नजर ...

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 May, 2018 - 01:36

आगंतुक वा-याच्या झोतानं
आपलच दार आपल्याच तोंडावर
धाडदिशी आपटत तेव्हा....

अनपेक्षित आवाजान धड्धडणार ह्रदय
जागच्याजागी थबकलेल थरथरणार शरीर
बधीर, विमनस्क झालेलं बावरलेलं मन
ताळ्यावर आणण्यासाठी...

आतल्या आत मुळापासून कोलमडून सुध्दा
सर्व ताकदीनीशी करावा मज्जाव
आगंतुक वा-याच्या भरारणा-या झोताला ?

की एक-एक करून सताड उघडावीत
करकरणा-या मनाची असंख्य दालनं ?
नि व्हाव स्वाधीन स्वतःहुन
रोरावणा-या वादळाला ?

असे अनेक अनुत्तरीत प्रश्न
भोवताली सैर-भैर पिंगा घालत असताना
उत्तरादाखल स्मरते ती तुझी आश्वासक नजर
हजारो वादळे थोपवणारी ..

आणि मी पूर्ववत सज्ज !
अकल्पित वावटळींना तोंड द्यायला...

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users