बरेच काही

Submitted by योग on 4 May, 2018 - 06:57

बरेच काही

तुझ्या मिठीचे पडदे ओढून घेतले, झाकायला सारे-
विस्कटलेले.. उचकटलेले..
अन बरेच काही.

तुझ्या मूक संमतीचे पैंजण लेवून घेतले, ऐकायला नाद-
कीणकीण.. कुणकुण..
अन बरेच काही.

तुझ्या नागव्या स्पर्शाचे सर्प विणून घेतले, टाकायला रोज कात-
नातं.. गोतं..
अन बरेच काही.

तुझ्या नजरेचे डोह भरून घेतले, बुडवायला सर्व काळ-
काल.. आज...
अन बरेच काही.

तुझ्या श्वासांचे कतरे वेचून घेतले, झुलवायला रोज एक-
जन्म.. मृत्त्यू...
अन बरेच काही.

तुझ्या नसण्याचे भास कोरून घेतले, विसरायला पुन्हा सारे-
मि.. तू...
अन बरेच काही.

तरिही उरले तुझे-
आत... बाहेर..
अन बरेच काही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users