रियाल ची भूल भाग 2 (अंतिम )

Submitted by mahendra dhawan on 13 May, 2018 - 03:28

भाग 1 पासून पुढे ---
नेपाळी वकीलातीत शिरलो समोर एक नेपाळी अधिकारी त्याचा शी बोलण्याचा प्रयत्न केला
त्या येड्या ला नेपाळी आणि अरेबिक सोडून काहीच येत नव्हते आमचे इंग्लिश त्याच्या डोक्या वरून आणि त्याचे नेपाळी , अरेबिक आमच्या डोक्या वरून जात होते .
अर्धा तास प्रयत्न केल्यावर आम्हाला काय म्हणायचे ते त्याला कळले
त्याचे म्हणणे की मी इथे फक्त पासपोर्ट नूतनीकरण करू शकतो तुम्ही नेपाळी राजदूत यांना भेटा
त्याला म्हणालो की बाबा ती 10 वर्षे नेपाळमध्ये का गेली नाही हे तर विचार त्या सौदी ला
त्याने सौदी ला विचारले
भडकला नो तो , आम्हाला दोघांना अरेबिक मध्ये शिव्या देऊ लागला
नेपाळी अधिकाऱ्याला विचारले तो काय म्हणतोय त्याने सांगितले सौदी चिडला आहे आणि तो तुम्हाला शिव्या देतोय आणि तो पोलीस बोलावणार आहे
अगदी हातभर फाटली , वाटले कुठून या फंदात पडलो एक तर या देशाचे नियम आपल्याला माहीत नाही , इथली भाषा माहीत नाही
आता पोलीस आल्यावर काय होणार
इथल्या कायद्या प्रमाणे ती बाई आपली कोणीच लागत नाही आणि जर ती बाई पोलीस समोर म्हणाली की मला काहीच प्रॉब्लेम नाही तर आपण गेलो बाराच्या भावात
सौदी चा कालवा चालूच होता , मग आम्ही ही मराठीतून ग म भ न ची बाराखडी चालू केली , कुणाला मराठी काळत होते इथे
या सगळ्यात तास वाया गेला होता कंपनीत 1 तास काम सांगून बाहेर आलेलो आम्ही 3 तास होऊन गेलेले
इतक्यात त्या सौदी ने पोलिसांना फोन केला
आणि माझ्या नशिबाने माझ्या निर्मिती विभाग प्रमुख जो येमिनी आहे त्याचा मला फोन आला
त्याला सर्वं कथा सांगितली त्याने प्रथम झाप झाप झापले म्हणाला तुला काय करायचे तू आणि तुझा मित्र पोलिस येण्या अगोदर तिथून निघा
त्याला म्हंटले जमणार नाही ती बाई संकटात दिसतेय 10 वर्षे झाली ती नेपाळमध्ये गेली नाही काही तरी प्रॉब्लेम नक्की आहे
त्याचे म्हणणे कामगार वर्ष वर्ष घरी जात नाहीत विमान तिकिटाचे पैसे घेतात आणि घरी पाठवतात
त्या सौदी ला फोन दे त्या दोघांचे बोलणे झाले
सौदी म्हणाला तुमच्या मुदिर (मॅनेजर ) शी बोललो
पण मी तुमच्या वर पोलीस केस करणारच
इतक्यात माझ्या M.D चा फोन आला की महेंद्र 11.50   मिटिंग होती 12.15 झालेत कुठे आहेस तू
वरील सर्व कथा त्यांना परत सांगितली ते म्हणाले तू मला तुझे location पाठव whatsapp वर मी पोहचतो आहे 20 मिनिटात आणि घाबरू नकोस
(ते ही सौदी आहेत)
10 मिनिटांनी पोलीस आले
सौदी आणि पोलिसात अरेबिक मध्ये काय बोलणे झाले कळले नाही
पोलिसांनी मला अरेबिक मध्ये प्रश्न विचारायला सुरवात केली सगळे डोक्या वरून जात होते
पोलिसांनी ekama मागितला आमचा ,दिला
तो पहिल्या वर ते थोडे शांत झाले आणि म्हणाला कबीर मुदिर (मोठा मॅनेजर ) तुम्ही का यात पडलाय एक तर ती बाई तुमच्या देशाची नाही , किंवा तुमची नातेवाईक नाही आणि तिची तिच्या कपिल बरोबर तक्रार सुद्धा नाही
तुम्ही जाऊ शकता
मनात म्हटलं चला जाऊ दे आपण काय करू शकतो
म्हणून निघालो तर वकीलातीच्या दारातच आमचे M D
येताना दिसले
त्याना फोन वर सर्वं कल्पना दिली होतीच
पोलिसांनी त्यांना बघितल्यावर नमस्कार केला तो ज्या पद्धतीने केला
ते बघिल्यावर जीवात जीव आला
त्यांनी त्या दोन पोलिसांना सौदी ला व आम्हाला वकीलातीच्या रूम मध्ये बोलावले सोबत ती बाई ही होती
नमस्कार झाले त्यांनी कठे तरी फोन फिरवले आणि नेपाळी राजदूतांचा नंबर घेऊन त्यांना परिस्थिती सांगितली ते म्हणाले मी येतोच 1 तासात
मग त्यांनी आणखी फोन केले आणि जेदाह चे पोलीस प्रमुख अर्थ्या तासात हजर झाले
मध्यंतरी आमच्या M D नि पोलिसांना विचारले की
या बाई चा पासपोर्ट कपिल कडे कसा
ही बाई 10 वर्षे घरी का गेली नाही , नियमा प्रमाणे ती 2 वरश्या तुन एकदा घरी जायलाच पाहिजे तुम्ही विमान तिकिटाचे पैसे नाही तर विमान तिकीट द्यायला हवे
तिचा पगार तुम्ही नेपाळ ला कसा काय पाठवू शकता तो तिला इथे तिच्या बँक खात्यात मिळायला हवा
इतक्यात जेदाह चे पोलीस प्रमुख व नेपाळ राजदूत हजर झाले
सर्व कथा परत सांगितली गेली
आता सौदी घाबरला होता
पोलीस प्रमुखांनी न्यायधीश याना बोलावणे पाठवले
व आम्हाला विचारले तुम्ही केस करणार का बाई च्या वतीने , आमचे MD म्हणाले मी सौदी नागरिक आहे मी केस करतोय
न्यायाधीश यांनी त्या बाई ची आणि सौदी ची बाजू ऐकून घेतली आणि जागेवर निर्णय दिला की तू एक तासात सिद्ध कर की तू त्या बाई चा पगार नेपाळ ला पाठवत होता आणि तिला 2 वरश्या प्रमाणे 5 विमान तिकिटाचे जाण्या येण्याचे दिले आहेत
आत्ता सौदी गयावया करू लागला त्याने सांगितले की सुरवातीला 1 वर्ष त्याने पैसे पाठवले अत्ता पाठवत नाही
त्या बाई ला विचारले गेले तिलाही हा धक्का होता
ती म्हणाली मला परत जायचे आहे
न्यायाधीश यांनी निर्णय दिला की 24 तासात त्या बाई ला 74000 रियाल दे (9 वर्षे 2 महिन्याचा पगार अधिक 5 वेळेची विमान तिकिटाचे पैसे )
आणि ते ही नेपाळ वकीलातीत जमा कर
आणि सगळे निघून गेले मागे मी ,मित्र आणि नेपाळी राजदूत राहिलो मग खल सुरू झाला उद्या शुक्रवारी नेपाळी consulate  उघडी ठेवावी लागणार
आत्ता 5 वाजत आले होते या सगळ्यात दिवस मोडला होत सकाळ पासून चहा शिवाय पोटात काही नव्हते
राजदूत म्हणाले तुम्ही एवढी मदत केली तर अजून थोडी करा त्या बाई जिथे राहतात त्यांचे समान घेऊन या counsulate ची सिक्युरिटी देतो
हो पण प्रथम काही तरी खाऊन घेऊ
मग आमच्या आवडी प्रमाणे जेवण झाल्यावर ती बाई आम्ही दोघे आणि रक्षक नेपाळी राजदुतांच्या गाडीतून निघालो
जेदाह पासून 40 किमी अंतरावर शहरा बाहेर एका बंगल्यात गेलो
बाजूलाच एक outhouse होते पत्र्या चे ना कसली सोय ना AC ,8x10 ची रूम एक गादी आणि एक कुलर इथे 45-50 डिग्री मध्ये आम्ही केबिन बाहेर पडत नाही ही AC शिवाय काशी राहत असेल
तिच्या यातनाची कल्पना हे सर्व पाहून आलीच
सर्व सामान गोळा केले
समान तरी काय होते म्हणा 4-5 कपडे , अंथरून पांघरूण आणि एक माठ थोडे खजूर कपिल ने उपाशी ठेवले तर भूक मारण्यासाठी
सर्वं सामानाचे एक बोचके बांधले तिनी नेपाळ हुन येताना आणलेली बॅग आत्ता कुजून गेली होती
परत निघालो येताना सुपरमार्केट मधून बॅग ,थोडे चॉकलेट आणि तिच्या साठी 2 ड्रेस खरेदी केले
व तिला वकीलातीत सोडले
तो पर्यंत राजदूतांनी तिचा नवीन पासपोर्ट रेडी ठेवला होता व तिचा ekama रद्द करून शनिवार चे तिचे परतीचे तिकीट कडून ठेवले होते
रात्री चे 10 वाजले होते राजदूतांनी विचारले शुक्रवार शनिवार सुट्टी असेल उद्या माझ्याकडे या जेवायला घरी
घरी आलो झोप येत नव्हती आज जे झाले त्या वर विचार चालू होता सौदी तिचे पैसे देईल का
एक समाधान होते की ती 9 वरश्या नंतर तिच्या घर तरी बोलू शकली
शुक्रवारी राजदुतांच्या घरी गेलो त्या बाई ला त्यांच्या घरीच आसरा दिला होता
जेवण चालू असताना consulate मधून फोन आला की सौदी ने रक्कम रोख दिली आहे व जेदाह चे पोलीस प्रमुख आले आहेत
परत आमची वरात consulate मध्ये
मधेच आमच्या MD चा फोन काही मदत लागल्यास सांग त्या बाई ला नेपाळ च्या विमान बसून मग च कंपनीत ये
पोलीस प्रमुखांनी विचारलं आत्ता काही तक्रार आहे का
आम्ही नाही म्हणालो
मग साधारण 30 ते 40 पेपरवर त्या बाईच्या व आमच्या दोघांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेऊन ते गेले यात 4 ते 5 तास गेले
आलेले पैसे राजदूतांनी त्या बाई च्या खात्यावर नेपाळ ला ऑनलाईन पाठवले आणि तिला खरेदी साठी काही स्वतः जवळचे दिले
या सगळ्यात संध्याकाळ चे 5 वाजले होते
आणि तिचे तिकीट शनिवार सकाळी 11 वाजताच होते
मग सगळेच तिच्या खरेदी साठी बाहेर पडलो
तिला जेदाह हे इतके मोठे शहर आहे हे पहिल्यांदाच माहीत होतं होते भिरभिरत्या नजरेनं ती हे डोळ्यात साठवत होती
खरेदी आटपून तिला consulate मध्ये सोडून परत यायला निघालो डोळे भरून येत होते
ती म्हणाली भैया कल एअरपोर्ट पर जरूर आना
तिच्या ही संयमाचा बांध सुटला तिच्या डोळ्यात अश्रू होते
10 वर्षे भोगलेल्या यातनाचे की स्वातंत्र्याचे मनात काहूर घेऊन निघालो
उद्या परत येऊन तिला एअरपोर्ट वर सोडवायचे होते
सकाळी लवकर उठून consulate ला पोहचलो
विमान वेळे अगोदर 2 तास विमानतळावर पोहोचलो
सर्वं सोपस्कार नीट पार पडले आणि 11 वाजता ती नेपाळ ला जाणार्या विमानात बसली
एकदम हुश्श झाले
गुरुवारी सकाळी 9 वाजता सुरू झालेली कहाणी आज शनिवारी 11 वाजता संपली
रूम वर आलो मनात काही प्रश्न घेऊनच
जर आमचे MD आले नसते तर किंवा ते म्हणाले असते की तू चल तुला काय करायचं
आणखी किती दिवस ती या नरकात अडकली असती
मजबुरी म्हणून घरकामाला येणाऱ्या प्रत्येक बाई ची ही अवस्था कश्या मुळे
मान्य 500 रियाल म्हणजे @8000 रुपये हा पगार जास्तच नेपाळ च्या गरिबीच्या मनाने
पण त्या साठी उभे येणे आणि आडवे जाणे
10 वर्षे घरच्यांच्या बरोबर साधे बोलणे ही नाही
असा जाच किती थापा सहन करत असतील देवच जाणे
प्रश्न आणि प्रश्न
कधीच उत्तर न मिळणारे
जर आम्ही दोघे तिला भेटलो नसतो तर
आमचे MD आले नसते तर
MD आणि आमची गाठ पडली नसती तर
नेपाळी राजदूत शहरात नसते तर

संपूर्ण.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह. धाडसाचं काम केलंत.
तुमचे एम डी ही उभे राहिले.
तिथला जस्टिस इन्स्टंट दिसतोय
न्यायाधीश स्वतः आले का तिथे?

हो भरत इथला न्याय खूपच लवकर आहे आधी फक्त ऐकलं होतं पण प्रत्यक्ष अनुभव आला, हो नायधीश जागेवर येतात आणि तुम्हाला नाय मान्य नसेल तर मग कोर्ट केस होते आणि कितीही मोठी केस असेल तर निकाल जास्तीत जास्त 1 महिन्यात लागतो

अजाणता का होईना तुम्ही प्रचंड धाडस केले. आणि परिस्थिती कळल्यावर जो निर्णय घेतला त्याबद्दल सलाम! त्या बाईची इतके वर्षे काय अवस्था असेल. असे कित्येक खितपत पडले असतील.

साधना +१

तुमच्या हिमतींचे कौतुक

स्वतःचा जीव धोक्यात घालून फारच चांगलं काम केलंत.
तुमच्या एम्डींचंही़कौतुक तुम्हांला मदत केल्याबद्दल.

बाप रे डेंजर आहे हे. तुमच्या हिमतीची दाद द्यायला हवी, आणि तुमचे एमडी आणि तिथली न्याय व्यवस्था पण काबिले तारीफ!!

बाप रे!
खरंच हिंमत दाखवलीत. एम.डी.नी पाठिंबा दिला नसता तर काय झालं असतं याची कल्पना करवत नाही.

तुमच्या धाडसाचं खरंच कौतुक वाटतं. _/\_
तुमचा अरबाब खमका निघाला, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि त्यामुळेच पुढचे सर्व सुरळीत पार पाडले !
परत एकदा तुमचे अभिनंदन.. परत असा प्रसंग समोर आला, तर प्रथम अरबाब ला कल्पना द्या (आपण ओमान मधे ज्या प्रमाणे पहिल्यांदा पीआरओ ला सर्व कल्पना देतो त्याप्रमाणे) असा एक फुकट सल्ला !

मित - आभार "तर प्रथम अरबाब ला कल्पना द्या (आपण ओमान मधे ज्या प्रमाणे पहिल्यांदा पीआरओ ला सर्व कल्पना देतो त्याप्रमाणे) असा एक फुकट सल्ला !=== हो आत्ता ते सर्वं प्रथम करणार , ओमान ला असे कधी दिसले नाही आणि ओमान मध्ये बऱ्याच ओमनींना हिंदी येत असे किंवा इंग्लिश तरी आणि PRO कधीही फोन केला तरी हजर असे , इथे PRO सिस्टीम नाही , आणि आमच्या इथला सौदी ग्रुप खूपच मोठा आहे आणि MD भारतात शिक्षण घेतलेले आहेत त्या मुळे त्यांची खूप मदत झाली भारतीय बद्दल त्यांचे खूप चांगले मत आहे फक्त त्यांच्या शब्दा खातर मी सौदी ला आलो म्हणून ही असेल पण ठीक अंत भला तो सब भला

सर्वप्रथम जागरुकता दाखवून पाठपुरावा केल्याबद्दल तुमचे कौतुक! आणि तुमच्या एमडींचे देखिल.
हा किस्सा इथे लिहील्याबद्दल आभार!

फार चांगले काम केलेत तुम्ही. तिचा पासपोर्ट दहा वर्षाचा होता म्हणजे तुम्ही मदत केली नसती तर आणखी दहा वर्षे अडकून पडली असती बिचारी! कदाचित जिवंत परत गेलीच नसती.

बापरे! भयंकर!

वरील सर्वांना अनुमोदन.

वेमा. ,
कौतुकाच्या , टाळ्या वाजवणार्‍या , नमस्कार वगैरे स्मायलिज पण घाला यादीत. अशावेळी खुप गरज भासते.