ऑफिस मधील चमत्कारिक अनुभव

Submitted by अननस on 22 April, 2018 - 05:44

आजच्या विज्ञानाच्या युगातही असे काही अनुभव येतात कि कोणती तरी परालौकिक शक्ती सगळी सुत्र चालवत आहे कि काय असे वाटवे. असेच काही चमत्कारीक अनुभव विषद करत आहे. इतरही काही व्यक्तींना असे अनुभव आले असल्यास जरूर लिहावे.

एकदा माझ्या ओळखीतली एक नुकतेच प्रमोशन मिळालेली मुलगी तिच्या नवीन रोल मध्ये कामावर रुजु झाली होती. अनेक कामे करुन, कष्ट करून मिळवलेली पदोन्नती. एकदा तिला तिच्या नवीन रोल मध्ये बॉसने एक नवीन प्रोजेक्ट दिला होता. या नवीन प्रोजेक्ट चे काम करायला मिळणार म्हणून ती उत्साहात होती. असे अनेक प्रोजेक्ट तिने केले असले तरीही असा प्रोजेक्ट करायला मिळणे ही एक सोडून चालणार नाही अशी संधी होती. तस प्रोजेक्ट मध्ये काम थोडेसेच होते, पण ते वेळेत झाले नसते तर ते काम कॉम्पिटिटर कंपनीला मिळणार होते.

अशात तिच्या टिम मधला तिचा एक टिम मेट. तो काही काम पटकन होण्यासाठी मदत करेना. तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कि काम होणे आवश्यक आहे. पण तो काही ऐकेना. शेवटी तिने मनातल्या मनात एकविरा आई ची करूणा भाकली. म्हणली, " एकविरा आई, येवढा एक प्रोजेक्ट होऊ दे, तुला पेढे वाहीन".

त्या दिवशी तिच्या टिम मेट ने काही मदत केली नाही. मग डोक्यात विचार आला, एकविरा आईला काहीच वाहीले नाही. मग दुसर्या दिवशी ओफिस मध्ये येताना, एकविरा देवीच्या देऊळात गेली, खोबर्याचा नेवेद्य दाखवीला आणि म्हणाली, "आई, प्रोजेक्ट झाला तर पेढे वाहीन"

त्या दिवशी, तिच्या टिम मेटने कोणतीही कुरबुर न करता, प्रोजेक्ट पूर्ण करून दिला. त्या नन्तर प्रोजेक्ट पूर्वी झालेला वादही दोघे पूर्ण विसरून गेले.

असे अनेक अनुभव आजही अनेकांना येत असतात.

Group content visibility: 
Use group defaults

यात चमत्कारिक काय आहे? कोणी मनापासून नवस नावाचं डील केलं, आणि ऍडव्हान्स पण दिला तर त्याचं काम करायचं हे तर देवाचं/देवीचं कर्तव्यच आहे.
जय संतोषी माता नावाचा सत्य घटनांवर आधारित चित्रपट बघितलेला दिसत नाहीये तुम्ही.

कावळा बसायची आणि फान्दी तुटायची वेळ एकच झाली म्हणुन कावळ्याच्या वजनाने फान्दी तुटली असे म्हणता येत नाही.

अनेक लोक मुडी असतात, आज काम करायचेच नाही, किव्वा कुठल्याही परिस्थितीत आज काम सम्पवायचेच. कामासाठी किती वेळ लागणार आहे, आणि त्याचे कौशल्य यावर त्याचा विष्वास होता म्हणुन उगाचच आधी नसेल केले.

आता या धाग्यावर 10 पैकी 9 प्रतिसाद यावर अविश्वास दाखवणारे, टिंगल उडवणारे, याला योगायोग ठरवणारे, वा उपरोधाचे वगैरे येतील.

प्रत्यक्षात 10 पैकी 9 लोकं देवावर विश्वास ठेवणारे, त्याची प्रार्थना करणारे आणि त्याला साकडे घालणारे असतात.

आपली ती श्रद्धा आणि दुसरयाची अंधश्रद्धा हे हुमायून नेचर आहे.

तरी नशीब एकवीरा लेखात आई आहे, येशू वा मोहम्मद असता तर आणखी धमाल आली असती Happy

येनी वेज,
ईथे ऑफिसमध्ये आलेले चमत्कारीक अनुभव लिहायचे आहेत का? माझ्याकडेही पोतडी भरून आहेत. साईबाबासे ले के लालबागके राजा तक.. कित्येक देवांना पेढेसुपारी देऊन माझे काम करवून घेतले आहे. आई क्नो हाऊ टू डिल विथ अल्लाह, येशू, एण्ड भगवान.. माझा बॉस माझ्यावर त्यामुळे खुश असतो. पण माझा पगार मात्र वाढवत नाही. कारण त्याला असे वाटते की देव फक्त गरीबांचेच ऐकतो. माझा पगार वाढला, मी श्रीमंत झालो, चार पैसे खिश्यात खुळखुळू लागले तर देव माझे ऐकायचे बंद करेल. असे माझ्या बॉसला वाटते.

तरी एक बरे आहे, मी नवसात जे बोलतो त्याचा खर्च कंपनी उचलते. म्हणजे आधी मला माझ्या खिशातून घालावे लागतात. मग रिम्बर्समेंट मिळते. मीच माझ्या खिशातून पैसे खर्च करतोय असे देवाला वाटणे फार गरजेचे आहे. पण माझे कलीग मात्र याचा फायदा उचलतात. देवाला नवस म्हणून पुर्ण टीमला जेवू घालेन असे बोलायला लावतात. आणि काम झाल्यावर ऑफिसच्या पैश्यात जेवतात. पण जेव्हा कधी माझा डबा नसतो तेव्हा मात्र मला कोणी जेवायला बोलवत नाही. म्हणून ऑफिसमध्ये फक्त कलीग असतात, मित्र नाही.

{{{आता या धाग्यावर 10 पैकी 9 प्रतिसाद यावर अविश्वास दाखवणारे, टिंगल उडवणारे, याला योगायोग ठरवणारे, वा उपरोधाचे वगैरे येतील.

प्रत्यक्षात 10 पैकी 9 लोकं देवावर विश्वास ठेवणारे, त्याची प्रार्थना करणारे आणि त्याला साकडे घालणारे असतात.

आपली ती श्रद्धा आणि दुसरयाची अंधश्रद्धा हे हुमायून नेचर आहे.

तरी नशीब एकवीरा लेखात आई आहे, येशू वा मोहम्मद असता तर आणखी धमाल आली असती }}}

ह्याला काडी टाकणे म्हणायचे का?

असो. एकविरा देवी ही अनार्य दैवत आहे. सध्याच्या काळात फक्त आर्य दैवतांची खिल्ली उडविणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे. अनार्य दैवतांच्या विरोधात चकार शब्द काढला जात नाही. मांढरदेवीच्या यात्रेला चेंगराचेंगरी होऊन कित्येक माणसे मेली तरी ती यात्रा बंद होत नाही. अंधश्रद्धा वाढीस लागेल असले आरोप जयमल्हार मालिकेवर होत नाहीत. इतकेच कशाला ट्रॅफिक जाम पासून हागणदारीपर्यंत अनेक समस्या निर्माण होत असल्या तरी अंनिस (दाऊदचा भाऊ नव्हे) वारीवर कधीच हरकत घेणार नाही. इतकेच काय संतसूर्य पुस्तकाला वारकर्‍यांनी विरोध केला तर ते पुस्तक मुकाट बाजारातून मागे घेतले गेले. आनंद यादवांना संमेलनाचे अध्यक्षपददेखील भूषविता आले नाही पण ही असहिष्णूता आहे असे कोणालाच वाटले नाही. करणी सेना असहिष्णू आहे असे म्हणणे म्हणजे मात्र हूच्च दर्जाचा पुरोगामीपणा मिरविणे. असो.

"आई, प्रोजेक्ट झाला तर पेढे वाहीन">>>>>>> आमच्या एका नातलगाच्या ख्रिश्चन शेजारणीने मस्त सांगितले होते की तुमचा (हिंदू लोकांचा),तुमच्या देवावर खरा विश्वास नाही म्हणून तुम्ही देवाला नवस बोलता.आम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवतो.
अर्थात हे सर्व ख्रिश्चन समाजाला लागू होत नाही.तरी मला तो विचार आवडला.

मी नुकताच लीड वगैरे झालो होतो त्या काळात एका टिममध्ये आलेल्या नवीन पंटरला सर्व काम शिकवले. मग एके दिवशी त्याला प्रॉडक्शन इश्यु दिले तर माझ्याकडे येऊन त्याने अजून एक आठवडा मी प्रॉड इश्युंवर काम करणार नाही म्हणून सांगितले. विचारले का, तर म्हणाला की हा आठवडा शुभ नाहिये! Proud

आमच्याकडे एकदा फॉरेनचे क्लायंट विजिटला येणार होते. सोबत आमच्याही कंपनीची मोठमोठी फॉरेनर मंडळी होती. सर्वांना डेस्क क्लीन आणि नेटके करायचे आदेश होते. अगदी कामाचे तक्ते चिटोरे जे समोरच्या भिंतीला टाचून ठेवले असतात ते सुद्धा नको होते. अश्यात मग लफडा झाला. कारण काही लोकांनी देवदेवतांचे फोटो लावलेले. एकाने ईतके देव लावलेले की देव्हाराच बनवला होता. आणि एकाही देवाला तात्पुरतेही तिथून हलवायला तयार नव्हता. फॉरेनर येणार म्हणून आम्ही आमचे देव का हटवायचे म्हणून अडून बसला. शेवटी त्याला घरी बस म्हणून सांगितले तसे घाबरला. जॉब गेला तर देव पोसायला येणार नाही याची तरी त्याला कल्पना होती हे नशीब.

त्या मुलीला पदोन्नती मिळाल्यावर तिने पेढे वाटले नव्हते. त्यामुळे झालं असेल.टीममेट रागावली असणार.

"आई, प्रोजेक्ट झाला तर पेढे वाहीन">>>>>>> आमच्या एका नातलगाच्या ख्रिश्चन शेजारणीने मस्त सांगितले होते की तुमचा (हिंदू लोकांचा),तुमच्या देवावर खरा विश्वास नाही म्हणून तुम्ही देवाला नवस बोलता.आम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवतो.
अर्थात हे सर्व ख्रिश्चन समाजाला लागू होत नाही.तरी मला तो विचार आवडला.>>>>>

देवकी, माहीमच्या चर्चमध्ये लोक मेणबत्त्या वाहतात ते मनातले नवस पूर्ण होतात म्हणून हे तिथे नोवेना करणाऱ्या मैत्रिणीने सांगितले होते. टाइम्सच्या जाहिरातीच्या कॉलममध्ये कित्येकदा मेरी, येशु व संत लोकांचे काम करून दिल्याबद्दल आभार मानलेले असतात व शेवटी published as promised हे लिहिलेले असते, कुणाला प्रॉमिस केलेले असते देव जाणे.

नवस करण्याचा धर्माशी संबंध नसून स्थानिक चालीरीतींशी आहे हेमावैम. भारतीय माणूस नवस करणार, मग तो कुठल्याही धर्माचा असो. पॉवरफुल बाबा असेल तर नवस करणारा धर्माचे मंगळसूत्रही विसरायला तयार असतो. हाजी अली, सिद्धिविनायक, साईबाबा यांना इतर धर्मीयही नवस बोलतात. तेच नेदरलँड्समधला ख्रिस्ती नवस बोलेल असे मला वाटत नाही, प्रत्यक्षातली परिस्थिती अर्थातच मला माहित नाही.

अर्थात हे सर्व ख्रिश्चन समाजाला लागू होत नाही> >>>> येस. माहिमच्या चर्चमधे मी स्वतः गेलेय. माझ्या मैत्रिणीसोबत. तिथे लोक मेणाच्या प्रतिकृती वाहतात. नवस फेड म्हणून. घर, बाळ, विमान, अशा बर्‍याच मी पाहिल्या.

माहिमच्या चर्चमधे मी स्वतः गेलेय. माझ्या मैत्रिणीसोबत. तिथे लोक मेणाच्या प्रतिकृती वाहतात. नवस फेड म्हणून. घर, बाळ, विमान, अशा बर्‍याच मी पाहिल्या.

>>
आपल्या हिंदू लोकांनीच बिघडवलेय त्यांना..
मी सुद्धा माझ्या आजीसोबत जायचो लहानपणी. फार मजा यायची..
गंमत म्हणजे माझ्या टिपिकल स्वप्नांपैकी एक आहे हे. चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती पेटवणे. मी एकटाच पुढे जाऊन पेटवतोय आणि मग त्या गर्दीत माझ्यासोबतचे हरवलेत.

हिंदू लोकांनीच बिघडवलेय त्यांना..????????? ते कसं काय?
मी एकटाच पुढे जाऊन पेटवतोय आणि मग त्या गर्दीत माझ्यासोबतचे हरवलेत.>>>> हरवतील का? Uhoh

अहो म्हणजे हे ख्रिश्चन लोकं भारतावर राज्य करायला आले आणि ईथले नवस वगैरे फंडे उचललेत..

आणि हरवतील कसे म्हणजे चुकामुक हो.. स्वप्न असते ते.. चुकामुक झाली की जीव घाबराघुबरा होतो आणि जाग येते. त्या आधी छान ख्रिश्चन मुली दिसत असतात म्हणून पुन्हा चादर ओढून स्वप्नात जाता येते का ट्राय मारतो. कधीकधी जमतेही...

ख्रिश्चन लोकं भारतावर राज्य करायला आले आणि ईथले नवस वगैरे फंडे उचललेत..>>>>. तुला काय माहित??
हे लोक जगाच्या सफरीवर निघतानाच नवस करुन निघाले होते की जिथे स्वतःच्या देशवासीयांपेक्षा आम्हाला लोक जास्त मानतील. आणि आमची डाळ शिजेल, आमच्या मुळे तिथले लोक एकमेकांशी भांडतील त्यातुन आमचाच फायदा होईल. असा देश सापडु दे रे किंगलॉर्डा.
आणि मग त्यांना भारत सापडला. मग इथे आपली इप्सितं साध्य करुन ते पुन्हा त्यांच्या देशी गेले किंगलॉर्डाचा नवस फेडायला.