असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने

Submitted by चामुंडराय on 5 April, 2018 - 22:52

असा पिझ्झा बेस द्या मज आणुनि
सजविन मी जो चीझ टॉपिंगज् ने
बेक करुनि त्यास ओव्हन मध्ये
खाईन मी तो आनंदाने

थिन क्रस्ट वा थिक असो वा
मिट असो वा मिटलेस असो वा
शर्करावगुंठित सोडयासंगे
खाईन मी तो आनंदाने

हाय कॅलरी अन लो फायबर
तयाला एक्स्ट्रा चिजचा थर
पोषणमूल्ये असो नसो वा
खाईन मी तो आनंदाने

मिट लव्हर्स वा मार्गारिटा
वरती एक्स्ट्रा चीझ मारा
नानाविध टॉपिंग्ज संगे
खाईन मी तो आनंदाने

चीज असो वा व्हेजि असो वा
स्मॉल मीडियम लार्ज असो वा
चिकन टिक्का वा चिकरोनी
खाईन मी तो आनंदाने

चीज-न-कॉर्न, मार्गारिटा
पेरी-पेरी अथवा फियेस्टा
पॅराडाईज वा पनीर मखानी
खाईन मी तो आनंदाने

मिरीण्डा पेप्सी किंवा कोला
बेसिल पेस्टो वा मोझरेला
काँडिमेंट्स हे अकम्पनीला
खाईन मी तो आनंदाने

नकोच टॉपिंग्ज, नकोच बेस
तयार आयता पिझ्झा बेस्ट
मेड टू ऑर्डर पिझ्झेरियातुनी
तयार पिझ्झा द्या मज आणुनी

फस्फसत्या त्या पेय्या संगे
खाईन मी तो आनंदाने
भेदून टाकीन सारी वसने
फास्ट फूडच्या मेदवृद्धीने

केशवसुत _/\_

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपर्णा. atuldpatil आणि गौतम७स्टार धन्यवाद.

आपल्या तोंडात पिझ्झा पडो हि सदिच्छा Happy