दुधाची कडी वाली किटली

Submitted by Swapnilkulkarni on 20 May, 2018 - 10:27

ब्लॉग*********
* ****दुधाची कडी वाली किटली*****
गुडी पाडव्या ला आपल्याकडे प्लास्टिक बंदी घोषीत
झाली. दूध डेअरी,गोठया वर खास नोटीस लागली , अमुक तमुक तारखेपासून प्लास्टीक पिशवी बंदी,दूध व दहीसाठी आता किटली चा वापर करा आणि चुकून सुद्धा प्लास्टिक पिशवी मागणी करू नका। याच मुहूर्ता वरती
आणि जुन्या काळापासून (दशकांपूर्वी)दूध घरी ने आन करण्यासाठी वापरली जाणारी दूध किटली रॅक मधून स्वच्छ पुसून पासून हातात आली।काहींनी नवीन खरेदी केली असेल महिन्याच्या आर्थिक बजेट मध्ये
किंचीतशी वाढ चालतय की।,पॉलीथिन बॅग च्या प्रसार होण्यापूर्वी काचेच्या बाटल्या, किटली या सारखी साधने होती।
लहानपनी,अगदी सांगायचे तर शालेय दिवसात आपले दूध वाले काका घरपोहच दुधाच वाटप करीत त्यावेळी घरातील अर्धा लिटर असो वा एक लिटर पातेली,गंज, गडु त्यांच्यासमोर त्यातच दुधाचा साठा त्या दिवसाचा. घर पोच दूध आले तर ते पातेल्यात असे. काही माणसे
खूप हौशी असतात ना विशेषतः धारोष्ण दुधाबद्दल अति जागरूक असलेली काही जेष्ठ अभ्यासू मंडळी चा रस्ता सरळ गोठ्या कडे जाणारा होता .त्या वेळेस या दुधाच्या किटल्यां चा ताफा रमतगमत सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी दिसत असे।हातात किटली ,लहानसा मॉर्निंग वॉकचा पट्टा ,गँप्पा चा फड आनी दूध घरात सगळ्यांसाठी !!!!
बोलतात ना जूने दिवस रम्य असतात त्याला काही अशा जऱ्या हटके बाबीं ची किनार असते.मी लहानपणी अनुभवलेल्या, पाहिलेल्या ह्याच गोष्टी पण काळ बदलत असतो तशी जीवनशैली सुद्धा अपडेट होत असते . ज्या वेळेस(आता) आपण स्वतः या जबाबदारीतून जातो ना
तेव्हा या गोष्टी ची मजा येतेच त्यासोबत फील इट ची भावना !!!!!इतकेच आणी बरेच काही!!!!
पॉली थिन वापर या निमित्ताने कमी होणार याच स्वागत आहे, नवीन सवयीला आपलस करणं ही
अवघड गोष्ट असली तरी अशक्य नाही आहे ...
तरी बदल स्वीकारावा आणी रोजच्या जीवनात तो अमलात आणावा हे नित्याच आहे भारतीय मनाला ,,यात दुमत असू शकते बर का !!!
किंवा कमी अधिक प्रमाणात उहापोह ...
कडी ची किटलीच असेच काही आहे, किटली वापर पुन्हा होतो तो ही नव्याने हे नवीन ,बरेच दिवस जातील मग १००टक्के प्लास्टिक बंदी अमलात येईल ..
आणी हळूहळू आपली जनता या बंदीला स्वीकारातली नोटबंदी सारखं कुठे आनंद तर कुठ मनस्ताप ,,,चालतय की धकतय की!!!!काळ चाललाय पुढे ,,
यात आपला किटली पुराणविषय पुढे नेऊ या
तर पुराणी किटली ती पण कडी वाली आता बाहेर आली आहे आपण सुद्धा एकदा मॉर्निंग वॉक च्या कारनाणे मस्त फ्रेश वातावरणात बाहेर पडून दूध डेअरी असेल किंवा मिल्क फार्म वर जाऊन किटली मधी दूध आणाच ।आणि ती किटली वाली सकाळ अनुभवा कारण किटली मधील दुधाच्या चहाची चव जिभेला नवीन आस्वाद देणारी असेल.आता पॉली थिन मुक्त ,रसायन मुक्त दूध मिळणार आहे फक्त याला अट किटली स्वतःसोबत नेंणेे आहे.
जर तुमच्या घरी दूध घरपोच येत असेल तर किटलीचा खटाटोप सोडून दया.आणि फील इट वगैरे एकदा वाचलेल असू द्या।पण जमलं तर एकदा मॉर्निंग वॉक आणि किटली चा प्रयोग नक्कीच करू बघा कारण किटली तुम्हाला घेऊन सकाळी सकाळी मॊर्निंग वॉकला बाहेर पडनार आहे आणि
मस्त फ्रेश हवे सोबत गरमागरम वाफाळलेला चहाची अनुभूती देणारच आहे ,तर एकदा ट्राय करून च बघा ना कडी वाली किटली चा हटके सफर सकाळी सकाळी ।।।भेटूया किटली सोबत एखादया सकाळी,निम्मितास कारण की
""पिशवी बंद ,किटली चालु!!!""
स्वप्नील .सु .कुलकर्णी
नासिक
९०११३१७१२४.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults