भेटून बोलून सारीच माणसे कळतीलच असे नाही

Submitted by द्वैत on 21 March, 2018 - 15:35

भेटून बोलून सारीच माणसे
कळतीलच असे नाही
छत्तीस गुण जुळून ही मने
जुळतीलच असे नाही

विचारूच नयेत एकमेकांना
असे काही प्रश्न
ज्या प्रश्नांची हवी ती उत्तरे
मिळतीलच असे नाही

शिस्त लावणे ह्या दुनियेला
सोडून दे तू आता
तुझ्यासारखाच राग सारे
गिळतीलच असे नाही

गंज पकडलेली ही टाळी
नुसतीच टांगून ठेवा
खुल्या तुरुंगातून ही कैदी
पळतीलच असे नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच..
बऱयाच लोकांचा मनोगत आहे हे Happy