बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मामी मी दिलं स्मिताला. तिला दिलं नाही तर माझं मन मला खात राहीलं असतं. दुसरं देऊ शकतो ना, तर शराला देईन. मागे तीन दिली तिघांना पण कळलं नाही नीट मला.

स्मिता मधे अजीबातच हिम्मत आणि समज नाही हे तिने सुशांत प्रकरणावेळी सगळ्यांना दाखवून दिले आहे. अशा वीक कॅन्डीडेट ला वाचवण्याची गरज नाही खरेतर.

मला वाटतं शेवटी bb ठरवणार त्यांना स्मिता नको असेल आणि भूषण हवा असेल तर ते तसं करतील. पण मी नाही रिस्क घेऊ शकत. मला स्मिताची काळजी वाटते म्हणून मी स्मितालाच दिलं.

सॉरी.. पण मी स्मिताला मत दिले. बोलण्याचा प्रॉब्लेम असूनसुद्धा, ममांसकट आऊचे टोमणे खाऊनसुद्धा ती खुप डिसेंटली वागलीये या ५८ दिवसात. स्वतः एक पट्टीची खेळाडू असूनसुद्धा इथे घरात तिला दुय्यम स्थान मिळालं, जे चुकीचं होतं/आहे. सारखं डंब म्हणून सै-मेघाने तिला हीणवलं देखिल आहे. त्यामुळे यावेळी माझं मत स्मिताला.

स्मिताच्या काही गोष्टी खटकतात मला, नो डाऊट पण तिचे दुर्गुण फार हायलाईट केले जातात आणि बाकीच्यांचे बरेच लपून राहतात. तिच्यात चांगले गुण जास्त आहेत असं माझं प्रामाणिक मत. ती जावी असं मला वाटत नाही.

कालचा भाग ऑन अ‍ॅन्ड ऑफ पाहिला. फार निट कळला नाही कारण ऑफिसच्या कॉलवर होते.
ते काळं फासताना आऊ किती बडबड करत होती Sad तिला काहीच स्पोर्टिंगली का नाही घेता येत? बरं तिला एकटिलाच नाही बोलत, सगळ्यांना काही ना काही टायटल मिळतेच, तरि पण तु दुसरं कारण द्यायला हवं होतंस असं कुणाला तरी म्हणाली, आता कोणतं कारण दिलं तर ही बाई आनंदाने नॉमिनेट होईल? Uhoh

मला पण शरा जाईल की काय अशी भिती वाटतेय. पण तिच्या अगोदर किशोर आणि भूषण्या जायला हवेत. किशोर तर आधी. वर कुणितरी म्हटलंय तसं त्याचा वावर मला पण खूप निगेटिव्ह वाटतो.

>>स्मिता सुंदर आहे, स्वभावाने चांगली असली तरी तिला 'समज' नाही. आणि धीटपणे स्वतःचे मत मांडणे , दुसर्यासाठी स्टँड घेणे तर तिला अजीबातच जमत नाही. >>
अगदी अगदी....दुसऱ्यांसाठी काय...स्वतःसाठी पण काल घ्यायला गेली शिकवणी झाल्यावर आणि हस करून घेतलं...

मी माझ मत स्मिताला दिलय.
मला आवडेल तिचा खेळ पाहायला.. सगळेच एका टिमचे शेवटपर्यंत राहुन काय फायदा..
एखादा सॉल्लिड प्लेअरपन हवा ना.. आणि खर तर मला तिचा वावर त्यातल्यात्यात आवडतो..
छान दिसते,, टिपटॉप राहते. आगाऊपणा कमी करते, येड्यासारखी मुर्ख लोकांवर भरोसापन ठेवते, कुणाशी जास्त लगट करत नाही म्हणजे अतिप्रेम वगैरे दाखवत नाही, जेवढ्यास तेवढ ठेवते अन मुख्य म्हणजे काय खतरनाक एक्स्ट्रा करिकुलर अ‍ॅक्टिविटिज आहे तिच्या..कधीच मला हे नाही जमणार ते नाही जमणार असलं काही बोलत नाही...
श रा वाचेलच लोकांमुळे अस वाटत.. स्मिताला पाठिंबा असुनही वाईटांशी संबंध म्हणुन तिला धोका वाटतो मला..
वर बि बॉ ने ठरवल कि भूषणला सेफ करुन स्मिताला काढायच्च तर तसेही कुणाचे वोट ते ध्यानात घेणार नाही जे वाईट आहे...
असो.. श रा मला आवडते आणि ती नाही जाणार याची मला खात्री वाटते. पण माझ वोट स्मिताला..

ते काळं फासताना आऊ किती बडबड करत होती Sad तिला काहीच स्पोर्टिंगली का नाही घेता येत? >> आउने काळेला काळं फासलं का?? Light 1

टीना कित्ती छान मुद्देसूद लिहिलंस.

स्मिता आत्ता तरी जावी असं मला वाटत नाही. काहीजण तिच्याआधी जाणे डिझर्व करतात.

काल चौगुले किती विचित्र पद्धतीने काळे लावत होता पुष्कर आणि मेघाला... अक्षरश: फासत होता.
खटकले ते.

पुष्कीला स्मिताने nominate केलं त्याची जळजळ सईने काढली स्मिताला nominate करून. ती चौगुलेला करू शकली असती. रेशमने तिला मत दिलं म्हणून तिला केलं नाही nominate सईने ते योग्य म्हणा पण चौगुलेला करायला हवं होतं.

काल चौगुले किती विचित्र पद्धतीने काळे लावत होता पुष्कर आणि मेघाला... अक्षरश: फासत होता.
खटकले ते >>> तो फार विचित्र वाटतो मलाही. वाचला तो यावेळी.

श रा वाचेलच लोकांमुळे अस वाटत..
>>
असे सांगून जर सगळेच त्या स्मिताला वोट करत बसले, तर कसली वाचतेय श रा Happy
अश्याने श रा एलिमिनेट होईल आणि स्मिता व तो पाताळयंत्री कडु राहील घरात. Sad

कडू जायला हवाय. श रा ला मे स चे चाहते वोट्स देतील असं मला वाटतं. एकचं द्यायचं आहे म्हणून मी स्मिताला दिलं, दुसरं देऊन चालणार असेल तर मी श रा ला देऊ शकते.

दक्षे तुझ्याच कमेंट्स वाच काळेवरच्या. म्हणून मला आपल वाटल की तुला वाइच ज्यादाच वैट वाटल आणि ती कमेंट टाकलीस आउवरची. म्हणून तो Light 1

खरेतर श रा आणि स्मिता दोघीही चांगल्या आहेत. त्यांना बघायला छान वातते. तो भुषण च गेला पाहिजे. भूषण जावा या आठवड्यात.

माझ बहुमूल्य मत मी आता स्मिताला देऊन आले. मला स्मिताला टॉप ३ मधे पाह्याच आहे.
टीना च्या पोस्टीला +१. तिने खरं थोड लीड घेऊन ,अग्रेसिव्हली गेम खेळला पाहिजे आता.
सगळे ग्रुप मधेच राहुन खेळ खेळत आहेत्,प्रत्येकाला एक तर मेघा नाहीतर रेशम ग्रुप जॉईन करावा लागतोय.वाईल्ड एंट्री वाल्यांनी तरी किमान ३ रा ग्रुप करायला हवा होता.

अरे करा ज्यांना करायचं आहे त्यांनी श रा ला. माझा तरी पहिला choice स्मिताच. एक वोट द्यायचं असेल तर मी तिलाच देणार Lol मीन्स दिलं.

Pages