यार हो

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:27

तसा भलताच चढतो रागाचा पारा
तू त्यातून पार हो

तसा काही खास नाही मी
एकटाच असतो यार हो

जगण्याला चढते नशा अहंकारी
भलतीच प्रसिद्धीची धार हो

मला नसते फाटकी झोळी खांद्यावरी
उरते फक्त कविता यार हो

तुला आठवताच कळते तुजविण नाही जगणे
ना जगण्याचे जुळते सार हो

तसा मी तुझ्यातला अथांग सागर
तुही आठवणींची वीज पिऊन यार हो

गुलाबी नव्हतेच दिवस कधी आपले
मृगजळाची बैसली एक तार हो

तसा फकीर स्वतःलाच आता
रोज रोजच म्हणतो "यार हो"
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults