पाऊस

Submitted by अन्नपूर्णा on 9 June, 2018 - 06:55

नमस्कार समस्त मायबोलीकर..... माझे हे माबोवरील पहिलेच लिखाण आहे. त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी. धन्यवाद!!

पाऊस माझ्या मनातला...
तुझ्या आठवणींत रमलेला....
तू असताना, तू नसताना...
तुझ्यातच गुंतलेला..‌‌..

पाऊस तुझ्या आठवणींचा ...
कधी अवचित कोसळणारी वळवाची सर, तर कधी तृषार्त मनाला शांत करणारी शीतल मृगसर...
कधी रिमझिम बरसणारी सुखदुःखांची श्रावणसर ...
तर कधी आठवांची न थांबणारी संततधार....

पाऊस तुझ्या- माझ्या स्वप्नातला .....
जीवन मृद्गंधाने सुगंधित करणारा.....
तनामनाला तजेलदार करणारा...
सृजनाचा नवीन ऋतू घेऊन येणारा...

पाऊस........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...
अप्रतिम....
लिहीत रहा.....

धन्यवाद Mr. Pandit, Bw
तुम्ही सुचवलेली कविता फार सुंदर आहे.