मुका मार अनवरत झेलुनी

Submitted by अनन्त्_यात्री on 5 May, 2018 - 21:34

काव्यतडागी जलपर्णीसम
प्रतिभा बहरून आली
पाहू न शकतो रवी, सकल ते
कवीस दावुनी गेली

कवी लेखणी सरसावून मग
मांडी ठोकुनी बसला
इथे मोडुनी तिथे जोडुनी
कविता पाडुनी गेला

पामर रसिकांच्या तोंडावर
कविता मग आदळली
मुका मार अनवरत झेलुनी
जुनी जखम हुळहुळली

हे कविराजा, एक विनंती
ऐक जरा रसिकांचे
काव्यप्रपाती बुडवू नको रे
आवर कढ प्रतिभेचे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults