Compliment

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 2 May, 2018 - 21:24

“ममा, तू किती छान दिसतेस”
सकाळची कामं आवरून येऊन माझ्या २ वर्षाच्या लेकाला खाऊ खायला देताना माझा लेक म्हणाला.
इतकं मस्त वाटलं... मी काही आपण बाहेर जाताना आवरतो तसं आवरलं नव्हतं. उलट घरातलेच कपडे, सकाळी गडबडीत आवरल्यावर बांधलेला अंबाडा अशा काहीशा अवतारात होते मी. पण त्याच्या नजरेत मी, त्याची आई सुंदर होते. किती छान होती ती जाणीव.
मग वाटलं कित्येकदा एक साधी compliment एखाद्या माणसाचा दिवस छान बनवू शकते ना?
आपलं कित्येकदा रोजच्या धावपळीत साध्या पण सुंदर गोष्टींवरून लक्ष हटतं ना? घरातल्या कुंडीत फुललेली चिमुकली फुलं, हसणारी चिवचिवणारी आपली मुलं, बायकोच्या हातचा गरम चहा, नवऱ्याने आणलेला मस्त गजरा, आई वडिलांनी आठवणीत ठेऊन आपल्यासाठी केलेला फोन. अशा कितीतरी....
तर Compliments द्यायला सुरुवात करूयात.
तुमची कॉम्प्लिमेंट कोणाचा तरी दिवस छान बनवेल.
आणि जसं ओंजळीत धरलेली फुलं हातालाही सुगंध देऊन जातात तसा तो आनंद तुमच्याही चेहऱ्यावर दिसेल...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Yes, a right compliment does make our day.

मनापासून कॉम्प्लिमेंट देऊ शकणं उमद्या स्वभावाचे लक्षण आहे. सर्वांना जमत नाही. दुसऱ्यांच्या छोट्या-छोट्या चुका आठवणीने दाखवणारे आपण कॉम्प्लिमेंट देतांना मात्र मागे राहतो. Happy

खुप छान,

Yes, a right compliment does make our day. >>> +११११ अगदी अगदी, कधी कधी आपण शुल्लक म्हणुन दुर्लक्षित करतो पण जर तेव्हा त्या व्यक्तीचे मनापासुन कौतुक केले न तर दोघांनाही ते खुप आवडते

खरंय Happy
आणि आपली तीनचार वर्षांची लेक जेव्हा पप्पा किती मस्त शर्ट आहे, तू हिरो दिसतोयस असे बोलते तेव्हा आपसूक छाती पुढे आणि पोट आत जाते Happy

तुम्ही मुलींना नेहमीच न चुकता छान दिसण्यावरून कॉम्प्लिमेंट द्या, त्या तुमच्यासाठी जीव देतील Happy

जोक्स द अपार्ट, मी व्हॉटसप चाळतानाही कोणाचा डिपी आवडला तर पटकन गोडशी स्माईली टाकून मोकळा होतो. आणि यात मुलगा मुलगी भेद नसतो... फक्त कोणाला शाहरूख म्हणून कॉम्प्लिमेंट देत नाही Happy

धन्यवाद अनिंद्य, VB, भन्नाट भास्कर, मेघा, ऋन्मेऽऽष, जागू-प्राजक्ता Happy

मनापासून कॉम्प्लिमेंट देऊ शकणं उमद्या स्वभावाचे लक्षण आहे>> खरं आहे Happy

तीनचार वर्षांची लेक जेव्हा पप्पा किती मस्त शर्ट आहे, तू हिरो दिसतोयस असे बोलते तेव्हा आपसूक छाती पुढे आणि पोट आत जाते>>> Happy Happy