मराठी साहित्यातील वाड्ःमयचौर्य (plagiarism) ह्या समस्येवर आपण काही उपाय करू शकतो का? कोणते उपाय असावेत?

Submitted by किल्ली on 17 April, 2018 - 02:36

वाड्ःमयचौर्य हा हल्ली कळीचा मुद्दा झाला आहे.इंग्लिश भाषेत ही चोरी पकडण्यासाठी मुबलक साधने उपलब्ध आहेत. त्यांना plagiarism detection software असे म्हणतात. ही साधने संपूर्ण आंतरजालावरील माहिती बरॊबर तुमच्या लिखाणाची तुलना करून लिखाणामध्ये unique contents चं प्रमाण टक्केवारीमध्ये किती आहे ते सांगतात.अधिक माहितीसाठी ह्या संकेतस्थळाला भेट द्या:
http://www.plagiarism.org/article/what-is-plagiarism

अशी plagarism detection tools देवनागरीसाठी उपलब्ध आहेत का? कुणाला काही माहिती असेल तर सांगावे.
उपलब्ध नसतील तर आपण develop करू शकतो. programmer माबोकर कृपया ह्यावर मदत करा. अस्मादिक स्वतः NLP आणि machine learning जाणतात. त्यामुळे ह्या बाजुने प्रयत्न करता येईल.
admin तुम्हीही मार्गदर्शन करा.

ही साहित्यचोरी कशी पकडावी आणि त्यावर उपाय काय ह्यावर चर्चा करण्यासाठी आणि मत मांडण्यासाठी हा धागा काढत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हल्लीच दोन लेखनचोर्या झाल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी माझी बिर्यानी आणि आत्ताच आदिसिद्धीची माझ्या स्वप्नातली शाळा . याबाबत आम्ही संबंधित अॅपच्या वा बेवसाईटच्या मालकांना ईमेल केला होता. तत्पर प्रशासन यंत्रणेने प्रश्न लवकर सोडवले होते.

हो येस्स....जुईचं बरोबर आहे....मला वाटतं सगळ्या माहित असलेल्या नसलेल्या अॅपवर कथा अपलोड करायची.....हा कदाचित उपाय असू शकतो....

माझा एक प्रश्न आहे. आपण ब्लाॅगवर जर लिखाण टाकलं, तर काॅपीराईट मिळतो का? कृपया माहिती असलेल्यांनी सांगावे.

जर लेखन हा तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय नसेल तर मुळात जिथेतिथे काॅपीराईटचा अट्टाहास कशाला?
मूळ लेखक Creative Commons सारखे लायसन्स का वापरत नाही?

मराठीत लेखन हा पोटापाण्याचा व्यवसाय कधीच नव्हता. बहुतेक सगळे प्रथितयश लेखक नोकरी करून लिखाण करायचे.

CC साठी +1

माझ्या एका धाग्याची रिक्षा फिरवून घेतो
https://www.maayboli.com/node/47939

उबो,
पोटापाण्याचा व्यवसाय सध्या नाही पण जर आपण एका विशीष्ठ प्रकारचे लिखाण चांगले लिहीतो असे दिसले आणी पुढेमागे तो पोटापाण्याचा व्यवसाय बनवावा वाटला/तश्या संध्या आल्या तर?

Creative Commons हा कॉपीराईट्सचाच एक प्रकार आहे ना? त्यातील 'अ‍ॅट्रिब्यूट' हे लायसन्स असेल तर इतर लोक मूळ लेखकाला श्रेय देऊन त्याचे काम नक्कल/वितरण इ. करू शकतात. पण त्यांची आणखीही काही लायसन्सेस आहेत. असो.
ब्लॉग संबंधी कॉपीराईट्स बद्दल खूप उलट-सुलट लेखाण आज वाचायला मिळतं. 'जे काही लिहाल/ छापाल त्याला आपोआप कॉपीराईटस मिळतात' - असं अनेक जण म्हणतात. पण ते फक्त अमेरिकेसारख्या देशात खरं आहे. भारतात याबाबत नियम कितपत राबवले आहेत याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे शक्यतो Creative Commons सारखं काहीतरी लायसन्स ब्लॉगवर असल्यास चांगलं.
सध्या तरी मराठी वाङ्मयचौर्य शोधण्यासाठी कुठले टूल उपलब्ध नाही. माझ्या स्वतःच्या ३ ब्लॉगपोस्ट्स गेली ९ वर्षे ऑर्कुट, फेसबुक, whatsapp, इतरही काही apps आणि ब्लॉग इत्यादींवरती माझ्या नकळत लोकांनी हजारोंच्या संख्येत प्रसिद्ध केली आहेत. त्यातल्या शेकडो लोकांना मी ईमेल , मेसेज, कमेंट इत्यादी करून निदान माझे नाव त्याखाली लिहिण्याची विनंती केली. (ह्या तिन्ही पोस्ट्स Creative Commons खाली आहेत). तरी फक्त ७-८ लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिवाय त्यांना कारवाईची धमकी देऊन तरी मी काय करणार होतो! हे चौर्य पकडण्यासाठी आणि चोरांना identify करून कारवाई करण्यासाठी कायदे अजून सक्षम नाहीत. निदान ब्लॉगलेखक म्हणून आपण सरकारकडे कायदे सक्षम बनवण्यासाठी मागणी करू शकतो. कुणी plagarism detection tool बनवल्यास या कामाला हातभार लागेल एवढे नक्की.

अस्मादिक कोण आहे? >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अस्मादिक म्हणजे मी.. संस्कृतप्रचुर उल्लेख आहे. लेखिका व्यवसायाने data scientist आहे.

@व्यत्यय: उत्तम धागा

plagarism detection tool चा खरंच खूप फायदा होतो. टेकनिकल ब्लॉग्स किंवा research papers plagiarism free झाल्याशिवाय प्रकाशक स्वीकारत नाहीत असा अनुभव आहे. असं tool मराठीत हवं असं मनापासून वाटतं म्हणून हा प्रश्न प्रपंच !!

हिंदी साठी आहे असं tool:
http://www.indjst.org/index.php/indjst/article/viewFile/86631/68242

जर लेखन हा तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय नसेल तर मुळात जिथेतिथे काॅपीराईटचा अट्टाहास कशाला?
>>>>
जर मी एखादी कथा लिहीली. ती पोटापाण्यासाठी नाही लिहीली. पण उद्या एखाद्याने मला न विचारता तिच्यावर पिक्चर वा शॉर्टफिल्म बनवून नाव व पैसा कमावला. तर माझी जळणार नाही का?

जर मी एखादी कथा लिहीली. ती पोटापाण्यासाठी नाही लिहीली. पण उद्या एखाद्याने मला न विचारता तिच्यावर पिक्चर वा शॉर्टफिल्म बनवून नाव व पैसा कमावला. तर माझी जळणार नाही का?
>>> फक्त याच कारणामुळे मी कथा लिहीत नाही. म्हणजे खरतर काहीच लिहत नाही प्रतिसाद सोडले तर.. भीती वाटते कोणीतरी चोरेल.

>>फक्त याच कारणामुळे मी कथा लिहीत नाही. म्हणजे खरतर काहीच लिहत नाही प्रतिसाद सोडले तर.. भीती वाटते कोणीतरी चोरेल.

हे भारी आहे Rofl

मला आज फेसबुकवर एक मेसेज आला, एक अनोळखी व्यक्ती म्हणाली की "आवडती जागा" या कथेवर एकांकिका लिहायची आहे.

मी विचारलं की मूळ लेखक म्हणून मला क्रेडिट मिळेल का? तर त्या व्यक्तीने असच्या असं उत्तर दिलं, एक ही शब्द इकडचा तिकडे नाही..
"तसं असतं तर मी तुम्हाला मेसेजच केला नसता, न सांगता एकांकिका लिहली असती, तुम्हाला कळलं ही नसतं"

आता यावर काय बोलणार? Happy

>> >>फक्त याच कारणामुळे मी कथा लिहीत नाही.

ज्या शब्दांना लाज असते ते उतरत नाहीत कागदावर (सध्या आंतरजालावर)

तसं असतं तर मी तुम्हाला मेसेजच केला नसता, न सांगता एकांकिका लिहली असती, तुम्हाला कळलं ही नसतं">>>>>> म्हणजे काय चैतन्य?? ताचा अर्थ तुम्हाला क्रेडीट मिळणार? की नाही?

फक्त याच कारणामुळे मी कथा लिहीत नाही. म्हणजे खरतर काहीच लिहत नाही प्रतिसाद सोडले तर.. भीती वाटते कोणीतरी चोरेल.>>> Lol
पण कधी लिहिलंत तर सगळे वाचु शकतील असं लिहा. Happy

मला त्या वाक्याचा अर्थ असा लागला की,

अर्थातच मिळेल. तुम्हाला क्रेडीट द्यायचं नसतं तर कळवलं तरी का असतं. न कळवताच एकांकिका केली असती की. Happy

मला त्यांचं एकंदरीत बोलणं खटकलंच, त्यामुळे विषय जास्त वाढवला नाही, त्यांना शेवटी म्हटलं की तुम्ही एकांकिका लिहा, मला पाठवून द्या, एकांकिका उत्तम असेल तर परवानगी नक्की देईल..

"मला आज फेसबुकवर एक मेसेज आला, एक अनोळखी व्यक्ती म्हणाली की "आवडती जागा" या कथेवर एकांकिका लिहायची आहे.

मी विचारलं की मूळ लेखक म्हणून मला क्रेडिट मिळेल का? तर त्या व्यक्तीने असच्या असं उत्तर दिलं, एक ही शब्द इकडचा तिकडे नाही..
"तसं असतं तर मी तुम्हाला मेसेजच केला नसता, न सांगता एकांकिका लिहली असती, तुम्हाला कळलं ही नसतं""

मी काढलेला अर्थः
- अरे भावा, मला क्रेडिट हवंय. मी लिहायला पण घेतलीय. पण मला पूर्ण करता येत नाहीये. त्यामुळे तुझी मदत घेणं भाग आहे. शिवाय दोस्तीखात्यात कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो तर उद्या तू लेखनचोरीचा आरोप थेट करताना थोडा प्रेमाने करशील, डगमगशील.
'सांगून चोरी' हा हल्लीचा ट्रेंड आहे.आपण कोणाची तरी काही गोष्ट रॉब करणार असतो. त्यातून मिळणारा फायदा त्याला न देऊन त्याची अप्रत्यक्ष चोरी/लॉस घडवून आणत असतो.पण पूर्णपणे त्याला अंधारात ठेवून ढापण्याइतके सफाईदारही नसतो. अश्या वेळी 'तुमच्या अमुक लिखाणावरुन बेस करुन अमुक लिहायला मदत पाहिजे, जर हे मटेरियलाइझ झालं तर क्रेडिट्/पैसे देईन' असा सावध नरो वा कुंजरो वा पवित्रा असतो. नवोदित लेखक दडपून 'मी दिलंय, मटेरिअलाइझ झालं नाय झालं माझी त्यात मेहनत आणी वेळ आहे, पैसे टाक आत्ता' म्हणू शकत नाही आणि बरेचदा धर्मार्थ लेखन करतो Happy
(हे एका अनुभवदग्धाचं लिखाण आहे हे जाणवलं असेलच. Happy )

नवोदित लेखक दडपून 'मी दिलंय, मटेरिअलाइझ झालं नाय झालं माझी त्यात मेहनत आणी वेळ आहे, पैसे टाक आत्ता' म्हणू शकत नाही आणि बरेचदा धर्मार्थ लेखन करतो Happy
(हे एका अनुभवदग्धाचं लिखाण आहे हे जाणवलं असेलच. Happy )>>>>>>>>>>>>>>> कटू सत्य

@mi_anu

तुम्ही जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे, मला पटलं, मला ही असे अनुभव आले आहेत.
मला कळत नाही लोकं असं का करतात. एखाद्याच चांगलं साहित्य चोरून, तुम्ही थोडा वेळ मोठे होऊ शकता, पण कालांतराने ते पितळ उघडं पडतच.
यावर असा एक उपाय असू शकतो की, लेखी स्वरूपात त्या व्यक्ती कडून लिहून घ्यावं, त्याचा सही शिक्का घ्यावा, जसं व्यावसायिक कॉन्ट्रॅक्ट, रेंट अग्रीमेंट करतात तसं पद्धतशीर करून घ्यावं, म्हणजे नंतर त्याने जरी क्रेडिट दिलं नाही तर सरळ त्याला लीगल नोटीस पाठवावी.

यापुढे असा कोणी कॉन्टॅक्ट केला की म्हणत जा माझ्या अससिस्टंट शी बोला, माझे लीगल व्यवहार तोच बघतो.

लोकं बऱ्याचवेळा मूळ लेखकाला पत्ता लागू न देता लेखन इकडचं तिकडे फिरवतात आणि असं करण्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. ही समस्या आहे खरंतर.

ब्रँडेड प्रॉडक्टचे डुप्लिकेट बनवायची अख्खी इंडस्ट्री उभी आहे. त्याचे काही करू शकले नाहीत अजून. त्याच्यापुढे तुमच्या दीडदमडीच्या लेखाची काय किंमत?

हो खरं आहे ☺️☺️☺️
पण माझ्यासाठी माझा 50 ओळींचा लेख 12000 युरो च्या बॅगवती इतकाच किमती असतो

जमेल तितके प्रयत्न करायचे..बाकी सोडून द्यायचे.
आता 2 दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉग वर एक जुनं ऑस्कर वाईल्ड च्या कथेचं हौशी रूपांतर होतं. ते 2005 मध्ये वगैरे केल्याने जरा प्रीमिटीव्ह आहे.आणि लेखात स्पष्ट पणे "ऑस्कर वाईल्ड च्या कथेवर आधारित" म्हणून मूळ कथेची विकी लिंक पण आहे.पण एका माणसाचा "आम्हाला मूर्ख बनवता का, ही नाना पाटेकर च्या शॉर्ट फिल्म ची कथा आहे" असा प्रतिसाद आला.डोकं जरा हललंच.आपले लेख कविता नावं उडवून युगानुयुगे फिरत असतात.आणि स्पष्टपणे लेखात श्रेय देऊन कधीकाळी केलेल्या रुपांतराला पब्लिक झोडपतं.

उपाशी बोका
असले आयडी माबोवर अजून का आहेत? मी बरेच प्रतिसाद बघितले, काहीही बोलतात..

मजा म्हणजे नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील वगैरे मंडळींना त्यांनी न केलेल्या साहित्य-रचनेचं पण श्रेय मिळतं. किती अवाढव्य प्रमाणात त्यांच्या नावाने सुविचार फॉरवर्ड होतात! शिवाय पुलंच्या नावाने 'कॉलेजचे गेट' कविता युगानुयुगे फिरते आहे.

मी लिहिलेल्या ३ छोट्या कथा, २ मध्ये प्रत्येक शब्द 'प' पासून आणि एकीमध्ये 'क' पासून सुरु होतो. ह्या कथा गेली ९-१० वर्षे (मी ब्लॉगवर टाकल्यापासून) 'मराठी भाषेची ताकद' ह्या नावाने फिरत आहेत. म्हणजे ताकद आहे चांगली गोष्ट आहे, पण निदान मला विचाराल कि नाही आधी! एकाला मी सांगितलं की तुझ्या फेसबुकवर तू का टाकली, ती माझी आहे, तर तो मलाच म्हणाला कि 'नाही, ती मिलिंद शिंत्र्यांची आहे'. गम्मत म्हणजे मिलिंद शिंत्रे माझे फेबु मित्र आहेत, आणि त्यांनी तशी लिहिलेली एक दुसरी गोष्ट पण आहे ज्याबद्दल आम्ही एकमेकांशी जुजबी बोललो होतो! पण त्या दोन स्वतंत्र कथा आहेत.

Mi-Anu, sandhii ch anekvachan sandhi ch asata bahutek, please check karta ka?
Asmadik kinva mi yapaiki kahitari ekach vaaparayche asate bahutek

पैसा हवा असेल तर सरळ पुस्तक बनवा व योग्य किमतीत अमेझॉन वर विका , अव्वाच्या सव्वा कमतींमुळे साहित्य प्रेमी लोकांना
असा आनंद शोधावे लागतात, आणि ज्याला तुम्ही चोरी म्हणता ती खरेतर साहित्य प्रेमाचे प्रतीक आहे, साहित्याची भूक आहे. पण किंमत परवडत नाही म्हणून मला पण पूर्वी अनेक जगप्रसिद्ध मराठी इंग्रजी पुस्तके प्रत्येकी ४० ते ५० रुपयात रस्त्यावर विकत घेऊन वाचनाची भूक भागवावी लागली आहे, बरे अती महाग केलेत तर हे असे होणार कारण उत्तम काही वाचल्याशिवाय आनंद मिळत नाही

कोपीस्केप नावाचे एक ऑन्लाईन टूल आहे, मी त्यावर plagiarism बघण्यासाठी माझा कन्टेन्ट टाकुन पाहिला.
तर हे टूल मराठी plagiarism detection साठी वापरता येते, असा नुकतच समजलं
जाहिरात करत नाहीये, पण लिखाण कित्पत ओरिजिनल आहे हे बघता येइल.

befikir yanchi charchoughi kadambari sadhya marathi pratilipi var Atul Bavane yachya navane publish ahe agadi patranche nav suddha samech ahe. Befikir he pahtil ka? Sorry marathi type kartana problem yetoy.

Pages