माझी सैन्यगाथा (भाग ८)

Submitted by nimita on 28 March, 2018 - 07:50

मी आधी सांगितल्याप्रमाणे त्या भागात साप आणि जळवांचा अगदी सुळसुळाट होता. आणि आमचं घर अगदी जंगलाजवळ असल्यामुळे साहजिकच आमच्या घराच्या आसपास बऱ्याच वेळा लोकांना रस्त्यावरून साप जाताना दिसायचे. आणि बऱ्याच जणांना जळवां बरोबर ही दोन हात करावे लागायचे. एकदा माझी एक मैत्रीण मला भेटायला आली. आणि आल्या आल्या काही न बोलता सरळ माझ्या स्वैपाकघरात गेली. मला वाटलं , पाणी प्यायला वगैरे गेली असेल म्हणून मी तिच्या मागे गेले. ती मला म्हणाली,” मीठ कुठे ठेवतेस, लवकर दे काढून..” मी मिठाची बरणी पुढे केली आणि विचारलं , “ अगं, पण झालंय काय?” ती म्हणाली,” अगं, येताना त्या बाहेरच्या झाडावरून एक leech (जळु) पडली हातावर आणि चिकटली. “ बोलता बोलता एकीकडे तिनी थोडं मीठ घेऊन त्या चिकटलेल्या leech वर टाकलं आणि त्या क्षणी ती leech गळून पडली. हा असा live demo बघून मी तर खूपच impress झाले. आणि मीठ आणि leeches चं हे वाकडं नातं मी माझ्या database मधे save केलं.
माझ्या माहेरी माझे मोठे काका आणि मोठी बहीण असे दोन आयुर्वेदाचार्य घरातच असल्यामुळे त्यांच्या कडून मी जळवांचा उल्लेख बऱ्याच वेळा ऐकला होता. एखाद्या रोग्याच्या शरीरातलं अशुद्ध रक्त काढून टाकण्यासाठी आयुर्वेद मधे जळवांचा वापर केला जातो हे देखील मी ऐकून होते. आणि त्या जळवा (अशुद्ध रक्त शोषून घेण्याचं ) त्यांचं काम झाल्यावर आपणहून गळून पडतात ! त्या आधी जर त्यांना ओढून काढायचा प्रयत्न केला तर त्यांचा डंख शरीरातच राहतो आणि त्यामुळे अजून प्रॉब्लेम होतो….. ही सगळी theory मला ऐकून माहित होती. त्या परोपकारी जळवांचं दर्शन घेण्याचा लाभ ही मला मिळाला होता.
पण इथल्या जळवांचे रूप रंग आणि त्यांचे नखरेही थोडे वेगळे होते. त्या इतक्या बारीक, slim and trim असायच्या की पटकन दिसायच्याही नाहीत. झाडा-झुडुपांत, गवतात जणू काही दबा धरून बसायच्या. जवळून कोणी जाताना दिसलं की त्याच्या शरीरावर चिकटून फ्री ride घ्यायच्या. आणि जाताना शरीरावर व्रण देऊन जायच्या.
पण आश्चर्य म्हणजे लोहितपुर च्या माझ्या वास्तव्यात एकदाही माझं त्यांच्या बरोबर encounter नाही झालं. माझ्या तिथल्या मैत्रिणींना याचाच खूप राग यायचा. त्या म्हणायच्या,” ये तुम्हारे घर की leeches हमेशा हमें ही क्यूँ काटती हैं? तुम्हें कैसे नहीं काटती?” मी हसून त्यांना म्हणायचे,” उन्हे पता है.. जिस थाली में खाते हैं, उसमें छेद नहीं करते।”
या situation वर मला एक फिल्मी डायलॉग पण सुचला होता.. जर या leeches वर आधारित ‘शोले’ सिनेमा बनवला तर त्यातला डायलॉग कसा असेल..….. “मैं आपसे बेवफाई कैसे कर सकता हूँ सरदार ?मुझे अपनी जान प्यारी है….. मुझे आपका नमक नहीं खाना।”
अजूनही कधी कधी असा सीन डोळ्यासमोर आणून मी स्वतःशीच खूप हसते.
याच कॅटेगरी मधला दुसरा प्राणी होता साप ! माझ्या घराच्या आसपासच नाही तर त्या संपूर्ण कॉलनी मधे बऱ्याच जणांना, बऱ्याच वेळा साप दिसायचे.. कधी एखाद्या झाडाखाली वेटोळे करून बसलेले, तर कधी वनविहार करणारे! पण मला कधीच नाही दिसले. आमच्या कॉलनी मधे एके ठिकाणी रस्त्याच्या कडेनी एक छोटासा ओहोळवजा झरा वहायचा. त्याच्या जवळपास लोकांना नेहेमी साप दिसायचे, जणू काही सापांचा अड्डाच होता तिथे. मी रोज येताजाता तिथे एक नजर टाकायची...नागदेवतेचं दर्शन होईल या आशेनी! पण बहुधा तिथले नाग आणि नागकुळं माझ्यावर रुष्ट होते ( का मेहेरबान होते?), त्यामुळे त्यांच्या दर्शनाचा लाभ काही नाही मिळाला !
पण काही विलक्षण असे उडणारे जीव मात्र मला तिथे बघायला मिळाले… माझ्या बागेत एक अनोख्या प्रकारचा भुंगा दिसायचा.. मी त्याचं नाव ठेवलं होतं ‘ भृंगराज कर्ण’ ( महाभारतातल्या अंगराज कर्ण सारखं)! कारण त्या भुंग्याकडे पण कर्णासारखं एक कवच होतं. I mean, जेव्हा तो भुंगा उडत असायचा तेव्हा अगदी इतर भुंग्यांसारखाच दिसायचा पण जर त्याच्या समोर एखादा अडथळा आला किंवा त्याला काही धोका जाणवला तर अचानक त्याच्याकडचं ते इतरवेळी अदृश्य असलेलं कवच घालून एकदम एखाद्या टणक बॉल सारखं बनून खाली मातीत पडून घरंगळत जायचा. कासव कसं संकटाची चाहूल लागताच आपल्या कवचात लपून बसतं.. तसाच! आणि त्याचं ते कवच ही खूपच हार्ड असायचं, कितीही प्रयत्न केला तरी ते उघडणं शक्य नसायचं. थोड्या वेळानी हळूच आपल्या कवचातुन बाहेर येऊन अंदाज घ्यायचा आणि सुरक्षेची खात्री झाल्यावर मग परत नेहेमी सारखा उडायला तयार !
असाच एक moth (पतंग) होता, तो तर हुबेहूब एखाद्या fighter plane सारखा दिसायचा...त्याच्या पंखांवर अगदी आर्मी च्या combat ड्रेस सारखा पॅटर्न आणि रंगसंगती असायची. म्हणजे युद्धाच्या वेळी सैनिक जसा युनिफॉर्म घालतात ना तसे. त्याला बघितलं की माझ्या मनात नेहेमी एक मजेशीर विचार यायचा…कदाचित खरंच हे किड्यांच्या दुनियेतलं , त्यांच्या एअर फोर्स मधलं fighter plane असेल. मनुष्यवस्ती कडून आपल्याला काही धोका तर नाही ना हे बघण्यासाठी गस्त घालत असेल.
पण निसर्गाचे हे असे चमत्कार बघून कधी कधी माणसाच्या खुजेपणाची जाणीव व्हायची.. वाटायचं, इतर जीवसृष्टीसारखाच मानवही या निसर्गाची निर्मिती आहे. आपलं या जगातलं अस्तित्व देखील निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे, पण तरीही आपण पदोपदी निसर्गाचा अवमान करत असतो. आपल्याला निसर्गाच्या कृपेनी जे काही फुकट मिळतंय त्याची आपल्याला किंमत नाहीये.
असो, आता लिखाणाचा मोर्चा लोहितपुर हुन रुपाई कडे वळवूया.. दोन दिवसांत तिथल्या पावसाचा जोर कमी झाला आणि परिस्थिती थोडी नॉर्मल झाली. त्यामुळे एका सकाळी बाबांचा पुढचा प्रवास सुरु झाला असल्याचा निरोप मला मिळाला- म्हणजे संध्याकाळ पर्यंत ते लोहितपुर ला पोचणार होते. माझ्या मनात त्यांना भेटायची जेवढी उत्सुकता होती तेवढीच त्यांना माझं घर, माझा संसार दाखवायची अधीरता ही होती. माझ्या घरात माझे बाबा पहिल्यांदाच येणार होते आणि योगायोगानी लग्नानंतर माझ्या घरी राहायला येणारे पहिले पाहुणे ही तेच होते.. आणि त्यांचा हा अनुभव अविस्मरणीय व्हावा यासाठी मी माझ्याकडून पूर्ण तयारी केली होती. त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून पुढच्या काही दिवसांचे menus प्लॅन केले होते, स्कूल बसच्या ड्रायव्हर कडून त्या साठी लागणारं सगळं सामानही मागवून घेतलं होतं. आमच्या कडे (म्हणजे नितीनकडे) ऑडिओ कॅसेट्स चं मोठं कलेक्शन होतं. त्यात मोस्टली लता मंगेशकर, महंमद रफी, आशा भोसले या आणि अशा legends च्या गाण्यांच्या तसेच क्लासिकल (vocal आणि instrumental) music च्या ही बऱ्याच कॅसेट्स होत्या. त्यातल्या बाबांना आवडतील अशा कॅसेट्स शोधून बाहेर काढून ठेवल्या होत्या. तिथे करमणुकीचं दुसरं काही साधन नसल्यामुळे त्यांना कंटाळा येऊ नये म्हणून ही सगळी धडपड!
शेवटी एकदाचे संध्याकाळी बाबा लोहितपुर ला पोचले. दिवसभराच्या प्रवासामुळे थकले असावे नक्कीच पण माझं घर आणि आजूबाजूचा निसर्ग बघून खूप खुश झाले.. त्यांचं पहिलं वाक्य होतं,” आता उन्हाळ्यात तुझ्याकडेच येऊन राहायला पाहिजे, मस्त आहे सगळं ….. एकदम हिल स्टेशन आणि तेही फाईव्ह स्टार रेटींग चं!
पुढचे काही दिवस बाबांच्या सरबराईत पटकन निघून गेले. एक दिवस खास बाबांना भेटायला, त्यांची विचारपूस करायला आमचे CO आणि त्यांची बायको येऊन गेले.त्यांच्या वागण्यातला तो आपलेपणा आणि माझ्या बद्दलची काळजी बघून बाबा एकदम खुश झाले. आता त्यांना वाटणारी काळजी मिटली होती ना!
माझ्या बाबांना लोकांना पत्रं लिहायची खूप हौस होती, व्यसनच होतं म्हणा ना! त्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग होता तो. रोज सकाळी कमीत कमी २-३ पत्रं तरी लिहायचे ते. मग स्वतः घरा जवळच्या पोस्ट ऑफिस मधे जाऊन तिथल्या लेटर बॉक्स मधे टाकून यायचे. माझ्या कडे देखील त्यांचा हा नेम चुकला नाही. एका सकाळी पत्रांचा एक मोठ्ठा गठ्ठा घेऊन आले आणि म्हणाले,” इथलं पोस्ट ऑफिस कुठे आहे?” एवढी सगळी पत्रं बघून मी न राहवून विचारलंच,” कोणा कोणाला लिहिलीयेत?” त्यावर म्हणाले, “आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि माझ्या मित्रांना … त्यांना कळलं पाहिजे ना की आर्मीची शान काय असते ते !” त्यावर मी त्यांना म्हणाले, “बाबा, इथे फक्त आर्मी चं पोस्ट ऑफिस आहे. आणि इथून बाहेर जाणारी सगळी पत्रं सेन्सॉर होऊन जातात बरं का!” मी त्यांचं ते बाड युनिट मधे पाठवायची व्यवस्था केली. पण नेहेमीच्या सवयीनुसार त्यांनी स्वतः ती पोस्ट बॉक्स मधे नव्हती टाकली त्यामुळे त्यांना जरा शंका होती की नीट पोचतील ना दिलेल्या पत्त्यांवर?
मी त्यांना म्हणाले,” माझी आत्ता पर्यंतची सगळी पत्रं पोचली ना नीट तुमच्या पर्यंत, तशीच ही पण पोचतील! “ पटलं असावं त्यांना, कारण दुसऱ्या दिवशी परत पाच सहा पत्रांचा गठ्ठा तयार होता लिहून !
बाबांना आमचं घर आणि एकंदरीतच तिथलं सगळं वातावरण आवडलं होतं. सकाळी बाहेरच्या व्हरांड्यात बसून चहा पीत, एकीकडे गाणी ऐकत त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. ते स्वतः एक खूप चांगले आर्टिस्ट होते..खूप सुंदर paintings करायचे.. त्यामुळे तिथे त्यांची अवस्था तर ‘ child in a candy store’ अशी झाली होती. पण आमच्या पहिल्याच दिवाळी ला नितीन बरोबर नव्हता याची बाबांना खूप खंत वाटत होती. मी त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करत म्हणाले,” It's ok, जेव्हा नितीन परत येईल तेव्हा आपण दिवाळी साजरी करू ! आणि तुम्हाला मी पत्रातून तशी कल्पना दिली होती ना? “ त्यावर ते म्हणाले,” हो, पण मला नव्हतं माहिती की तो इतक्या लांब गेलाय… मला वाटत होतं की दिवाळीसाठी एक दोन दिवस येऊन मग परत जाणार असेल.. पण इथे तर परिस्थिती अगदीच वेगळी आहे.. प्रत्यक्ष येणं तर सोडाच, त्याचा फोन किंवा पत्र पण नाही आलेलं मी आल्यापासून!” मग मी त्यांना LRP म्हणजे नक्की काय आणि कशी असते ते समजावून सांगितलं. पण मग वाटलं “उगीच सांगितलं की काय!” कारण आता ते नितीन ची काळजी करायला लागले. रोज विचारायचे,” any news ?” आणि मी रोज त्यांना सांगायचे,” no news is good news!”
बघता बघता दिवाळी आली आणि तशीच निघूनही गेली. युनिट मधल्या सगळ्या लोकांबरोबर दिवाळीची पार्टी मी खूप एन्जॉय ही केली. पण माझ्यासाठी ती फक्त एक नॉर्मल पार्टीच होती, कारण माझी दिवाळी तर नितीन आल्यानंतर साजरी होणार होती….आणि तीही लवकरच ….!
क्रमशःIMG_20180321_105231.jpg
माझ्या बाबांबरोबर माझ्या पहिल्या वहिल्या घरासमोर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो दिलात हे झकास केलत. वर्णन वाचून कसं असेल घर आणि परिसर याची खूपच उत्सुकता वाटत होती Happy

फोटो सुंदर आणि लेख सुद्धा..मी रोज तुमच्या लेखाची वाट बघत असते. खरच वर बर्याच जणांनी म्हटलं तसं रोज एक लेख येऊ दे!

मस्तच!!! मध्ये फार वेळ न जाता पुढचा भाग आला हे छान!
फोटो मुळे हा भाग अजून रंगतदार झाला आहे!
माझे लहानपण HAL कॉलॉनीमध्ये गेले. तेव्हा आमच्याकडे आजोबा आजी पहिल्यांदा आले ते दिवस आठवले! अर्थात तुम्ही वर्णन केलेल्या कॉलोनी पेक्षा आमची टाउनशिप खुपच शहरी होती पण साप/विंचु होतेच.
पु भा प्र!

ओघवते लेखन

नेहमीप्रमाणेच
झक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्कास

मित्र मैत्रिणींनो, तुमच्या या अश्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मला अजून चांगलं लिहायची स्फूर्ती मिळते. बऱ्याच जणांनी रोज एक भाग लिहायला सुचवलं आहे. तर काही जणांना अजून मोठे भाग आवडतील. खरं म्हणजे मलाही आवडेल तसं ... पण हे लिखाण माझ्याकडे तयार नाहीये. मी रोजच्या रुटीन कामांमधून जसा वेळ मिळतो त्याप्रमाणे लिहीत राहते. त्या मुळे जरा वेळ लागतो, पण तुमच्या इतकीच मीही अधीर असते तुमच्या प्रतिक्रिया वाचायला. आपलं लिखाण कोणालातरी आवडतंय हा विचारच खूप सुखावह आहे! सगळ्यांना मनापासून धन्यवाद! Happy

अतिशय महत्त्वाचे अनुभव सुंदर प्रकारे देत आहात, धन्यवाद!! एक विनंती, प्रत्येक लेखामध्ये आधीच्या सर्व लेखांचे दुवे दिले तर तेही लेख चटकन वाचता येतील (मी गूगलवर शोधून वाचले). धन्यवाद.

सर्वांचे मनःपूर्वक आभार. आता माझं हे सगळं लिखाण पुस्तकरूपात प्रकाशित झालं आहे. पुस्तकाचं शीर्षक आहे 'माझी सैन्यगाथा...एका सैनिकपत्नीची अनुभवगाथा' हे पुस्तक पुण्याच्या मधुश्री प्रकाशन तर्फे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. संपर्कासाठी त्यांचा मोबाइल नंबर देते आहे... +91 98509 62807 माझं पुस्तक वाचून त्यावरील प्रतिक्रिया जरूर कळवा. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार Happy