घर आज रिकामी

Submitted by अजय चव्हाण on 13 June, 2018 - 08:57

घर आज रिकामी ..
तिकडे तु इथे एकटा मी..
खिडकीतला वारा परत फिरून गेला..
तु नाहीयेस घरात बहुतेक कळलं त्याला..
काही क्षणांची सोबत पाऊसाने केली..
आलेला तो तुला भिजवायला पण
तु नाही म्हटल्यावर तोसुद्धा निरोप ठेऊन गेला..
आठवणींच्या गाठोड्यात शोधत तुला बसलो..
कित्येकदा हसलो आणि मग नकळत रडलो..
बोलतो आपण फोनवर पण त्यात सहवास नाही..
फुले प्लॅस्टीकची सुंदर पण सुवास नाही..
सुवासलेल्या मनाला थोडं आवरतो मी..
तुझी सवय असलेल्या घराला सांभाळतो मी..
सांभळता सांभळता तुला आठवतो मी..
आणि आठवाच्या खुणांत त्या मन होतं निकामी...
हळूच कोरड्या नजरेने भोवती पाहतो मी
मग तेव्हा जाणवतं घर आज पुन्हा रिकामी..
तिकडे तु इथे एकटा मी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice