिसून येते पण इन जनरल मेसेजींग तोकडं आहे असं वाटतं.

तसंही मला वाटतं बुद्धी कोणाचीच सुमार नसते<<<< अहो लोकं समोरून येऊन सांगतायत की त्यांची बुद्धी सुमार आहे, तुम्ही कशाला दिलदार सांत्वने करताय उगाच?

कळकळ दिसून येते पण इन जनरल मेसेजींग तोकडं आहे असं वाटतं.<<<< धाग्याशी सुसंबद्ध प्रतिसादाचा आदर आहे.

(दुर्दैवाने.... प्रत्येक प्रतिसादावर लिहू शकेनच असे नाही. आज लिहू शकलो.)

>> अहो लोकं समोरून येऊन सांगतायत की त्यांची बुद्धी सुमार आहे, तुम्ही कशाला दिलदार सांत्वने करताय उगाच?
आय फॉर अ‍ॅन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड ... (वगैरे वगैरे)

शिकुन काही फायदा नाही. मुलिंना नंतर शिकलेल्या गोष्टी न वापरता मिळणारी नोकरी करायला लागणार आहे. त्यापेक्षा कचरा उचलणे, स्वच्छता बघा आधी.
सरकार मुतण्यासाठीच्या बेसिक संघर्ष्यावर मात करु शकत नाही आणि पोरींना शिकवायला निघालेत!
असा भयानक अर्थ मला तरी सापडला.

>> सरकार मुतण्यासाठीच्या बेसिक संघर्ष्यावर मात करु शकत नाही आणि पोरींना शिकवायला निघालेत!
Happy

आपल्या (भारतातल्या आणि/किंवा मुलींच्या) सगळ्या प्रॉब्लेम्स रूपी व्हिशीयस सर्कल चा भेद करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कुठला उपाय आहे असं मला वाटत नाही.

पाणी नाहीय पण फुकट pads मिळत असल्यामुळे मुली pad मध्ये मुतून तिथेच फेकून देतायत असा अर्थ वाटत आहे.

भावना पोहोचतात.... मुलीन्चा संघर्ष तर जन्म घेण्याच्या आधिच सुरु होतो...

पॅड व्हेंडिंग मशीन गाजावाजा करत बसवून देणारे ( किंवा कुणीच/ शाळासुद्धा) नंतर डिस्पोजल कसं करायचं याचा विचार करत नाहीत. त्यामुळे ती पॅड्स तशीच फेकून दिली जातात. स्वच्छतागृहात पाण्यासारखी सुविधा नाही, पण पॅड व्हेंडिंग मशीन सारखी आधुनिक सुविधा ( बेजबाबदारपणे) आहे. यावर मात करून तुम्ही शिकण्याची अपेक्षा आहे.
असा मला समजलेला अर्थ.
हा अर्थ समजायला खरंच इतका कठीण आहे?

डिस्पोझल हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि जितेह मशिन आहे किंवा पॅड असण्याची शक्यता आहे अश्या सर्व जागी डिस्पोजर्/इन्सिनरेटर किंवा निदान नॅपकिन टाकायला कागदी/रद्दीच्या छोट्या पिशव्या हव्यात.(यात खूप रोजगार संधी आहेत.)

पॅड व्हेंडिंग मशीन गाजावाजा करत बसवून देणारे ( किंवा कुणीच/ शाळासुद्धा) नंतर डिस्पोजल कसं करायचं याचा विचार करत नाहीत. त्यामुळे ती पॅड्स तशीच फेकून दिली जातात. स्वच्छतागृहात पाण्यासारखी सुविधा नाही, पण पॅड व्हेंडिंग मशीन सारखी आधुनिक सुविधा ( बेजबाबदारपणे) आहे. यावर मात करून तुम्ही शिकण्याची अपेक्षा आहे.
असा मला समजलेला अर्थ. +११

स्वच्छतागृहात पाणी नाही पण सॅनिटरी पॅड देणारे मशीन आहे यात बेजबाबदारपणा कोणाचा? आणि कसा?
स्वच्छतागृहात पाणी नाही हा बेजबाबदारपणा आहे, यात संशय नाही.पण पाणी नसताना मुलींना पॅड मिळत आहेत हे वाईट आहे का?
पाणी नसताना, कापडाच्या घडय वापरणाऱ्या मुली असत्या तर त्यांचे शिक्षण बहुदा थांबलेच असते, कदाचित फुकट पॅड मिळत आहेत म्हणून त्या शाळेत तरी येऊ शकत आहेत.

पाण्याची/ड्रेनेज ची सोय नसताना ,कोणाची तरी फॅन्सी म्हणून एक स्वच्छतागृह उभे राहते . आणि केवळ शिकण्यासाठी विवशता म्हणून पाण्याअभावी गलिच्छ झालेल्या ठिकाणीच मुला मुलींना जावे लागते याबद्दल कोणाला कणव येत नाही का?

सॅनिटरी पॅड/डायपर/काँडम ची विल्हेवाट कशी लावायची हे ग्रामीण सोडून द्या, शहरी भागात तरी नीट सांगितलेले असते का?

अगदी पंचतारांकित हॉटेल मध्ये सुद्धा पॅड्स आणि काँडम शौचालयात दिस्पोज करू नका, तुंबले तर तुमच्या कडून पैसे वसूल केले जातील आशा इशारेवजा सूचनेच्या पाट्या दिसतात त्या का बरे?

कुठल्याही सोसायटी च्या पार्किंगमध्ये हमखास एक 2 तरी used कंडोम्स पडलेले दिसतात ते का?

डायपर्स विषयी तर न बोललेले बरे अशा पद्धतीत पडलेले दिसतात.

वर सांगितलेल्या गोष्टींची नीट विल्हेवाट लावली जात नाही हे खरे आहे, त्याबाबत पुरीशी जागृती देखील लोकांमध्ये नाही.

पण वर लिहिलेल्या गद्यामध्ये 2 संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र करून ,उगाचच विद्रोहीपणाचा आव का आणला आहे हे कळले नाही

पाणी नसताना मुलींना पॅड मिळत आहेत हे वाईट आहे का?>> नाही, डिस्पोजलची सुविधा नाही हे वाईट आहे. आणि त्याची जबाबदारी कुणी घेत नाही. शाळेत नाही, एरवीही नाही.

डिस्पोझल हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि जितेह मशिन आहे किंवा पॅड असण्याची शक्यता आहे अश्या सर्व जागी डिस्पोजर्/इन्सिनरेटर किंवा निदान नॅपकिन टाकायला कागदी/रद्दीच्या छोट्या पिशव्या हव्यात.(यात खूप रोजगार संधी आहेत.)

नवीन Submitted by mi_anu on 22 June, 2018 - 13:27>>>>१००

बरोबर आहे , नितान्त आवश्यकता आहे

दिस्पोजल ची व्यवस्था हवीच, यात वादच नाही
(हे विधान मूळ प्रतिसादात लिहायला विसरलो , नजरेस आणून दिल्या बद्दल धन्यवाद)
>>>>>>
त्याची जबाबदारी कुणी घेत नाही. शाळेत नाही, एरवीही नाही.>>>>>
मग" बायांनो जगत राहा" म्हणून इतर बायकांची पण कीव करावी का?

मला मुद्दा अजून समजत नाहीये,

पाण्याची/ड्रेनेज ची सोय नसताना ,कोणाची तरी फॅन्सी म्हणून एक स्वच्छतागृह उभे राहते . आणि केवळ शिकण्यासाठी विवशता म्हणून पाण्याअभावी गलिच्छ झालेल्या ठिकाणीच मुला मुलींना जावे लागते याबद्दल कोणाला कणव येत नाही का?>> हाच तर मुद्दा आहे ना. वापरून फेकलेली ( कारण डिस्पोजलची योग्य सुविधा नाही) पॅड्स त्या जागेला अधिक गलिच्छपणा आणतात.
पाणी नसताना, कापडाच्या घड्या वापरणाऱ्या मुली असत्या तर त्यांचे शिक्षण बहुदा थांबलेच असते, >> I don't want to go into details, पण २० वर्षांपूर्वी ( गावांमध्ये तरी) कापडी घड्याच वापरल्या जायच्या आणि मुली शिकत होत्याच.