लगोरी

Submitted by सुप्रिया जाधव. on 23 May, 2018 - 12:34

काही उत्कट क्षण हवे असावेत त्याला
फक्त त्या त्या क्षणांपुरतेच !

तिला,
त्याच त्या अविस्मरणीय क्षणांच्या आठवणींची
एकसंघ चळत !!

नेम धरून मारलेल्या
वास्तवाच्या चेंडूने
क्रमवार रचलेल्या
आठवणींच्या ठिक-या
क्षणार्धात जमिनदोस्त होतात तेव्हा

एक एक ठिकरी
जिवाच्या आकांताने
पुन्हा एकावर एक रचताना
कोण त्रेधा उड़ते तिची !

आणि तो ?

निश्चल-उत्सुक,
नविन डावातील
अत्युत्कट क्षणांच्या प्रतिक्षेत !!!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वास्तवाचा चेंडू आणि आठवणींच्या ठिकऱ्या.. लागोरीच्या खेळाला तुम्ही खतरनाक उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अप्रतिम!

तुमचा (आ)वेग पण जबरदस्त आहे, की आधीच लिहून ठेवलेल्या आहेत या कविता?