अनोळखी

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:09

ओळखीचे डोळे दोन
त्यात अनोळखी कोण ?

तुझे माझे,याचे त्याचे
नात्याचे ...सारे साचे

कोण प्रेम,कोण मैतर
कोण फक्त जिवलग बर

तुझ्या माझ्या आत झरा
अंधार भिजे,सुटे गार वारा

कोणती मिठी दिली मला
काय नाव देऊ नात्याला ?

पुन्हा भेटू,वळून पाहू
आपण अनोळखीच राहू

कवी वेडा फकीर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults