लढाई

Submitted by आनंद. on 31 March, 2018 - 04:29

वहीत लिहीली कविता
मला येत नाही पुसता
माझेच शब्द शत्रू झाले
रडू कोसळले हसता हसता ॥१॥

झडलेले झाड अंगणातले
आला वसंत बघा बहरले
कसे कुठूनसे वादळ आले
डोळ्यांदेखत उन्मळून पडले ॥२॥

राखेतूनी घेत असता भरारी
मला खुणावते डोंगर कपारी
पंखांना पसरवताना आकाशी
कळ वेदनेची जाणवली शरीरी ॥३॥

उन्हं उतरण्याची वाट बघावी
सायंकाळी घराला आग लागावी
काळाच्या जंजाळात गुरफटलो
लढतो आहे एकट्यानंच लढाई ॥४॥
―आनंद / ३१.३.१८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान..
काळाच्या जंजाळात गुरफटलो
लढतो आहे एकट्यानंच लढाई ॥----
Be positive... >>+१११