लहानपण

Submitted by somu on 2 May, 2018 - 03:04

लहानपण लहानपण म्हणजे काय असतं
निरागसतेच एक प्रतीक असतं.

लहानपण लहानपण म्हणजे काय असतं
मोठेपणापेक्षा वेगळं खट्याळपणाचं जग असतं

लहानपण लहानपण म्हणजे काय असतं
हट्ट करण्याचं ते वय असतं

लहानपण लहानपण म्हणजे काय असतं
खोडकरपणाचं ते उदाहरण असतं

लहानपण लहानपण म्हणजे काय असतं
तुम्ही आम्ही अनुभवलेलं एक सोने असतं

छोटी लेखिका-
अनुष्का कुलकर्णी
(इयत्ता आठवी )

Group content visibility: 
Use group defaults