अच्छे दिन

Submitted by के.के.केंद्रे on 24 March, 2018 - 05:41

अच्छे दिन?
लोकशाहीला फसवून
तुम्ही कितीही मारा साहेब
अच्छे दिनाच्या बाता !

कष्टकऱ्यांचं होतंय मात्र,
आनं मलिदा खातेय सत्ता !!

साहेब ,सत्तेच्या मदतीने
तुमचा मुलगा वर्षाला
करोडोचा टर्नओव्हर घेतो !

आमचा भाऊ फी ला पैसं,
बहीण नोकर भरती,आनं
बाप कर्जापायी जगच सोडून जातो !!

सत्तेवर येण्याआधी
कोणी जाहीरनामा,तर
कोणी वचननामा जाहीर करतो !

खुर्ची मिळाली कि कसला
जाहीरनामानं, कसलं वचन?
नेता फक्त पकोडा विकण्याचा
सल्ला देतो !!

आता तर कहर झाला
लोकशाहीच्या मंदिरात
उंदीरांनी धुमाकूळ केला !

आनं उपद्रवी प्राण्याला
संपविण्या व्यवस्थेतील
बोक्यांनीच करोडोचा घोळ केला !!
रचना-के.के.केंद्रे
मो-9594660136

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users