चाळीतील गमती-जमती (९)

Submitted by राजेश्री on 9 May, 2018 - 21:18

चाळीतल्या गमती-जमती (९)

आमच्या चाळीजवळ राणीच्या आईच्या दूरच्या नातेवाईक आजी राहायच्या त्यांना सगळे जैनाची म्हातारी म्हणुन ओळखायचे.आमच्या आख्या पंचक्रोशीत त्या म्हातारीसारखी दुसरी भांडखोर आजी शोधूनही सापडणार नाही असा तिचा स्वभाव.एकटीच रहायची. मातीचे दोन खोल्यांचे घर ,मागे अंगण.त्यावेळी त्यांचे वय असेल जवळ जवळ सत्तर च्या आसपास पण शेलाटी बांधा आणि कामाचा प्रचंड झपाटा आणि चालण्याची लगबग यामुळे वय आजिबात ओळखून यायच नाही.आमच्या घरापासून थोडं लांब तिचे घर पण आमच्या लगोरी या खेळासाठी आम्ही तिच्या अंगणातल्या फरश्या आणून त्याचे दुसऱ्या मोठ्या दगडावर फोडून तुकडे करायचो.कुठून तरी कागाळी व्ह्यायची आणि ती म्हातारी तणतणत आमच्या ऐन रंगात आलेल्या खेळामध्ये यायची आणि एका एकाला पकडून बदडून काढायला पुढे सरसवायची मग आमचा जाग्यावरच लगोरीचा खेळ संपुष्टात यायचा आणि लपाछपीचा खेळ सुरू व्हायचा.आताही बघा आंदोलनकर्ते मध्ये आणि मोर्च्यात मुख्य मोहरक्याला पकडलं की सारी सेना गारद होते तशी म्हातारी माझ्या मागे लागायची.कधी तिने पक्याला एखादा दुसरा रुपया देऊन या पकड मोहिमेसाठी नेमलेल असायचं.तिचा तो दूरचा का होईना नातूच ना .मग काय मी लय फास्ट पळून कुणाच्या तरी घरात लपून बस ,बाहेरचा अंदाज घे.अस करायचो.पक्या धर र तेवढं त्या राजीला तिला काय आज मी सोडत नाय..चांगलं डांबून घालतो म्हंटल की माझं धाब दणाणायच.मम्मीला तर कुठल्या तोंडाने जाऊन सांगणार.मग तशीच एखादी फारशी आणून म्हातारीला द्यावी अस माझ्या मनात यायच.पण तिच्या तोंडाचा पट्टा कोण थांबवणार.मग आजूबाजूचे मम्मीला जाऊन सांगणार सगळंच अवघड होऊन बसायचं.लपून बसल्यावर एक एक क्षण तासभर वाटायचा. जवळपास तिन्हीसांजेला गाठ आली की म्हातारी तिच्या घराकडे जात जात पळून जातीस व्हय ग...जाऊन जाऊन कुठं जाशील...कधीतरी माझ्या तावडीत घावशील की...अस बोलत तिच्या घरला रवाना व्हायची.तिचा मोठा आवाज आणि त्या आवाजात तोंडातून बाहेर पडणारे धारधार शब्द म्हणजे आख्या गल्लीसाठी ती आख्यायिका असायची. एवढा होऊन तरी कुठं सुधारायचो आम्ही पुन्हा त्या म्हातारीची आणि आमची जुंपी ठरलेली असायचीच.लहान मुलाला भीती दाखवण्यासाठी तुला नेला वाघाने अस काहीजण म्हणतात बघा तस मी तिच्या नजरेस पडलो की ती मला म्हणायची तुला नेलं पटकीने...बेन उलथत पण नाय पटदिशी..

Group content visibility: 
Public - accessible to all site users