अंतर

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 May, 2018 - 03:18

अंतर

हो !

अंतर राखायला आवडतं मला....

नात्यात, मैत्रीत अगदी शत्रूतही !

ह्या राखलेल्या अंतरामुळे व्यापून उरलेली अनभिज्ञतेची कडी
परस्परांना जोडून ठेवण्यात तितकीच उपयोगी पड़त असावी
जितकी की संबंधातील घनिष्ठता !!

मान देणं जमत नसेल तर
मान कापण्याची वा झुकवण्याची पाळी तरी येऊ नये दोघांवर !

निदान
उरलेल्या तुटपुंज्या आपल्या माणसांच्या
कायमस्वरूपी दुरावण्यावर शोधलेला
ज़ालिम उपाय म्हणूया हवं तर !!

कोण जाणे ?

पण हो !

अंतर राखायला आवडतं मला....

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users