परोमा: भूमिकांच्या पलीकडे जाउन स्त्रीत्वाचा शोध

Submitted by अश्विनीमामी on 1 June, 2018 - 03:13

चित्रपट सुरू होतो तोच पुजोबाडीच्या उत्साहित करणार्‍या, प्रफुल्लित वातावरणात, तयारी चालली आहे . लगबग, गडबड संगीत... सुस्नात, सिंदूर लावलेल्या लाल काठाच्या साड्या नेसलेल्या वंगललना कामात मग्न आहेत. मुले धडपडत आहेत. बाप्ये गप्पा मारत बसले आहेत. ह्याचे एक केंद्र आहे ती मूर्ती आणि दुसरे आहे काकीमा/ बौदी परमा चौधरी, धाकटी सून. म्हणजे आपली राखी - इतके सोज्वळ खानदानी सौंदर्य, त्यातही फारशी जाणीव न ठेवलेले. घरकामात, पूजेच्या तयारीत मग्न.

ह्या घरगुती माहौल मध्ये आलेला एक सर्वस्वी परका - राहुल - फोटोग्राफर ,तिच्या सौंदर्याने मोहित होतो व एक फोटो फीचर करायची रीतसर परवानगी घेतो. परमा प्रथम बावचळते.पण मग हो म्हणते.घरात नवरा सर्वोच्च स्थानावर, त्याही वर सासुमा, व मग मुले ह्यांचे करण्यात स्वत्वाकडे दुर्लक्ष झालेली ही चाळीशीची गृहिणी. तिचे माहेर असे तसेच. एक लग्न झालेला भाउ आणि म्हातारी आई.- सुनेच्या राज्यात दबलेली.

नवरा रात्री दिवा बंद करतो तेव्हा ती चटकन ऑटोमेटेड रिस्पॉन्स असल्यासारखी त्याला सामोरी जाते. ( अचानक सापडलेली सतारीची नखी विसरून) मुलांचे सासूचे करण्यात, कधी मधी किटीपार्टीला जाण्यात दंग.

राहुलचा कॅमेरा तिला दशदिशांनी सिड्यूस करतो. फोटो प्रक्रियेत ते दोघेही मनाने शरीराने जवळ येतात. तिच्या मनाला पंख फुटतात. पण झेप घेण्याआधी तिचा हा विवाहबाह्य संबंध घरच्यांना कळतो. मग तिला रिजेक्ट केले जाते. मुले नवरा सासू, घरचे नातेवाईक तिला मखरातून काढून फेकून द्यायला बघतात. त्यांना तिची घृणा, तिरस्कार वाटतो. नवरा तर इगो दुखावल्याने अगदीच संवाद तोडतो.पण तिला अपराधी वाटत नाही. उलट् ती स्वतःशी जडलेले नाते जोपासू बघते. नोकरी करून चरितार्थ चालवायला जमेल का ते चाचपते. शरीराच्या नव्या जाणिवा पुसून न टाकता पुढे जाते. इतकी बेसिक ही कथावस्तु.

चित्रपटाचे वेगळेपण आहे त्याची ट्रीटमेंट. एका संवेदनशील स्त्री दिग्दर्शिकेने बनविलेला जेनिफर ह्या आपल्या मैत्रिणीला अर्पण केलेला चित्रपट. परमेचे व्यक्तिमत्व तिच्या कौटुंबिक सामाजिक भूमिकेत इतके मिसळून, हरवून गेलेले असते कि ती देखील आपले स्वत्व विसरून जगत अस्ते आणि सुखी देखील दिसते. राहूल च्या निमित्ताने शरीर मनावर जमलेली सुखवस्तू धूळ उडून जाते व आतले कलासक्त, हसरे मन झेप घेउ पाहते. राहूल पहिल्यांदी तिच्या माहेरी गच्चीवर एकांतात तिचे पहिले चुंबन घेतो तो सीन अतिशय सुरेख चित्रीत केला आहे. एक स्त्री दिग्दर्शकच इत की लिरीकल संवेदनशीलता दाखवू शकते. त्याच्याबरोबर अनिर्बंध असे सूख अनुभवल्यावर तिला परत नवृयाबरोबर संसार करणे अतिशय जखडल्या सारखे वाट्ते ती मुक्त होउ बघते. ती असे करू पाहते आहे ह्या शक्यतेनेच नवर्‍याचे विश्व हादरते. तो तिला हातखर्चाला जास्तीचे पैसे देउन समेट घडवू बघतो. पण आधी तिला वेश्या म्हणून त्याने नाते काय लेव्हलला आहे ते स्पष्ट केलेच आहे. हा सीन बघवत नाही. मुले, सासरचे दूर जातात. जी भूमिका इतक्या सहजतेने इतकी वर्षे नि भवली ती हातातून सहज निसटून जाते. त्याचे स्पेक्स बदलले की अ‍ॅप्रुव्हल रेटिंग गेल्या सारखे.

एका अलिप्त भावनेने ती हे सर्व नाकारते व स्वतःचे जीवन जगू पाहते. त्यात तिला राहूल आला तरी आता फारसा फरक पडणार नाहीये. त्या सुखद पण अल्पजीवी नात्याने तिला एका वेगळ्या शक्यतेकडे धाडले आहे. आधीच्या मजबूत बांधण्या तोडमोड करून.

राखीने ह्यात अतिशय सहज अभिनय केला आहे. अप्रतिम दिसते. आपल्यालाही प्रेमात पडायला होते. काय ते सुरेख लांब केस, ते डोळे आणि ते कुंकू. ते हसणे, त्या सुती साड्या आणि तो गृहिणीचा वावर. ते राहूल म्ह्णून चित्कारणे. ते बिलोरी हसणे.

आजच्या मानसिकतेतून बघायला गेले तर अनजान माणसा बरोबर कोणी इतक्या लिबर्टीज घेणार नाही. दूर फिरायला जाणे, काय छापणार ह्या बद्दल करार नसणे, फोटो काढताना तिसरे कोणीच नसणे. पण ती काही ट्रेन्ड मॉडेल नाही.

राहुलच्या सहवासाची चटक लागल्यावर तयार होउन जाताना सासूने/ मुलीने हटकल्यावर ती बावरते, बिचकते पण तरीही जातेच. एक प्रकारे इच्छेची बळी. आपले कुटुंब खरे तर आपले नाहीच ही तिला जेव्हा जाणीव होते तो खरा मुक्तीचा क्षण. मग पुढे राहूलची साथ असो वा नसो. हाच मुद्दा लंचबॉक्स चित्रपटातही आला आहे १९८४ मधली मानसिकता, नैतिकतेच्या कल्पना आता जरा विचित्र वाटतात.
वैयक्तिक स्वातंत्र्या बाबत तर आपण माय चॉइस हे वळण घेतले आहे. तीस वर्शापूर्वी आलेल्या ह्या चित्रपटाने भद्रलोक
मानसिकतेला तडा गेला असेल कि नाही माहीत नाही पण तो एक सशक्त प्रयत्न तरी आहे.तिच्या बाजूने पाहिले तर जरी काही एक मोडतोड झाली तरीही तिला आयुष्यात काही जेन्युइन सुखाचे क्षण मिळाले तरी. व्हेन यू फील ११० % अलाइव्ह. नुसते इंटीमेट नाही तर एका छान सहचरा बरोबर काहीही करण्याचे. त्यात ते एकाठीकाणी जातात व ते लोक त्यांना अमेरिकेत कारावान घेउन हिंडणारे समजतात. परमा जिथे तिथे सतारवादनाचे कार्य क्रम करते असे राहूल थापा मारतो. तर ते विचारतात मग तबला कोण वाजवते साथीला? तर ती म्हणते अल्लारखा !!! राहूल तर चोकच होतो हसून. नवरा तिला फारच गृहित धरतो. मला तर ते जास्त व्हायोलंट वाटले. स्त्री, तिचे रूप, अस्तित्व
एका चौकटीत घट्ट बसवायचे. तरच ते सुखद आहे; हे पटत नाही. जगू दे कि तिला मोकळे.

बिग बॅड इंटरनेट. यूट्यूब वर भाग सहा, सात आठ चे व्ह्यूज आहेत २ ४ ते ८ लाखाच्या घरात. फॉर द इंटिमेट सीन्स. :angry: बाकी भागांचे हजाराच्या घरात. शेवटच्या १२ व्या भागात कथेची संगती पूर्ण होते. ती शोधत असलेले झाडाचे नाव तिला सापडते. मध्यमवर्गीय गृहिणीच्या जीवनात घडणार्‍या नाट्याचे साधे चित्रण. जीवन बदलून टाकणारे मोहाचे क्षण...त्यांना हो म्ह्णायचे कि नाही हा आहे खरा हर चॉइस.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला राहुलचे पात्र शुद्ध धूर्त वाटले. ही अनभिज्ञ आहे हे कळताच त्याची प्रत्येक मूव्ह तिला आपलेसे करून घेण्यासाठीची वाटते. परत इन्वॉलव्ह्मेंट काही ही नाही परत किती इन्सेन्सिटिव्ह. एकतर तिच्या कन्सेंट शिवाय तसे फोटो का ढून घेतले व लाइफ मॅगेझिन मध्ये पब्लिश केले ह्याचा तिच्या लाइफ वर काय परीणाम होईल ह्याचा काहीही विचार नाही. मॉडेलिन्ग करण्या आधी काँट्रॅक्ट असावे लागते ते व्हायोलेट केल्यास कोर्ट केस करू शकतो. आणि इथे ही बाई मेरीली स्वतःचे जीवन बर्बाद होउ देते. एखाद्या ंमृगजळा पाठी धावल्या सारखे. आता कसे व्हि डीओ फोटो नेट वर अपलोड करतात त्याचीच ही जुनी आवृत्ती आहे. आपण प्रेमात आहोत अश्या समजुतीने स्वतःचे असे फायदे घेउ दे णार्‍या स्त्रिया असतात. हा अनुभव इतका प्रेशस होता का? ज्या साठी आधी एक एक क्षण करून बांधलेले सर्व आयुष्य भिरकावून दिले? वॉज इट वर्थ? असे त्या व्यक्तिरेखेला वाटले असेल का? सिनेमाच्या शेव्टी असा एपिलॉग दाखवू शकले असते.

अमा,
भूमिका चित्रपटाबद्दल लिहाल का? हा वरचा प्रतिसाद वाचून नसरुद्दीन शहाचे पात्र आठवले...

अमा... Happy ..तुम्ही एकाच घटनेला किंवा केरेक्टरला दोन ॲंंगल्स मधून तितक्याच प्रभावी पणे बघू शकता..!
आपण प्रेमात आहोत अश्या समजुतीने स्वतःचे असे फायदे घेउ देणार्‍या स्त्रिया असतात. ... हे खरे आहे. मी स्वत: अशा दोन- तीन स्त्रिया पाहिल्या आहेत..ज्या नवरा, गोड मुलं असा संसार सोडून टोटली इनकंपॆटीबल माणसाच्या नादी लागल्या... व आपले आयुष्य पार उध्वस्त करुन टाकले......शेवटी आयुष्यात सर्वोच्च, सर्वोत्तम, एकमेव असे आपल्याला काय हवे असते....हा खरा प्रश्न आहे! त्याचे उत्तर आपल्या आयुष्याची दिशा ठरविते.

ज्या नवरा, गोड मुलं असा संसार सोडून टोटली इनकंपॆटीबल माणसाच्या नादी लागल्या... >> हे बाहेरुन बघणाऱ्या त्रयस्थ माणसाचे मत असते. प्रत्यक्ष तो माणूस कशातून जातोय ते त्याचं त्यालाच माहित. किंवा आपापल्या कुवतीनुसार तो अर्थ लावायचा प्रयत्न करत असतो.

यानिमित्ताने जुनाच एक प्रश्न परत पडला:

तिसर्याने मधे कडमडून दोघांचं नात बिघडवल असतं कि दोघांच्या नात्यात आधीच दरार होती म्हणून तिसरा/री तिथे एन्ट्री मारू शकला?

अमा... Happy ..तुम्ही एकाच घटनेला किंवा केरेक्टरला दोन ॲंंगल्स मधून तितक्याच प्रभावी पणे बघू शकता..>> समजून घेतल्या बद्दल धन्यवाद. मी अनेक वेळा बघून मला दरवेळी नवे कळले म्हणून लिहीले. शिवाय माझी एंपथॅटिक पर्सनॅलिटी आहे मला सर्वांच्या बाजू समजून घ्यायच्या असतात. डबल ढोलकी असे नाहे. खरंच. तिच्या बाजूने एक मुक्तीचा अनुभव. आणि ही इज जस्ट नॉट दॅट इन टू हर ऑर एनिवन. स्वतःतच मग्न आहे. कोबाल्ट ब्लू मध्ये भावा बहिणींना स्वतःत गुंतवून मग निघून जाणारे असे एक पात्र आहे.

नाही.. Happy डबल ढोलकी असे नव्हते म्हणायचे मला....!!
म्हणजे तिच्या बाजूने एक मुक्तीचा अनुभव असेलही..पण अ‍ॅट व्हॉट कॉस्ट?
अ‍ॅमी...... मोस्ट ऑफ द टाईम्स...... दोघांच्या नात्यात आधीच दरार असते..म्हणूनच तिसरा तिथे एंट्री घेऊ शकतो!

मोस्ट ऑफ द टाईम्स...... दोघांच्या नात्यात आधीच दरार असते..म्हणूनच तिसरा तिथे एंट्री घेऊ शकतो! >> सहमत आहे. म्हणूनच जेनिफर अनिस्टनच्या पंख्यांनी अँजेलिनाला नाव ठेऊ नयेत Wink

संपादन (4 hours left)
नाही.. Happy डबल ढोलक असे नव्हते म्हणायचे मला....!!>> अहो तुमचा प्रतिसाद छानच आहे. कृपया गैर्समज नको इतर कोणास तसे वाटू नये म्हणून तिथे क्लिअर केले. गोडच तुम्ही आंबट नाही.

अ‍ॅमी प्लस वन्न.

Pages