असताना बायको सोबत

Submitted by निशिकांत on 18 April, 2018 - 04:18

( बदल म्हणून एक विनोदी कविता. माझ्या कवितांचा हा DNA नसून सुध्दा!" टिकटिक वाजते डोक्यात" या सिनेगीताच्या चालीवर गुणगुणता येईल ही रचना. या कवितेत डोकाऊन बरेच पुरूष स्वतःस बघू शकतील कदाचित. )

झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत
खळखळणे कालचे संपले
अपुल्याच राहते तोर्‍यात

माझ्या अन् तुझ्याही मैत्रिणी
सुंदर वाटती बघता क्षणी
त्यांना मी शिकवून ठेवले
बोलावे सोज्वळ वरकरणी
काका म्हणती ललना तरी
दुखते का तुझिया पोटात?
झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत

धाकटी तुझी ती बहीण
केवढी दिसते तरुण
पार्लरमधुनी आल्यावर वाटे
ग्रिष्मातला ती श्रावण
लावला डाय असूदे केसांना
बट सावरते झोकात
झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत

मोबाईल वाजता माझा कधी
तू का घ्यायाला पळतेस?
कोणाचे आले? कोणाला केले?
लॉग का नेहमी बघतेस?
लँड लाईन मी वापरतो
बोलाया पोरींशी ऑफिसात
झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत

वृध्दत्वाने अंग थरथरते
पण तरी नजर का भिरभिरते?
न आवडे वास्तव आजचे
भूतकाळी मन मोहरते
ठीक आहे तू आहेस म्हणुनी
ठेवाया आजही धाकात
झिणझिणते वाळवी डोक्यात
असताना बायको सोबत

निशिकांत देशपांडे. मो क्र ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा,
आपले मन विनोद म्हणून सुध्दा वास्तव स्विकायला तयार नसते. किती चाकोरीबध्द वागतो आणि विचार पण करतो आपण ना! माझ्या या रचनेला अनेक प्रतिसाद आले आहेत; त्यापैकी एक खाली देत आहे.
"वाह ! वाह ! खूपच छान सर ! मला कधीही वाटलं नव्हतं कि तुम्ही या विषयावर कविता लिहाल. खूपच खुसखुशीत कविता आहे. हे असंच आणि असंच होत असतं. बढिया ! दिल खुश हो गया ।"
आपण आपला विचार मांडला जो आपणाला हक्क आहे. तथापी, प्रतिसादासाठी मनापासून आभार आपले.