एक गाणे दूर कोठून.....

Submitted by अनन्त्_यात्री on 18 March, 2018 - 13:15

एक गाणे, दूर कोठून, निशिदिनी झंकारते
पैलतीरावरुनी काही ऐलतीरी आणते

हृदयस्पंदी ताल त्याचा, राग त्याचा अनवट
प्रथम त्याचा नाद मग अनुनाद येतो गर्जत

लय अशी अलवार त्याची, प्राणफुंकर घालते
रोमरोमातून काही तरल मग ओसंडते

आज अस्फुट शब्द, त्यांच्या सावल्या धूसर जरी
अर्थ उमले नित्यनूतन, ऐकले कितिही तरी

Group content visibility: 
Use group defaults

लय अशी अलवार त्याची, प्राणफुंकर घालते
रोमरोमातून काही तरल मग ओसंडते

भारी फुंकर !!!

लय अशी अलवार त्याची, प्राणफुंकर घालते
रोमरोमातून काही तरल मग ओसंडते

भारी फुंकर !!!