गझल - माणसे तोडणे चांगले

Submitted by बेफ़िकीर on 8 June, 2018 - 11:05

गझल - माणसे तोडणे चांगले

माणसे तोडणे चांगले
की मने मोडणे चांगले

ही न राहू शकत एकटी
ओळ ही खोडणे चांगले

जे तुला पाळणे साधते
ते गुपित फोडणे चांगले

तू मला सोडण्याहूनही
मी मला सोडणे चांगले

अर्ज पाहो न पाहो कुणी
दाखला जोडणे चांगले

-'बेफिकीर'! (०८ जून २०१८)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गझल.

जे तुला पाळणे साधते
ते गुपित फोडणे चांगले >>> हा शेर नाही कळाला

कमी शब्दात!
खुप दिवसानी कमी शब्दातली गझल - मस्त

'ही न राहू शकत एकटी
ओळ ही खोडणे चांगले'

हे खास