समाजपुरूषा !

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 May, 2018 - 20:54

समाजपुरूषा !

एखादी स्वाभिमानी 'ती'
जेव्हा गवसत नाही तुझ्या राकट पंजात
तेव्हा,

सर्वार्थाने कमजोर असलेल्या
मात्र अनेकानेक डावपेच खेळून
उच्चस्थपदी विराजमान झालेल्या
काहीजणांना हाताशी धरून
उडवतोस धज्जा
तिच्या आत्मसन्मानाचा !

अब्रूच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या उडवून
काढतोस धिंडवडे राजरोसपणे !

पण ऐक !!

एखादी निपजू शकते
मंदोदरी
त्याच्या कृष्णकृत्यांनाही
भांगेत मिरवणारी
त्याच्या पश्चात त्याचा
राज्यकारभारच नव्हे
त्याचा गोतावळाही सांभाळणारी

चिखलात राहूनही
कमळागत उमलणारी

तेव्हा फक्त एक कर
ती कोमेजण्याआधी..
तिच्या निष्ठेची एक एक पाकळी गळून
गलितगात्र होण्याआधी
तिला तिचे स्थान दे

युगानुयुगे तुझं पाषाण हृदय
कोरडठक्क पडलंय म्हणे !
अस ऐकलं तर होतं बाबा
म्हणून हा खटाटोप !!

असो

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users