स्फुट- हे बरं केलंस

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 May, 2018 - 12:51

हे बर केलस !
रात्रीतून कोसळून गेलास ते...
.
.
.
मला कस कळलं ??

पहाटेच्या अल्हाददायक झुळकीत
तुझ अस्तित्व दरवळून गेल !

तू माझ्या आसपास वावरायचास ना
अगदी तोच नि तसाच
गंध होता बघ तिचा !

खातरजमा करुनच घ्यावी म्हणून
गॅलरीत गेले
तर तिथेही
मी निगुतीन जमवलेली
तू अर्धवट ओढून विझवलेली
सिगरेटची थोटकं
प्लॅस्टीकच्या उघड्या डब्यात
पाण्यान थबथबलेली !
.
.
.

हम्न ! रात्र तर उलटली....

पण अख्खा पावसाळा जायचाय रे अजून !!!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users