कुठे गेले?

Submitted by वारा on 23 March, 2009 - 05:23

सुनं आकाश,
नाही पाखरु!

एकटं झाड,
नाही पान!

मेघ दाटला,
तरी कोरडा!

वार्‍याचा श्वास,
जाहला संथ!

चालती वाट,
सरत आली!

हिरवा माळ,
बोडका झाला!

सारे चैतन्य,
कुठे गेले ?

गुलमोहर: 

वार्‍या खुप छान वाहतोयस.

छोटीच पण छानच,, खुपच आवडली !!
Happy
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

वार्‍या, अजून दोन ओळी लिहून शेवट होईल. सध्या तरी अपुर्ण वाटतेय. पटतय का ???
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" कवतुकराव,
अजून दोन ओळी लिहून शेवट होईल ?

चालती वाट,
सरत आली!

हिरवा माळ,
बोडका झाला!

"

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" कवतुकराव,
अजून दोन ओळी लिहून शेवट होईल ?

सुनं आकाश,
नाही पाखरु! .............

..............................

हिरवा माळ,
बोडका झाला!

या सगळ्याचा अर्थ कळूनही पडलेला प्रश्न आहे गा हा !"

छान छान छोटीशी सुंदर कविता. मी धरून फक्त सातच प्रतिसाद? फक्त सातच? बाकीचे "कुठे गेले?"

शोधा म्हणजे सापडेल
सारे काही अंतर्मनात दडलेय !

आवडली कविता.

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

सुरेख !! अलवार वाहतोयस !!!

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )