प्लॅनचेट ( गप्पा भुतांबरोबर ??? )

Submitted by somu on 9 May, 2018 - 14:45

प्लॅनचेट ( गप्पा भुतांबरोबर ??? )

अनेकांना प्रश्न पडलेला असतो की प्लॅनचेट असते काय आणि ते करतात कसे...

मला पण माझ्या कॉलेज जीवनात हा प्रश्न पडलेला होता.  मित्रांना विचारायचे तर ते अमावास्येला संध्याकाळी घरातून बाहेर पडताना दहा वेळा विचार करणारे... घरी विचारावे तर "घरातून बाहेर काढल्यावर कोठे राहायचे ?" हा प्रश्न...

आणि या मधून एक आशेचा किरण दिसला...

श्रीधर माझा बालमित्र नोकरी निमित्ताने पुणे येथे स्थाईक झालेला... तो सुट्टीला आल्यावर त्याने सांगितले की ऑफिसच्या मित्रांसोबत त्याने प्लॅनचेट केले आहे.... म्हणलं चला कोणीतरी अनुभवी मिळाला..

कांही दिवसांनी पुण्याला जाण्याचा योग आला आणि अस्मादिक हजर झाले श्रीधरच्या रूम वर.... आणि तयार केले त्याला आणि त्याच्या मित्रांना प्लॅनचेटसाठी

( हा संपूर्ण अनुभव वाचा सुटका भाग 1 -  https://www.maayboli.com/node/65956 येथे )... ता. क. भाग 1 हा खरा आहे.... भाग 2 व भाग 3 हे माझ्या बिनकामच्या डोक्याची उपज आहेत. असो..

तिथे भेटल्या निशा देशमुख.. बिचारीने आत्महत्या केली होती म्हणे... नंतर आम्ही सिक्युरिटीला विचारून कन्फर्म केले होते...

परत कोल्हापूरला आल्यावर... मित्रांना हे सर्व सांगणे आलंच... त्यात श्रीधरची पण जोड मग काय... झाली की गॅंग तयार अनुभव घ्यायला.....

रात्री ठरला कार्यक्रम मित्राच्या दुकानाच्या टेरेसवर...

त्या रात्री भेटले बाबू पाटील... बिचारे नागाव फाटा येथे 1962 साली सायकल आणि ट्रक accident मध्ये.... वाईट वाटले. त्या वेळी त्यांचे वय होते 38 वर्षे.. घरी बायको मुले. भरपूर वाईट वाटले.. साश्रु नयनांनी निरोप दिला त्यांना आम्ही...

मध्ये  दोन तीन वेळा आले होते ते आम्हाला भेटायला...

शंकर
यांच्याशी तर किमान दहा वेळा गप्पा झाल्या आमच्या.. एक मित्राच्या घराजवळ रेल्वे स्टेशन होते.. आणि हे रेल्वे रूळ ओलांडून जाताना रेल्वे खाली...  जेंव्हा पण आम्ही त्या मित्राच्या टेरेसवर प्लॅनचेट केले, शंकरच भेटायला आले आम्हाला..

बाकी एक एकदा भेट झालेले भरपूर आहेत... किमान 30 तरी असतील...

इतक्या अनुभवाने आम्ही ठरवलेले प्लॅनचेटचे कांहीं नियम :

1) जे कोणी तिघे प्लॅनचेटला बसतील त्यांनी मद्यप्राशन केलेले नसावे.
( मध्येच जोराची लागली तर पंचायत होते ना )

२) शक्यतो अविवाहित
( मध्येच बायकोचा फोन आला तर कट करावा लागतो. मग घरी xxxxx )
( का हे माहिती नाही पण सर्व विवाहित बसले तर स्त्री आत्मा येण्याची शक्यता अधिक )

३) घट्ट मनाचे
( एका भित्र्याने वाटी हलल्यावर भिऊन बोट घट्ट धरले ... आम्हाला वाटले नाही कोणी आले म्हणून वाटी उपडी केली.. शंकरराव होते म्हणून बरे नाहीतर प्रॉब्लेम झाला असता )

४)  प्लॅनचेट शक्यतो रात्री करावे ( अमावस्या असेल तर एकदम भारी )
एकदा दिवसा प्रयत्न केला होता... ताशी 2 मीटर स्पीडने वाटी फिरत होती....

मला अजून पडलेला एक प्रश्न :

जर का एक मोठ्या फरशीवर  प्लॅनचेट करायला घेतले आणि वाटीमध्ये आत्मा आल्यानंतर जर ती वाटी फेवी क्विक ने चिटकवून जर फरशी 10 फूट खाली जमिनीत पुरली तर त्या आत्म्याला मुक्ती दिली असे होईल का ??

संकुल
http://sancool172.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

जर का एक मोठ्या फरशीवर प्लॅनचेट करायला घेतले आणि वाटीमध्ये आत्मा आल्यानंतर जर ती वाटी फेवी क्विक ने चिटकवून जर फरशी 10 फूट खाली जमिनीत पुरली तर त्या आत्म्याला मुक्ती दिली असे होईल का ?? >>> आपण यातील जाणकार दिसता तेव्हा तुम्हीच करून पहा आणि काय अनुभव आला ते सांगा

हे हे.. आता एवढी डिटेल प्रोसेस टाकली की राव..

मी आता मित्रांसोबत एका मित्राच्या भावाच्या हॉस्टेलरूमवर आहे...
हा धागा वाचून आज बरेच दिवसांनी पुन्हा या प्लांचेटचा मोह झालाय

काहीही फेकमफाक.
Jfk ला बोलवा, कळू दे नक्की काय झालं ते.>>>>> विमान तिकीट द्यावं लागेल की परदेशी आत्मा/भुतं कुठेही कुणीही प्लॅन्चेट करुन बोलवलं की येतात? म्हण्जे कुणी चेंबुरमधे प्लॅन्चेट करुन मायकल जॅक्सनच्या आत्म्याला बोलावला तर येईल का?