व्यक्तिचित्रणातील व्यक्ती खऱ्या की खोट्या असतात?

Submitted by सचिन काळे on 10 May, 2018 - 03:37

आपण बऱ्याच लेखकांनी लिहिलेले व्यक्तिचित्रणे वाचतो. पुलं, वपु आणि इतरांनीही बरीचशी व्यक्तिचित्रणे लिहिलीत. आणि त्या व्यक्ती प्रसिद्धही झालीत. तर प्रश्न असा आहे की व्यक्तिचित्रणे काल्पनिक लिहिलेली असतात का? की ती सर्वच्या सर्व खरीखुरी माणसे असतात, जी त्या त्या लेखकांना त्यांच्या जीवनात भेटलेले असतात?

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका प्रसिद्ध लेखकाने लिहिलेले व्यक्तिचित्रण वाचले होते. त्यांनी त्यात कोल्हापूरमधील एका दुमजली चाळीच्या चाळ मालकांचे व्यक्तिचित्रण लिहिले होते. त्यात त्यांनी चाळीचे वर्णन, मालकाचे नांव, स्वभाव वगैरे सविस्तरपणे आणि हृदयस्पर्शी लिहिले होते. नेमके कोल्हापूरमधल्या काही वाचकांनी लेखकांना चौकशी केली. ही चाळ म्हणजे तीच का? फलाण्या फलाण्या गल्लीतील? तेच का ते चाळमालक? त्यावर लेखकांनी खुलासा केला होता की मी लिहिलेलं व्यक्तिचित्रण पूर्णपणे काल्पनिक आहे. कोल्हापूरमध्ये ती चाळ खरोखरच अस्तित्वात असेल तर हा निव्वळ योगायोग आहे.

हे वाचून मला धक्काच बसला. एव्हढी वर्षे मी धरून चाललो होतो की त्या लेखकांनी त्यांना त्यांच्या जीवनात भेटलेल्या खऱ्याखुऱ्या व्यक्तींवरच व्यक्तिचित्रणे लिहिलेली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकाच लेखक काही खरी तर, काही काल्पनिक व्यक्ती चित्रे लिहू शकतो.
काल्पनिक म्हंटलेल्या व्यक्तिरेखेत ८०%-९०% खरी व्यक्ती डोकावू शकते,
तर खर्या म्हंटलेल्या व्यक्ती चित्रणात व्यक्तीच्या काही गुण, दोषांचे चित्रण धूसर back ground म्हणून केलेले असू शकते.

त्यामुळे सगळ्या व्यक्ती चित्रणावर सरसकट stamp मारणे चुकीचे ठरेल.

तरीही,
पुलंच्या लेखनातील "गणगोत" मध्ये आलेल्या व्यक्ती असिस्त्वात आहेत , व्यक्ती आणि वल्ली मधील व्यक्तिरेखा प्रत्य्क्षावरून प्रेरित आहेत असा माझा समज आहे

मी लिहिलेल्या कथांमधील सगळ्या व्यक्ती काल्पनिक असतात.
मात्र व्यक्तिचित्रण करताना सगळ्या व्यक्ती कुठून ना कुठून वास्तवातून प्रेरीत असतात, याचा अनुभव येतो.

मी लिहिलेल्या कथांमधील सगळ्या व्यक्ती काल्पनिक असतात.
मात्र व्यक्तिचित्रण करताना सगळ्या व्यक्ती कुठून ना कुठून वास्तवातून प्रेरीत असतात, याचा अनुभव येतो.>>>+७८६

हा प्रश्न पडू नये असे मला वाटते

जगातील सर्व कलाकृती ह्या मानवी बौद्धिक क्षमतांच्या सहाय्यानेच निर्मिलेल्या असतात

त्यापलीकडचे काहीही आविष्कृत नाही

त्यामुळे सत्य आणि कल्पनाविलास हे दोन्ही मर्यादित आहेत व एकत्र नांदतात

दोन्हीही तितकेच शक्य असतात

फक्त सत्यच शोधणे किंवा फक्त कल्पनाविलास म्हणून आस्वाद घेणे हे दोन्ही टोकाचे व चुकीचे आहे

आस्वादकांनी कलाकृतीकडे असे पाहावे

दिसलेली व्यक्ती, कळलेली व्यक्ती, वाटलेली व्यक्ती व उतरलेली व्यक्ती ह्या प्रवासात लेखन करताना आपण ते फक्त प्रकाशित होऊन वाहवा मिळण्याच्या योग्यतेचे बनवत असतो हे सत्य मात्र ह्या भूतलावरचा कोणीही सजीव नाकारू शकत नाही
(हे प्रकाशित कलाकृतीबद्दल फक्त, अप्रकाशित नव्हे)

मी लिहिलेल्या कथांमधील सगळ्या व्यक्ती काल्पनिक असतात.
मात्र व्यक्तिचित्रण करताना सगळ्या व्यक्ती कुठून ना कुठून वास्तवातून प्रेरीत असतात, याचा अनुभव येतो>>>>>+111.

सर्वाना माझी विनंती आहे, की व्यक्तिचित्रण लिहिण्याकरिता आपल्या काही मौल्यवान सूचना इथे दिल्यात तर माझ्यासारख्या नवलेखकांना लेखन करताना त्याचा नक्कीच उपयोग होईल. आपल्या सुचनांच्या प्रतीक्षेत.