झिरो (o) टीजर! काय आवडले आणि काय जास्त आवडले?

Submitted by भन्नाट भास्कर on 16 June, 2018 - 17:49

शाहरूखचा चित्रपट चालो न चालो. पण त्याच्या नवीन चित्रपटाच्या ट्रेलरवर लोकं नेहमीच तुटून पडतात.
ईदच्या मुहुर्तावर त्याने आपल्या आगामी चित्रपट झिरोचा टीजर रीलीज केला आणि चोवीस तासांच्या आत दोन करोडपेक्षा जास्त लोकांनी तो बघायचा विक्रम केला.
जर तुम्ही त्या दोन करोड लोकांमध्ये नसाल तर तुमच्यासाठी खाली लिंक देतो.
टीजर यूट्यूब ट्रेंडींगमध्ये फूटबॉल वर्ल्डकपला दुसर्‍या क्रमांकावर सारत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ही भारतीय चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे _/\_

#1 ON TRENDING
Zero | Eid Teaser | Shah Rukh Khan | Salman Khan | Aanand L Rai | 21 Dec 2018
https://www.youtube.com/watch?v=89aTDByJTz4

मला कमी जास्त आवडलेल्या गोष्टी

१) टीजरमधील शाहरूखची एंट्री. बॉलीवूडच्या ईतिहासात आजवर बुटक्यांचा वापर केवळ विनोदनिर्मितीसाठीच केला गेला आहे. पण झिरो मध्ये मेन हिरो खुद्द शाहरूख खान एका बुटक्याची भुमिका करत आहे हे बघूनच थक्क व्हायला होते. त्याच्या या प्रयोगासाठी त्याला त्रिवार हॅटसऑफ !!!

२) टीजर असा असावा की चित्रपटाच्या कथेची पुरेशी कल्पना न देता उत्कंठा वाढवावी. शाहरूखला बुटके बघून हा उद्देश साध्य होतो.

३) टीजरमध्ये जो एक छोटासा म्युजिकचा तुकडा आहे त्यावरून चित्रपटाचे संगीत चांगले असावे असे सध्या तरी वाटते.

४) शाहरूखसोबत यात सलमान दिसतो. दोघांना एकत्र बघणे चाहत्यांसाठी पर्वणी असते. शाहरूखला सलमानसमोर बुटके बघणे अजून मजेशीर वाटते. सलमान जर टीजरपुरता नसून यात पाहुणा कलाकार असेल तर आणखी मजा आहे.

५) बुटक्या व्यक्तींच्या नाचात एक टिपिकल उत्साह एक अतरंगीपणा असतो. शाहरूखने ती बॉडी लॅंगवेज नेमकी पकडल्यासारखे वाटतेय. त्यामुळे पुर्ण चित्रपटभर त्याने काय धमाल केली असेल हे बघायची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. कारण शाहरूख म्हणजे सळसळत्या चैतन्याचा झरा आहे ..

६) चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का आणि कतरीना कैफ अश्या टॉपच्या दोन लोकप्रिय अभिनेत्री आहेत. पण ते या टीजरमध्ये कुठेही नव्हत्या. त्यामुळे आता पुढच्या ट्रेलरची वाट तितक्याच उत्सुकतेने बघितली जाईल.

७) शाहरूखचा झिरो धो धो चालला तर बुटक्या व्यक्तींना नक्कीच एक ग्लॅमर येईल. कित्येकांना शाहरूख म्हणून हाक मारली जाईल. कित्येकांच्या मनातील न्यूनगंड निघून जाईल. ईन्शाल्लाह असेच व्हावे. टीजरला लोकांनी डोक्यावर उचलून धरले आहेच.

मात्र या सगळ्यात एकच गोष्ट खटकली. चित्रपट डिसेंबरला प्रदर्शित होतोय. आणि टीजर आताच रीलीज करून उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. त्यामुळे पिक्चर रीलीज व्हायच्या आधी मी मरून तर नाही ना जाणार ही भिती सतावू लागली आहे Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपाशी बोका, संकलनाबद्दल धन्यवाद.

आरारा, धाग्यावर मोदी आणू नका. एका धाग्यावर एक सुपर्रस्टार पुरे Happy

सस्मित, सलमानचा वापर करण्यात काही गैर नाही. कित्येक चित्रपटात सलमानने शाहरूखच्या साईड हिरोची भुमिका बजावली आहे.
उदा. कुछ कुछ होता है, हम तुम्हारे है सनम, करन अर्जुन वगैरे..
छोटा भाऊच आहे तो शाहरूखचा. ईदच्या मुहुर्तावर भाऊबीजेची भेट समजा.

फेरफटका, अवांतर नको म्हणजे माझ्यावर चर्चा नको. शाहरूखबद्दल ईकडची तिकडची काहीही चर्चा चालेल.
उदा. - शाहरूख हा कसा वाईट कलाकार आहे ते शाहरूखच्या चित्रपटाचे दुष्परीमाण वगैरे काहीही चालेल. फक्त शाखा सोडून जाऊ नका.

VB >>> मी ट्रेलर नाही पाहिला, अन बघणार ही नाही >>> गूड आयडीया ट्रेलर न बघता थेट पिक्चर बघा. मनाची पाटी कोरी राहील. त्या पाटीवर जे उमटेल त्या आधारे परीक्षण लिहायला विसरू नका. मी स्वत: कितीही प्रचण्ड चाहता असलो शाहरूखचा तरीही जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आणि परीक्षण वाचूनच चित्रपट बघायचा की नाही हा निर्णय घेतो.

टिजर मस्तय. शाहरुखची एन्ट्री आवडली. झिरोबद्दल आधीपासूनच उत्सुकता होती. श्रीदेवीचा कॅमियो आहे ना झिरोत? आता ट्रेलरच्या प्रतिक्षेत आहे. Happy

भभा, अवांतर म्हणजे विषयाला सोडून काहीही. आता एकदा विषयाला सोडूनच आहे म्हटल्यावर, त्याला मर्यादेच्या चौकटी नाही पुरवता येत. माझं आवाहन इतकच आहे, की हेच औचित्य / संकेत सगळ्या धाग्यांवर पाळावं.

टीझर बघितला, आधी कधी बघितलं नाही असं यात का 1 मिनिटांचा तुकड्यात काही दिसले नाही, उत्सुकता वाढेल असेही काही दिसले नाही. शाहरुखचा बुटका स्पेशल इफेक्टवाला असल्याने नेहमीचा शाहरुख आणि यातला शाहरुख यात फरक झीरो. झीरोचा अजून एक अर्थ दिसला यात.. गर्दी खेचणारा हिरो म्हणून शाहरुख झिरो झालाय हे आलेल्या दोन्ही चित्रपटवरून दिसलेच, हा चित्रपट फुल शिक्का मारणार.

अप्पूराजा बेस्ट होता व खूप चालला. स्पेशल इफेक्टची मदत न घेता कमलने बुटक्याचे काम केले. तामिळनाडू सरकारचे अवॉर्ड मिळाले ते घ्यायला तो अप्पू बनूनच गेला होता.

शाहरूख खान ही काय भानगड आहे हे शोधताना मला हे सापडले. हा अभिनेता आहे हे इथल्या चर्चेत कळाले. टीझर पाहताना दोन अभिनेते दिसले . त्यामुळे गोंधळ झाला. पण या व्हिडीओ मुळे त्यातला शाहरूख कोण हे तर समजलेच पण तो बुटका का झाला हे पण समजले.

https://www.youtube.com/watch?v=-4FRvKaskPs

तसेच या लिंक वर मुसलमान खान कोण हे समजल्याने उरला सुरला गोंधळ नाहीसा झालाच, पण सोबतच ऐश्वर्या कोण आणि या समलानचे आणि तिचे का बिनसले ही महत्वाची माहिती मिळाली.
https://www.youtube.com/watch?v=U515wxYpAhA

सलमान आणि शाहरुख म्हणजे 2 माकडे एकत्र, आता म्हाताऱ्याचे बुटक्या रुपातले घाणेरडे चाळे पाहावे लागणार इच्छा नसताना.
दारू पिणे वाईट असते, त्यामुळे शाहरुख म्हातारा झाला, शिवाय गलिच्छपणा आलेला सिगारेटी फुंकून.
सिगारेट फुंकल्याने कॅन्सर होतो म्हणतात. आणि कॅन्सर झालेल्या लोकांचे नातेवाईक उपाय शोधून बेजार होतात. कॅन्सर म्हणे मांसाहार केल्याने पण होऊ शकतो. अर्थात माझ्याकडे याबद्दल शास्त्रीय पुरावे नाहीत कारण मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे.

सलमान आणि शाहरुख म्हणजे 2 माकडे एकत्र, आता म्हाताऱ्याचे बुटक्या रुपातले घाणेरडे चाळे पाहावे लागणार इच्छा नसताना.
>>>
नका बघू मग.

कमल हसन तसा गुणी अभिनेता आहे. पण बरेचदा रंगरंगोटी अति करतो आणि त्यातच रमतो. काही वेळा त्या नादात ओवर अभिनय सुद्धा होतो. आमचे एक काका सद्मा चित्रपटाची आठवण सांगायचे. लास्ट सीनला जेव्हा तो श्रीदेवीला माकडचाळे करून दाखवतो ते बघून लोकांनी रडणे अपेक्षित होते तिथे सारे हसत होते.
हे राम चित्रपटात शाहरूख आणि कमल आमनेसामने आले होते. त्यात शाहरूखच्या एनर्जीने त्याला मात दिली हे कबूल करायला पैसे पडू नयेत.
आणि ते पुरस्कारांचे कौतुक नको. शाहरूखच्या बंगल्यात एक मोठाली रूम एवार्ड आणि ट्रॉफीसाठीच राखून ठेवली असेल.

दारू पिणे वाईट असते, त्यामुळे शाहरुख म्हातारा झाला, शिवाय गलिच्छपणा आलेला सिगारेटी फुंकून.
>>>>>
दारू सिगारेट ही व्यसने खरेच वाईट. पण प्लीज या कारणासाठी कोणाचा राग करू नका. अश्यांना सहानुभुतीची गरज असते. मलाही शाहरूखच्या या व्यसनांबद्दल वाईट वाटते. एवढा मोठा सुपर्रस्टार. पण त्यालाही या व्यसनांनी आपल्या विळख्यात ओढलेच Sad

साउथ चे हिरो सर्व माहिती आहेत. स्टारडम असावे तर असे. कमल हसन साउथ ला प्रचंड लोकप्रिय आहे पण हिंदीत नाही चालला. अभिनेता म्हणून तो रजनी पेक्षा श्रेष्ठ आहे. पण रजनीची जी क् क्रेझ आहे तिला जगात कुठेही तोड नाही. सिनेमा रिलीज झाला की बंद पुकारल्याप्रमाणे वातावरणात असते.

गर्दी खेचणारा हिरो म्हणून शाहरुख झिरो झालाय हे आलेल्या दोन्ही चित्रपटवरून दिसलेच, हा चित्रपट फुल शिक्का मारणार.
>>>>>>

साधनाजी,
शाहरूख म्हणजे केवळ चित्रपट आणि बॉक्स ऑफिस नाही. त्याचे ओळीने दहा चित्रपट फ्लॉप गेले तरी तो शाहरूख द किंग खान सुपर्रस्टारच राहील.

शाहरूख हा आजच्या घडीला या देशातील सर्वात मोठा ब्रांड आहे. जाहीरातीतील सर्वात मोठा आणि महागडा चेहरा. आणि जाहीरात त्यालाच मिळतात ज्याची लोकप्रियता अमाप असते हे साधे गणित आहे.

त्याचबरोबर तो देशातील सर्वात श्रीमंत कलाकार आणि जगातील दुसरया क्रमांकाचा श्रीमंत कलाकार आहे. त्यामुळे त्याचे चित्रपट पैसा किती कमावतात याचीही त्याला चिंता नसावी.

थोडक्यात दौलत शौरत ईज्जत एवार्डस वगैरे टोटल मारली तर शाहरूखसारखा शाहरूखच.

कमल हसन साउथ ला प्रचंड लोकप्रिय आहे पण हिंदीत नाही चालला.
>>>
सेम विथ रजनीकांत.
साऊथचे हिरो साऊथपुरतेच.
शाहरूखची क्रेझ ग्लोबल आहे.

खरंय मधुरा ताई, रजनी अन्नाचा करीष्माच वेगळा. (करीष्मा वेगळा का ब्र म्हणतात? करीष्मा वेगळी म्हणायला हवं ना? असो अवांतर नको. { खरंतर अवांतर नाहीये हे कारण एका स्टारबद्दल बोलताना [बोलता नाकी लिहिताना?] सुपर्र्र्स्टारचा निषेध होणं स्वभाविक आहे.} )

नविन काला पिच्चर आर्जवुन पहा, अभ्यंकर नावाचा खलनायक अगदी रिर्यल लाइफ दाखवलाय तिथे.

माफ करा पण काला दुर्दैवाने पायरेटेड पहावा लागला. कारण आमच्या श्रीगोंदे आणि पंचक्रोशीत काला रिलीज झाला नाही. पुण्यात पण रेस 3 कि काय नावाच्या मूव्ही मुळे तो उतरवला. अग्रजांघावर पाहिल्याने काही इफेक्ट्स मी मिस केले हे जाणवले.

मधुरा ताई?
अहो मी खूपदा सांगितले आहे. मधुरा तांबे असा समज करून घेतलेले तुम्हीच का ते? मधुरा तांबे, तांबेकर, आंबेकर अशी नावे अस्तित्वात असणार. माझ्यावर भलतेच बालंट येऊ शकते. तेव्हा मी जे नाव सांगितले आहे तेच माझे खरे नाव.

इतका भिक्कार टिझर आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.
------
शाहरुखने त्याच्या पूर्वीच्या चित्रपटात तो करत असलेले मर्कटचाळे मध्यंतरी थांबविले असे वाटत होते पण या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांने पूर्वीचे मर्कटचाळे पुन्हा एकदा सुरु केलेत असे टिझर पाहून दिसते.
------
या चित्रपटाच्या निमित्ताने शाहारुख पुन्हा एकदा, चांगलाच तोंडावर आपटणार असे सलमानच्या चेहर्‍यावरिल छद्मी हसू पाहून वाटते.

टीझर मस्त आहे.... बुटक्याच्या भूमिकेतला शाहरूखही आवडला...शाहरूखची फॅन म्हणूनही आवडला.... आता पिक्चर कसा असेल याची उत्सुकता आहे.... बघूया... Happy

ऋन्मेश आणि इतर आयडी मागच्या मुळ माणसा स-
शान्त राहून बोअर करण्याचे तुझे कसब खरच वाखाणण्यासारखे आहे.
मी सक्यतो तुझ्या नादा ला लागत नाही. पॅटर्न कळल्यापासून पोस्टस ओलान्डते.
पण चुकून इथे आले आणि बोअरच झाले. आअणि म्हणून हे सान्गितल्याशिवाय चैन पडेना. तु झ्या कष्टान्चे चीज झाल्याचे समाधान तुला मि ळेल.
ईतकी बोअर झाले नसते तर ह्या कसबाकरता फॅन हो ऊ शकले असते ! ( पॅरॅडॉक्स!)

टाईम मॅनेजमेन्ट वर एक लेख लिहाल का? ही खरोखरची विनन्ती आहे.
अस न्ख्य आयडीतून उत्तरे देत रहाणे हे खरेच अवघड असावे. कसे जमते?
इतक्या लोकान्च्या टोमण्यातून स्पष्ट बोलण्यातूनही शान्त रहाणे, बेअरिन्ग न सोडणे कसे जमते?

इरीटेट होणे किंवा बोअर होणे ही अत्यंत वैयक्तिक समस्या आहे. त्याला इतर कुणी काही करू शकत नाही. कपालभाती 20 चे 3 सेट्स करून पहावेत.

शाहरुखचं थोबाडही पाहवत नाही हल्ली, त्यामुळे पिक्चर/ट्रेलर वगैरे बघणे दूरच राहिलं. शाहरुख ने एक माणूस म्हणून केलेल्या स्ट्रगलचं खूप कौतुक वाटतं, पण अभिनेता म्हणून त्याचाइतका मेडिओकर कोणी नसेल असा आमचा ठाम विश्वास आहे. तसंही आमच्या आवडत्या अभिनेत्यांच्या मांदियाळीत हे व्यावसायिक समीकरण बसने शक्य नाहीये, त्यामुळे आपला पासच.

नानबा, तुम्ही माझ्या टाईम मॅनेजमेंटचे कौतुक करताना माझी कामगिरी ओवरएस्टीमेट करत आहात.
जसे ऋ हा माझाच आयडी आहे. पण आता ऋ बंद आणि भास्कर चालू आहे.
समजा अभिषेक सुद्धा माझाच आयडी आहे. तरी तो सुद्धा सक्रिय नाहीच.
चला अर्चना सरकार सुद्धा माझाच आहे असेही समजा. तर मला नाही आठवत त्या सुद्धा जास्त सक्रिय आहेत वा कधी होत्या.

बाकी मधुरांबे वा नवीन आलेल्या पोरी (?) वगैरे आयडी उगाच माझ्या खात्यात मारून मी चोवीस तास ईथेच पडून असतो असा निष्कर्श काढात तर मी झोपत कधी असेन? हे तुम्हीच मला सांगा...

पण हा धागा नको..

एका धाग्यात दोन शाहरूख नको _/\_
ईथे फक्त झिरो वर बोलूया. या हिरोबद्दल पुन्हा कधीतरी Happy

पण या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांने पूर्वीचे मर्कटचाळे पुन्हा एकदा सुरु केलेत असे टिझर पाहून दिसते.
>>>>

ती भुमिकेची गरज असेल.
उद्या जर रामायणावर पिक्चर निघाला आणि वानरसेनेने मर्कटचाळे नाही केले तर त्याला काय अर्थ राहील?
त्यामुळे चित्रपट बघा आणि मग ठरवा Happy

बाकी मधुरांबे वा नवीन आलेल्या पोरी (?) वगैरे आयडी उगाच माझ्या खात्यात मारून >>> अहो भास्कर राव, तुम्हीच सुरूवात केलीत कि मधुरांबे हा माहाच आयडी आहे म्हणून. मी तेव्हांच म्हटलेलं की आता तुम्ही जरी म्हणालात की आमच काही संबंध नाही तरी फायदा नाही व्हायचा काही. आता सर्वांची जणू काही खात्रीच झालेली आहे. फक्त मलाच काय ते ठाऊक की मी स्वतंत्र आहे.

Pages