का असं वाटत

Submitted by मी संतोषी on 25 May, 2018 - 07:11

क्षणभर स्तब्ध रहावं
हरवलेलं पुन्हा शोधावं
चिंतामुक्त व्हावं
मनाला शांत करावं
कसलाही दडपण नको
अपेक्षा पण कसल्याही नको
दगदग नको
मन मानेल तिथं उडावं
तृप्तीचे ढेकर देत शांत
निळ्या आंबराखाली
चांदण्याच्या पांघरुणात
जन्म मरणाचं अंतर विसरत
फक्त स्वतःसाठी
थोडे दिवस तरी जगावं

मी संतोषी
१८ मे २०१६

Group content visibility: 
Use group defaults