हिंदी शब्दां ना मराठी योग्य शब्द.

Submitted by मिरिंडा on 27 April, 2018 - 07:25

हल्ली हिंदी वाक्य रचना व वाक्प्रचार मराठीत वापरले जातात असे. शव्द खालील प्रमाणे आहेत.:

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मग जमत नाही ला काय बोलतात?
>>> हमसे ना हो पायेगा.

>>>>

मग माझ्याच्याने होणार नाही ला काय बोलतात?

मुळच्या मराठी पोहे चे अशुद्ध भाषांतर करावेच का? महाराष्ट्रात पोहेच.

नवीन Submitted by अभि_नव on 30 April, 2018 -
>>>> सहमत. हो! मीसुद्धा कॅन्टीन, हॉटेल ई. ठिकाणी छाछ न मागता आवर्जून ताक मागतो. समोरचा हिंदी भाषिक असला तरी बरोबर समजतो मला काय पाहिजे ते! आणि ते छाछ पिताना कसं तरी वाटतं. ताक प्यायलं की बरं वाटतं. आपलं वाटतं. पोट भरतं. म्हणून अभिनव यांच्या मुद्याशी सहमत.

कांदापोहेला काय बोलणार? प्याजपोहा? >>> का म्हणून? कांदे पोहेच म्हणणार. मी दुकानात जिलेबीच मागतो. जलेबी नाही. जलेबी गिळवणारही नाही.

कांदापोहेला काय बोलणार? प्याजपोहा? >>> का म्हणून? कांदे पोहेच म्हणणार.

>>>>

तुम्ही काय म्हणणार हे तुमची चॉईस आहे.
पण हिंदीमध्ये काय बोलायचे हा प्रश्न आहे Happy

पोहा जलेबी - भोपाळ नाश्ता
>>>

मी ताक जलेबी फाफडा वरचेवर खात असतो. डेडली कॉम्बिनेशन बनते. आता उद्याच खातो आणि फोटोही टाकतो Happy

वेगवेगळ्या भाषेत / बोलीत एकाच पदार्थाला नावे / उच्चार वेगळे असणारच. उदा.:- 'मलाई' हा शब्द मराठी नसावा - साय असा छान शब्द आहेच मराठीत. पण म्हणून आपण साय-कोफ्ता म्हणत नाही, उलट त्याचे 'मलई' असे मराठीकरण करतो. तीच गत मटन / चिकन (हल्ली तर 'मटण' आणि 'चिकण' Happy ) आणि बिर्यानीला 'बिर्याणी' ची.

तस्मात, महाराष्ट्रातील 'पोहे' चे इंदोरकरांनी 'पोहा' केले आणि उत्तर हिंदुस्तानात लोकांनी त्या अरबस्तानातल्या 'झलेबिया' ला 'जलेबी' म्हणले तर त्यांचा दोष कसा ? Wink

सोच कर देखो, जलेबी भी जिलबी जितनी ही मिठी लगेगी Happy

अनिंद्य

इतरांनी त्यांच्या प्रदेशात त्यांच्या भाषेत काय करावे हा प्रश्न नव्हताच. मी तरी तसे इथे कुठे वाचले नाही.
मराठी प्रदेशात मराठी लोकांनी मराठी भाषेतील नावं सोडुन देऊन भलतीच नावं का वापरावी, असा प्रश्न आहे.

आप भी थोडा ठिक से सोच कर देखो. हिंदी भाषा और लोगों की जुलमजबरदस्ती नजर आ जायेगी.

अ-भिनव.

बरं !
साय-कोफ्ता मागवून बघतो पुढच्या वेळी हॉटीलात Happy

१. साय-कोफ्ता हा पारंपारीक मराठी पदार्थ आहे का?
२. किती हजार वर्षांपासुन हा महाराष्ट्रात बनतो?
३. किती हजार वर्षांपुर्वीचे 'साय-कोफ्ता' हे नाव असलेले हस्तिलिखित, ताम्रपट सापडले?
४. नावांचे असे अशुद्ध भाषांतर करु नये हाच मुद्दा असताना, तो उलटा फिरवुन, तोच मुद्दा सिद्ध होतोय हे ही लक्षात येऊ नये का आपल्या?

नावांचे असे अशुद्ध भाषांतर करु नये हाच मुद्दा असताना, ...

बरोबर !
आता माझा प्रतिसाद पुन्हा वाचा. तरीही नाही पटले तर सोडून द्या, हा का ना का.

१. आधीपासुन प्रचलीत असलेली एखादी गोष्ट व त्या गोष्टीचे त्याच भाषेतले नाव
२. गेल्या ५०-१०० वर्षात अलीकडेच माहित झालेले नव्या गोष्टीचे त्या भाषेतले रुळलेले स्विकारले गेलेले नाव
३. नव्याने आलेल्या गोष्टीचे अजुन १००% प्रचलीत न झालेले नाव
४. नव्याने माहित झालेल्या गोष्टीचे त्या भाषेत अजुन काहीच नामांतर झालेले नसने
५. ई.ई.

या सगळ्यांमधे काही फरक आहे की नाही?

BTW, पोहे हा खाद्यप्रकार आणि त्याला पोहे हे नाव महाराष्ट्रात किती हजार / शे वर्ष जुनं असावं याबद्दल कोणी सांगेल का ?

अनिंद्य
सुदाम्याचे पोहे
महाभारत काळापासून होते.
सुदामा महाराष्ट्रातला मराठी माणूस होता का?

@ ऋन्मेऽऽष,

सुदाम्याचे पोहे...

सुदाम्याने श्रीकृष्णाला भेट म्हणून दिले तेंव्हा कृष्ण द्वारकेत असावा का ? तसे असते तर तो 'पोव्वा सारा छे' म्हणाला असेल का ? Happy

धागा एकोळी आहे.

हल्ली हिंदी वाक्य रचना व वाक्प्रचार मराठीत वापरले जातात असे. शव्द खालील प्रमाणे आहेत.:

धागालेखक काही शब्द टंकतील का प्लीज ?