हॅलो S... 'मी' बोलतोय !

Submitted by अंबज्ञ on 11 May, 2018 - 00:11

.

.

आज सकाळी एक गंमत झाली, म्हटलं चला जरा फोन लावू अन् काय करतोस विचारू ! पण हाय रे देवा, फोन सतत एंगेज लागला. बर्र थोड़ा वेळ वाट पहावी म्हणून थांबलो सुद्धा , तरीही पुनः आपले तेच ― "ज्या व्यक्तिशी आपल्याला संपर्क करायचा आहे ती व्यक्ति सध्या दुसऱ्या कॉल वर बोलत आहे ... धन्यवाद !"

सतत आपलं ते 'कृपया प्रतीक्षा करे' ऐकून मात्र आता हळूहळू डोक्याचा पारा चढायला लागला होता. एवढा माझा कॉल येताना दिसतोय तरी हां आपला दुसऱ्या कॉलवर इतका बिझी ! ह्याला काय अर्थ आहे. सगळ्या दुनियेशी बोलायला ह्याला वेळ आहे आणि माझ्यासाठी थोडुसा सुद्धा का नाही ... म्हणून जरा खंतावलो.

ह्याला नं नेहमी आपली इतरांचीच जास्त पडलेली असते हे आता प्रकर्षाने जाणवले. हां फोन खरं तर मी मलाच लावलेला असतो तेव्हा अवचितपणे कळते की मला सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वत:साठी वेळ नाही , ऑफिस असो की फॅमिली ― सगळ्यांना सांभाळून घेणेच असते नेहमी, मात्र स्वतःला प्रत्येक क्षणी विसरून जाणे, दुसऱ्या स्थानावर प्रतीक्षेत ठेवणे, असे नेहमी करतो आपण.

हो नं , आणि म्हणूनच स्वत:साठी इथे वेळ नसतो अन् मग मला माझ्याच मनाशी संवाद साधताना मात्र माझा कॉल सतत बिझी येत राहतो.

― अंबज्ञ

Group content visibility: 
Use group defaults

तिथं फोन लागत होता नं च्रप्स Happy
इथे मात्र एंगेज येतोय कारण ही रोज घडणारी तुमच्या आमच्या आयुष्यातील घटना आहे