गंध

Submitted by सेन्साय on 23 May, 2018 - 01:14

मद कस्तूरी गंधाचा
सपशेल आज हरला
घर्मबिंदु जोतावरुन जेव्हा
काळ्या मातीत मिसळला

चंदनभारित आसमंतही
अवचितपणे ओशाळला
नव शिशुच्या उटण्याला
जेव्हा धुप प्रसन्न दरवळला

वाऱ्याच्या झोतावर चौखुरलेला
केवड़ाही अलगद थांबला
तुझ्या आगंतुक चाहूलीने जेव्हा
स्वर्गीय दरवळ मोहक पसरला

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users