मराठी नववर्ष शुभेच्छा !

Submitted by प्रकाश काळेल on 22 March, 2009 - 12:11

शिशीरातली सारी आखड होळीने जाळली
वसंतानेही बघ चहुकडे रंगपंचमी आरंभली

नव्या पालवीचा साज लेउन सृष्टीही नटली
नववर्ष स्वागता पक्षांनीही मैफील थाटली

यावर्षी किती हसलो,किती रडलो
हे गणित आता संपले !
सुखदु:खाची शिदोरी बांधून पदरी
हे वर्ष आता सरले !

चाखून गूळासोबत कडुनिंब,
या वर्षासही देउ प्रेमे अलिंगन

चल विसरु सारे तंटे, सोडू सार्‍या अढी
ऋणानुबंधांची उभारु उंचच उंच गुढी !

-----------------------------------------
सर्व मायबोलीकरांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हर्दिक शुभेच्छा !

-प्रकाश

गुलमोहर: 

मस्त गुढी उभारली प्रकाश. तंटामुक्ती आंदोलनाचा अध्यक्ष केले पाहिजे तुला.

प्रकाश,
कविता आवडली, आणि पोहोचवू इच्छित असलेला संदेश ही मिळाला... Happy

फक्त एक बदल सुचवला तर चालेल का?
>>पक्षांनीही महफिल थाटली << यात महफिल च्या ऐवजी मैफल ही चपखल बसेल. योग्य वाटलं तर बदल कर, महफिल हा हिंदी किंवा मराठी कोणताच शब्द वाटत नाही. (निदान मला तरी, हिंदी शब्द बहुतेक मेहफिल आहे. )

चला, नववर्षाची सुरेख सुरूवात !! छान Happy

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

गुढीपाडव्याच्या तमाम मा.बो.करांना शुभेच्छा !!!
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सुंदर.....
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडवा अन् नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

प्रकाश छान.
जर चाखून गूळासोबत कडुनिंब, ऐवजी कडुनिंबासोबत गुळ केल तर ?

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" जागुताई,
गोडानंतर कडू आवडत नाही वाटतं?
कवितेत चालतं बरं!
चल विसरु सारे तंटे,
उंच गुढी उभारु !
हार्दिक शुभेच्छा!!!
"

सुंदर.....प्रकाश तुलाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy

सर्व मायबोलीकरांना गुढीपाडवा अन मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

उमेशराव, तुम्ही बहाल केलेल्या पदाला मी जाहीर राजीनामा देतोय ! Wink

दक्स Happy आभारी आहे बदल करतो !

जागू ते सोबत आहे गं ! नंतरआधी काही नाही ! Happy

सर्वांना पुनश्चः शुभेच्छा !

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

प्रकाश शुभेच्छा आवडल्या Happy
सर्व माबोकरांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा Happy

खुप छान.
गुढीपाडव्याच्या मा.बो.करांना शुभेच्छा Happy

या गुढीपाडव्याच्या सर्व मायबोलीकरांना शुभेच्छा.....
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना
सुखा
समाधानाचे
आनंदाचे
भाग्याचे
आरोग्याचे
आणि सौख्याचे जावो.

----------------------------------
हे जीवन सुंदर आहे....

शुभेच्छांबद्दल आभारी.

चल विसरु सारे तंटे, सोडू सार्‍या अढी
ऋणानुबंधांची उभारु उंचच उंच गुढी !
आवडले.

गुढी उभारू सुखाची
मरगळ घालवू गतवर्षाची

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

प्रोफेसरांच्या शब्दात
कबाबातली हड्डी गेली सोडून गेले बुडाबुडी
लंगोट बांधून तुले उचलतो उंचच्या उंच बांध गुढी