आऊटलँडर

Submitted by ॲमी on 27 March, 2018 - 23:28

.
.
Sing me a song of a lass that is gone,
Say, could that lass be I?
Merry of soul she sailed on a day
Over the sea to Skye.

Billow and breeze, islands and seas,
Mountains of rain and sun,
All that was good, all that was fair,
All that was me is gone.
.
.

वर्ल्डवॉर २ मधे कॉम्बॅट नर्स म्हणून काम केलेली क्लेअर आपल्या इतिहासतज्ञ नवर्यासोबत (फ्रॅंक) स्कॉटलंड फिरायला आली आहे. नवर्याचा पुर्वज जॅक रँडलबद्दल अधिक माहिती जमा करणे आणि दुसरा हनिमून असे दुहेरी उघड उद्देश या ट्रिपमागे आहेत. युद्धामुळे ४-५ वर्ष एकमेकांपासून दूर राहील्यावर बदलेल्या साथीदाराला जाणून घेणे आणि मुलासाठी प्रयत्न करणे असे छुपे उद्देश.

बॉटनी/झुडुपपाल्याचा औषधी उपयोग याची आवड असणारी क्लेअर अपघाताने २०० वर्ष मागे जाते. १९४५ मधून १७४३ मधे. गाई चोरणारे स्कॉटिश हायलँडर आणि त्यांचा पाठलाग करत गोळीबार करणारे ब्रिटिश सैनिक यांच्यापासून बचाव करत पळताना ती भरकटते आणि स्कॉटिश टोळीच्या तावडीत सापडते. आधी ते हिला ब्रिटिश हेर समजतात. पण मग तिचे वैद्यकीय ज्ञान बघून हिलर म्हणून नजरकैदेत ठेवून घेतात. काही घटनांमुळे तिला टोळीतल्या जेमी फ्रेजरशी लग्न 'करावे' लागते. पण नकळत ती त्याच्या प्रेमात पडते.

स्कॉटिश कॅथलिक किंग जेम्सला त्याच्या 'हक्काच्या' इंग्लंडच्या गादीवर बसवण्यासाठी होणारे जॅकोबाईट राइजिंग, दोन वर्षानंतरचे १७४५ कलोडन युद्ध, स्कॉटिश क्लॅन पद्धतीचा आणि एकंदरच हायलँडर संस्कृतीचा अंत या सगळ्यापासून ती जेमीला आणि तिच्या जिवाभावाचे मैत्र झालेल्या इतरांना वाचवू शकते का? इतिहास बदलता येतो का? प्रेमासाठी मनुष्य काय काय करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी आऊटलँडर मालिका नक्की बघा!

पूर्ण मालिका जिच्यावर अवलंबून आहे त्या क्लेअरची भूमिका Caitriona Balfe ने अतिशय उत्तमरीत्या निभावली आहे. Sam Heughan अभिनीत जेमीने तिला तोलामोलाची साथ दिली आहे. दोघांमधील केमिस्ट्री जबरदस्त! पण मला स्वतःला फ्रॅंक आणि जॅक रँडल अशा दोन टोकाच्या दोन व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या Tobias Menzies चे फार कौतुक वाटले. बाकी सगळ्यांचा अभिनयदेखील उत्तम. कास्टिंग डायरेक्टरचे कौतुक.

१९४०, १७४० मधले स्कॉटलंड, १७४० मधले फ्रांस, त्याकाळची वेशभूषा,भाषा, शस्त्रास्त्र, खानपान संस्कृती, प्रवासाची साधनं वगैरे बघायला फार छान वाटते. पिरियड ड्रामा बघायला आवडत असेल तर चुकवू नये अशी सिरीज. मी नुकतंच या सिरीजच बिन्ज केलं.
३ सीझन - ४२ एपीसोड प्रत्येकी १ तासाचे - ८ दिवस मधे बघून झाले.

दोनेक वर्षांपूर्वी आऊटलँडर सिरीजमधली पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती. ६६५ + ७४७ + ९९९ + ९१६ + (१३३०/२) अशी ४००० पानं ie ४.५ पुस्तक वाचून मग ब्रेक घेतला होता. पुस्तकांत फारच डिटेल वर्णन आहेत त्यामुळे सलगपणे वाचल्यास कंटाळा येऊ शकतो. पण एवढी मोठी पुस्तकं मालिकेच्या १६ किंवा १३ भागात बसवल्याने फक्त महत्वाच्या घटना घेऊन बाकीचा फापटपसारा काढून टाकला आहे. आतापर्यंत पहिल्या तीन पुस्तकांवर तीन सीझन आलेत. चौथा यावर्षी येईल.

टाईम ट्रॅव्हल, इतिहास, युद्ध, साहस, प्रेम, फेमिनिझम वगैरेची छान भेळ जमून आलीय मालिकेत. त्यामुळे नक्की बघा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सिरीजला कल्ट फोल्लोविंग आहे, या सिरीज बद्दल खूप ऐकलं आहे, पण मी कधी बघितलं नाही, एवढ्या सिरीज आहे, की काय बघायचा काय नाही यातच वेळ निघून जातो, ऍमेझॉन प्राईमवर तर नाहीये, नेटफ्लिक्स वर आहे ना?

उपाशी बोका Lol

===
चैतन्य,
हो कल्ट फोल्लोविंग आहे याचा. पण मआंजावर फार कोणाला माहित नाहीय बहुतेक Sad
नेटफ्लिक्सवर आहे कि नाही माहित नाही. मी बेकायदेशीर मार्गाने मिळवली Wink

हाहा! मला ही खुप आवडली. कधी कधी खुपच रेसी होते पण एकंदर स्कॉटलंडचे बॅकड्रॉप्स, अ‍ॅड्वेंचर, लव स्टोरी हे सगळे इतर अति सिरियस टिवी शोज, पुस्तकांशी तुलना करता वेलकम रिलिफ वाटली.
कैट्रियोना बाल्फी Blush नवीन क्रश! Happy तिची अ‍ॅक्टिंग पुढे सुधारत गेलीये असं जाणवतं अगदी. जेमी अ‍ॅक्टर म्हणून ठीक ठाक आहे पण दोघांची केम्सिट्री छान आहे. चौथ्या सीजन मध्ये बहुतेक जेव्हा ते खुप वर्षांनी भेटतात तेव्हाचा सीन फार एंजॉय केला मी. डायरेक्टर, स्टोरी वगैरे नी त्या मोमेंट पर्यंत येऊ पर्यंत चांगलं टेन्शन मेन्टेन केलं. म्हणजे प्रेक्षक म्हणून मी सुद्धा फार आतुरतेनी वाट बघत होतो की हे भेटल्यावर आता जुनी "फायर" परत येते का ते.
क्लेअर हे कॅरॅक्टर पण खुप आवडलं कारण ती जेवढी प्रेमात वलनरेबल असते तितकीच त्यातून गरज पडल्यावर सावरुन नवीन प्रेम अकसेप्ट करुन लाईफ पुढे सरकवायचा प्रयत्न पण करते. बाकी संकटकाळात सुद्धा खुप हिमतीनी वावरताना दाखवलीये.
सुरवातीला सुद्धा जेमीच्या टोळीचा विश्वास संपादन होऊ पर्यंतचा प्रवास मस्त घेतलाय.
इतर काही कॅरॅकटर्स पण भारी आहेत. खुनशी डुगल, गॅरी लुईसचा कॉलम मॅकन्झी. अँगस तर लै भारी Lol
अगदी शांत वाटणारा मर्टा पण नंतर भाव मारुन जातो. पुढे फर्गसचं पण काम छान आहे. जेमीच्या बहिणीनी पण मस्त फटकळ कॅरॅक्टर उभं केलय.
एकंदरित सगळी टीम त्यांचं काम चोख बजावते आणि प्रक्षकाला त्यांच्या स्टोरी मध्ये एकदम कॅपचर्ड ठेवते. एपिसोड संपला तरी आपण त्याच दुनियेत वावरत राहतो असं झालं की समजून घ्यायचं शो मध्ये दम आहे. गेम ऑफ थ्रोन्स ल पण असच होतं.

धन्यवाद बाफं काढल्याबद्दल. आणखिन लिहेनच.

तटि: हा शो संपवल्यावर तसच फिलिंग हवं म्हणून मी शोधून पोल्डार्क बघायला सुरवात केली. तो पण खुप आवडला शो. जमल्यास एखादा एपिसोड बघा. Happy

maitreyee Lol

===
वैद्यबुवा,
हुश्श! चला एकानेतरी ही मलिका बघितली आहे, आवडली आहे Happy
पूर्ण प्रतिसादाशी सहमत.

'पोल्डार्क'बद्दल ऐकलं आहे. नक्की बघेन.

===
फारएण्ड Happy